Monday, 17 October 2016

बालाजी चौधरी, लातूर

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*साहित्य दरबार*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*स्वच्छतेचे महत्त्व*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🌹 *स्पर्धेसाठी* 🌹

मानवी जीवनात खरा सुखाचा पाया कशावर उभा असेल तर तो स्वच्छतेवर.जीवनात स्वच्छतेचे अतिशय महत्त्व आहे.आनंदमय जीवन व्यतीत करायचे असेल तर स्वच्छता पाहिजेच.
*गाव व्हावया निरोगी सुंदर*
*सुधारावे लागेल एकेक घर*
*आणि त्यातुनही घराघरात राहणार*
*करावा लागेल आदर्श*
या संत तुकडोजी महाराजांच्या उक्तिनुसार स्वच्छतेची सुरुवात अगोदर स्वतःपासूनच करावी लागते.
तशी स्वच्छता दोन प्रकारची
*वैयक्तिक स्वच्छता*
*सामुहिक स्वच्छता*
वैयक्तिक स्वच्छतेमध्ये --
दात स्वच्छ ठेवणे , अंघोळ दररोज करणे, नखे वेळेवर कापणे , घरातील सर्व बाबी वेळेतच सातत्याने स्वच्छ करणे दैनंदिन सर्व बाबी नित्य काळजीपूर्वक पार पाडणे.वरील प्रत्येक बाब दातांचं घ्या व्यवस्थित स्वच्छ नाही केले तर ज्याच्यामुळे आपण अन्न सेवन करतो तो अवयव लवकर निकामी होणार .लाखो करोडो रुपये मोलाचा प्रत्येक शरीराचा भाग आहे .त्यामुळे शरीराच्या प्रत्येक भाग नित्य स्वच्छ राहिल याची काळजी घेतलीच पाहिजे.
आता आपण सामुहिक स्वच्छता पाहू.
सामुहिक स्वच्छतेत शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, मलमुत्राची ,सांडपाण्याची योग्य विल्हेवाट झाली पाहिजे .प्राण्यांची योग्य पद्धतीने देखभाल झाली पाहिजे .कचरा विल्हेवाट झाली पाहिजे .
वरील बाबींचे योग्य व्यवस्थापन नाही झाले की मनाला उदासीनता येते.मन उदासीन झाले म्हणजे त्याचा शरीरावर परिणाम ठरलेलाच असतो.
*निरोगी शरीरातच   निरोगी मन  वास करते व मन निरोगी असेल तर शरीर निरोगी ह्या परस्परपूरक बाबी आहेत*.
सामुदायिक ठीकाणे तर आपल्या देशात आरोग्यासाठी अतिशय  धोकादायक झालेली आहेत.सिनेमागृह ,बसस्थानक, रेल्वेस्टेशन ,महाविद्यालये ही ठीकाणे आत्यंत घाणीचे साम्राज्य बनली आहेत.संत तुकडोजी महाराज म्हणतात....
" *गावच जरी उत्तम नसले*
*तरी देशाचे भविष्य ढासळले*
*ऐसे मानावे ज्याने त्याने भले*
*हृदया माजी*
या उक्तिप्रमाणे प्रत्येकाने असे ठरवले पाहिजे  की मी कुठेही घाण करणार नाही .जर एखादे ठीकाण आपण अतिशय स्वच्छ ठेवले .तिथे एखादा पानसुपारी खाणारा असला तर त्यालाही तिथे घाण करावी वाटणार नाही.अशा रीतीने स्वच्छतेच्या नैतिकतेने अस्वच्छतेचा नायनाट करावा लागेल.
आज शहरी भागात तर डासांचा प्रचंड प्रमाणात उत्पात होतोय डेंगू ,मलेरीयासारखे आजार जीवघेण्याइतपत होताहेत ह्याला कोण जबाबदार? आपणच!
थोडी थोडी करुन आपणच वाढवलेले
हे घाणीचे साम्राज्य .पण कोणी मान्य करायला तयारच नाहीत.प्रत्येकाला त्याग , आदर्शवाद दुसऱ्यानीच पाळावा असे वाटत आहे.पण यामुळे आपण सर्वजण आपल्याच हाताने आपला घात करुन घेत आहोत.
