ता.हातकणंगले. जि.कोल्हापूर.
9028090266.
9028090266.
=================================
पुल खचले आहेत
खचलेल्या दगडांचे पूल
पाण्याबरोबर वाहून जातात
मंञी महोदय फक्त
परिस्थिती पाहून जातात !
आॅडिट होते पूलांचे
नियोजन फक्त रचत असतात
जीर्ण झालेले पूल
कणाकणाने खचत असतात !
बळी गेलेल्यांच्या जीवांची
बोली फक्त बोलत असतात
गेलेल्या जीवांचे मोल
पैशामध्ये तोलत असतात !
लाल फितीची प्रक्रिया
दिवसें दिवस लांबत असते
दूसरा पूल पडेपर्यंत
चर्चा फक्त थांबत असते !!!
-आबासाहेब निर्मळे
पेठ वडगांव कोल्हापूर
-9028090266.
=================================
भात कापणी
रानात चालली
कापणी भाताची
लगभग हाताची
सुरू असे !
दाणे टिपाया
पाखरे फिरती
नखरे करती
रानोरानी !
भरली लोंबी
सोसेना भार
विळ्याची धार
चमकली !
मिळेल आता
सुखाचा घास
धान्याची रास
खळ्यावर !
सर्जा राजाची
चालते जोडी
अशीच गोडी
राहू दे !
देवूनि वारा
भरुया पोती
पिकले मोती
मातीतून !
-आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव ता.हातकणंगले.जि.कोल्हापूर
9028090266
=================================
रंगवर्षा
सावळ्या आभाळा
फुटला पान्हा
थेंब तान्हा
कोसळतो ।
धारा धारातूनि
थेंब गाती गाणे
शहारती पाने
अंर्तबाह्य ।
पाखरे न्हावूनि
आनंद लुटती
अंकुर फुटती
मनालाही ।
निसर्ग सारा
येई बहरात
आली दारात
रंगवर्षा ।।
आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव जि .कोल्हापूर
9028090266.
=================================
No comments:
Post a Comment