■...स्वच्छतेचे महत्व...■
नमस्कार मित्रांनो, आज मी एका महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहे.आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे माणूस यंत्रा-तंत्रातच मग्न झाला आहे.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत धावपळ होत असते.पैसा अन प्रसिद्धि कमावन्याच्या हव्यासापोटी अनेक बाबीकडे दुर्लक्ष होत आहे.म्हणतात ना"निरोगी शरीरात निरोगी मन राहते."पण या धक्काधक्कीच्या युगात आरोग्याकडे लक्ष द्यायला मानसा कडे फुरसतच नाही.आरोग्य केंव्हा निरोगी राहील?आपण जेथे वास्तव्य करतो,तेथील आसपासचा परिसर जर स्वच्छ असेल तर.
स्वच्छतेला किती महत्व आहे हे आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही.पुरातण काळापासून अनेक ग्रंथामधे,अनेक संत महात्म्यानी, समाजसुधारकांनी स्वच्छतेचे महत्व वर्णिवेले आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबानी आपल अख्ख आयुष्य स्वच्छतेसाठी वेचलेल आहे.गाडगेबाबांच्या हातात सतत झाडू असायचा ,त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला व ज्या गावात जातील तेथे स्वतःच्या हातात झाडू घेऊन स्वच्छता करायचे.स्वच्छता व समाजसेवेलाच त्यांनी इश्वरसेवा समजली."देव हा देवळातल्या निर्जीव मूर्तित नसून,चालत्या बोलत्या माणसात व मुक्या प्राण्यात आहे",असे ते म्हणायचे.अशा महान संताचा बोध घेऊन महाराष्ट्र शासनांने "संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान"चालु केले व स्वच्छ गावास पारितोषिक देवून ,स्वच्छतेस प्रसिद्धि मिळवून दिली आहे.
स्वच्छता का महत्वाची आहे याचा विचार केला तर याची अनेक उत्तरे देता येतील.अस्वच्छ परिसरामुळे आज सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे,त्यामुळे नको ते आजार फोफावत आहेत.डासांची व अनेक विषारी किटकांची उत्पत्ती अशा साचलेल्या पान्यातून,कचऱ्यातुन होत आहे,व अनेकांचे बळी जात आहेत.कारखान्यांची वाढती संख्या व त्यातून ओसांडनारा मलिन द्रव्य व घण कचरा हा नदयामधे सोडला जात आहे, त्यातील विषारी घटकामुळे जलचारांचे जीवन धोक्यात आले आहे.हे सर्व रोखण्यासाठी आज सर्वानी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे.शासनाने अशा कारखान्यावर बंदी आणली पाहिजे व त्यांना या विषारी पदार्थाचे योग्य निवारण करणे बंधनकारक केले पाहिजे.
स्वच्छतेची सुरूवात ही स्वतःपासून करावी.स्वतःचे घर,आसपासचा परिसर स्वच्छ ठेवताना ,कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे.शेजाऱ्यामधे स्वच्छतेची जाकरुकता केलि पाहिजे.मंदिरामधेहि स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.आपण भारतीय खुप धार्मिक आहोत.देवाला नवस करणे,नारळ फोडने,या बाबी कटाक्षाने टाळाव्यात."देव भक्तिचा भुकेला आहे".मंदिरातील परिसर स्वच्छ असेल तरच आपले मनहि तेथे रमते.त्यामुळे सर्व मंदिरे स्वच्छ झाली पाहिजेत.
शाळा ,महाविद्यालये, शासकीय कार्यालये, तीर्थक्षेत्रे,नद्याकाठचा प्रदेश अशा ठिकाणी लोकामधे स्वछतेची जाणीव करण्यासाठी प्रत्येकानि स्वतःहून पुढे आले पाहिजे.भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीनी 2 ऑक्टोबर हा दिन "स्वच्छता दिन"म्हणून साजरा करण्याचा पायंडा पाडलेला आहे,पण मोदीजी एकटे भारताला स्वच्छ बनवू शकत नाहीत.संपूर्ण भारतवासियांची मने जेंव्हा जागृत होतील ,लोक स्वतःहून प्रेरित होवून स्वछता मिशनमधे सहभागी होतील."मी घाण पसरविनार नाही आणि पसरवू देणारहि नाही",अशी प्रतिज्ञा जेंव्हा प्रत्येकजण करेल ,तेंव्हा नक्की भारत सुजलाम् सुफलाम् आणि स्वच्छ बनेल यात तिळमात्र शंका नाही,चला तर मग घेऊया शपथ.
साधुसंताचे विचार
अंगिकारु मनी...
स्वच्छ करू धरती
मंत्र जपा हा ध्यानी..
लावू आपले हे जीवन
सत्कारणी...
✍सगर पंढरी हणमंतराव✍
प्रा.शिक्षक धर्माबाद
Sagarpandhari.@gmail.com
8275938319
खुपच छान
ReplyDelete