*मन करा रे प्रसन्न*
*सर्व सिद्धीचे कारण*
मन तेव्हाच प्रसन्न होईल जेव्हा सगळीकडे स्वच्छता दिसेल.
ही स्वच्छता मानवी मनावर प्रभावी पणे राबवण्यासाठी लोककलांचा वापर केला जावा असे वाटते.ग्रामीण भागात भारुड , गवळण अशा कलामधून तर शहरात मोठमोठया कलाकाराना नाट्याभिनयाद्वारे सातत्याने ह्यांचे प्रयोग झाले पाहिजेत.शौचालयाचा वापर शतप्रतिशत झालाच पाहिजे .लोकांना
उघड्यावर शौचाला बसण्याचे दुष्परीणाम चित्ररुपाने दाखवून जागृत केले पाहिजे .
*अस्वच्छता म्हणजे मानसिक हिंसाच होय*.
सार्वजनिक ठीकाणे पाहुन मनाला घृणा वाटते  त्या मुतारी , शौचालयाची अवस्था पाहून तिथे जाऊच नये इतकी घाण असते. तसे यामध्ये प्रशासनाच्या पण तेवढ्याच चुका असतात.प्रशासनाने पण दक्ष राहिले पाहिजे .
शाळा ,महाविद्यालये ,बसस्थानके ,सर्व  सार्वजनिक ठीकाणे स्वच्छ असणे अतिशय आवश्यक आहे.या ठीकाणी कडक नियमावलीची गरज आहे.आपण संत गाडगे महाराजांचे गुणगान गातो पण कृतीत मात्र शुन्य आहोत.महाराजांची कृती प्रत्येकाने आचरणात नाही आणली तर सर्वांचे आरोग्य धोक्यात जाणार. रोगराई मान वर काढल्याशिवाय राहणार नाही.
आज नद्या प्रदुषित झाल्या आहेत कारखाने गटाराचे पाणी सर्रास नद्यामध्ये सोडले जात आहेत.पाणी प्रदुषणामुळे शेती प्रदुषित होत आहे.शेतीत डी.ए.पी.,युरीया अशी घातक खते व रसायने फवारुन ते प्रदुषित अन्न सेवन होत आहे शेतीसुद्धा स्वच्छ असणे गरजेचे आहे.
सेंद्रिय तत्त्वावर शेती झाली पाहिजे.
शेवटी स्वच्छता प्रत्येक माणूस, गाव ,शहर ,राज्य , एक प्रकारे देशाचे आरोग्यच म्हटले तर वावगे ठरणार नाही .म्हणून प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे .माजी राष्ट्रपती आदरणीय ए.पी.जे.कलाम साहेब म्हणतात.आपण म्हणतो रेल्वेत शौचालय घाण आहे .रस्ते घाण आहेत, बसस्थानके घाण झालीत.पण देशाला देण्यासाठी दहा मिनीटे वेळ आहे का? प्रत्येकाने स्वच्छतेचा मंत्र आपण स्वतः आपल्या मुलाना लावून घेतलाच पाहिजे.
*यापुढे जाऊन स्वच्छता ही अंतर्बाह्य असावी असे वाटते*.अंतरीक स्वच्छतेसाठी योगा प्राणायामाच्या सवयी आपण थोरामोठ्यानी लावुन घेऊन लहानाना लावणे  आवश्यक आहे.अंतःकरण पण स्वच्छ असलेच पाहिजे ,तेव्हाच बाह्य स्वच्छता होत राहणार.माझा भारत स्वच्छ राहिला तरच आपण शक्तिशाली राहू निरोगी राहू.
शेवटी असं अंतःकरणपुर्वक काही बाबी उद्घोषित कराव्या वाटतात.

🔹 *स्वच्छतेविषयी प्रत्येक कृती*
*देई आरोग्याला गती*
🔹 *घ्या महत्त्व स्वच्छतेचे ध्यानी*
*व्हा निरोगी जीवनाचे धनी*

🔹 *वैयक्तिक स्वच्छतेची महती*
       *रोगापासून मिळेल मुक्ती*
🔹 *ज्याचे घरी नित्य स्वच्छता*
      *नांदेल तेथे कायम सुबत्ता*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*चौधरी बालाजी सर*
*स.क्र.* *82*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment