।।स्पर्धेसाठी।।
।।शेतकरी जगला तरच देश टिकेल।।
भारताला स्वातंत्र्य मिळालं आणी देशाची राजकीय घडी बदलली.ब्रिटीशांच्या काळात कच्चा माल भारतातून परदेशात निर्यात व्हायचा व पक्का माल आयात करून तो भारतात विकला जायचा.
म्हणजेच काय तर उत्पादन दुसऱ्या देशात व्हायचे म्हणजे रोजगार दुसऱ्या देशाला मिळायचा व वस्तू विकत घेणारे आपण,पैसे मिळायचे ब्रिटीश सरकारला म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था किती डळमळली होती ह्याचा फक्त विचारच केलेला बरा.
थोडक्यात काय तर ब्रिटीशांच्या कालावधीत आपला सुजलाम सुफलाम देश फक्त आणी फक्त गुलाम बनून राहिला होता.आपले कुशल कारागीर जे विवीध हस्तकलां मधे प्रविण होते त्यांचा व्यवसाय तर पुर्ण नामशेष झाला.एकेकाळी म्हणजे ब्रिटीशांची वाईट नजर आपल्या देशावर पडण्या पुर्वी आपल्या भारतीयांनी बनविलेल्या सिल्क साड्यांना परदेशात खुपच मागणी होती.इथल्या हस्तकला,भरतकाम,विणकाम व इतर कलाकुसरीं साठी भारत देशाचं नांव आदराने घेतलं जात होतं.नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला असा आपला देश होता.परंतू ब्रिटीशर्स नावाची वाळवी आपल्या देशाला लागली आणी सारच संपलं.
जसे आपण ब्रिटीश सरकारला "चलेजाव"चा इशारा केला व देशात स्वातंत्र्याचा झेंडा फडकला,त्याच बरोबर एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला,ह्या पुढे जर देशाला पारतंत्रातून बाहेर काढायचं असेल तर एकच गोष्ट पाळावी लागेल ती म्हणजे स्वनिर्भरता. म्हणूनच भारत सरकारने अन्न,वस्त्र व निवारा ह्या मुलभूत गरजा भागविण्या साठी कुठल्याही देशाकडे हात पसरवले नाहीत व सर्वप्रथम शेतीप्रधान बनण्याचा निर्णय घेतला.अशाप्रकारे जो देश आत्मनिर्भर असतो,तो कधीही पारतंत्र्यात जावू शकत नाही ही गोष्ट भारत सरकारच्या लक्षात आली व शेतकऱ्यांना मानाचा दर्जा देण्यात आला.
स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची परिस्थिती इतकी खराब होती,की खाणारी दहा तोंडं व कमवणारे फक्त दोनच हात.थोडक्यात काय तर देश फारच वाईट प्रसंगाला तोंड देत होता.कमी श्रमात जास्त शेतीतून उत्पन्न काढणं गरजेचं होतं.म्हणून हरीतक्रांती घडवण्यात आली.पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या.
पंजाब ह्या राज्यात आधुनिक पद्धतीने उत्पादन सुरू करण्यात आले.कमी श्रमात,कमी पाण्यात व खते वापरून वर्षभर जास्त उत्पन्न काढण्याची मोहीम सुरू झाली.तिथल्या शेतकऱ्याला मुबलक सुविधा उपलब्ध करून दिल्या.नवीन प्रकारच्या बियाणांचा वापर व आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने देशात हरीतक्रांती घडून आली.हळूहळू देश निर्भर होत गेला.शेतकरी दादा हा भारत देशाचा कणा ठरला व पुन्हा त्यास मानाचे स्थान मिळत गेले.द देशाला खोल खड्ड्यातून बाहेर काढण्यास शेतकरी दादाच पुढे आला.
परंतू म्हणतात ना कलियुगाचा भस्मासूर हा स्वत:च स्वत:चे नुकसान करतो आहे,अगदी तसेच झाले.ज्या शेतकऱ्याच्या जिवावर आपण निश्चिंत होवू पाहत आहोत त्याला मात्र सुविधा उपलब्ध करून देण्यात कंजुषी व्हायला सुरूवात झाली.निसर्गाच्या कोपात आधीच होरपळलेला माझा शेतकरी आता राजकारणी व लबाड लोकांच्या तोंडी बळी पडण्यास सुरूवात झाली.पुन्हा एकदा देशाला किड लागली होती.ह्या वेळी ती किड देशातल्याच किड्याने लावली होती.स्वार्था पोटी माणूस आपल्याच लोकांची लुबाडणूक करू लागला.सरकारने गरीब शेतकऱ्यां साठी निर्माण केलेला निधी नेते व मोठे मोठे शेतकरीच लुटायला लागले.गरीब शेतकरी अजूनच गरीब व्हायला लागला.जमीनदारांची मक्तेदारी वाढू लागली.बेंकानी पण कर्ज देण्यास नकार दिला.नेत्यांची लबाडी,कर्जाचा भार , कुटूंबाची जबाबदारी व निसर्गाचा कोप ह्या चक्रव्युहात शेतकरी सापडला व त्याच्या समोर आता एकच सोपा मार्ग उरला होता.....तो मार्ग अतिशय दुखकारक असला तरी माझ्या शेतकरी दादा पुढे पर्याय नव्हता....हो तोच मार्ग...अंतिम मार्ग...आत्महत्या....आत्महत्या....आत्महत्या...
खुप सोप्प असतं दुसऱ्याला अक्कल शिकवणं पण जेव्हा घरात पोटच्या पोराला द्यायला अन्नाचा कण नसतो तेव्हा सर्वांची पोटं भरणारा माझा शेतकरी हाच मार्ग पसंद करतो.लेकरं एक दिवस,दोन दिवस उपाशी राहतील पण तिसऱ्या दिवशी त्यांची काय परिस्थिती होईल ह्याची कल्पनाच केलेली बरी.भरल्या पोटानं जर विचार केला तर आपण शेतकऱ्याची दु:ख नाही समजू शकणार त्या साठी तीन दिवस उपाशी राहून पहा मग समजेल आपल्या पोटच्या गोळ्यां पुढे अन्नाचा कण नाही ठेवू शकलो तर दिसतो तो फक्त फाशीचा फंदा......
तर आपणा सर्वांच्या लक्षातच आलं असेल,ज्या देशाला पारतंत्रातून यशस्वी पणे बाहेर काढणारा हा शेतकरी व त्याचे कुटूंब जर अर्धपोटी राहीले तर मित्रांनो तो काळा दिवस दूर नाही ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही...हो तोच दिवस...पुन्हा एक गोरा माणूस भटकत भटकत भारतात येईल व इथल्या अन्नदात्याची परिस्थिती पाहून हळूच आपलं बस्तान बसवेल...बस्तान तर तो इथे सोडूनच गेला आहे... फक्त त्याच्या येण्याचाच अवकाश आहे...
जर हे सगळं टाळायचं असेल तर आपल्या अन्नदात्याला,आपल्या शेतकरी दादाला सर्वतोपरी मदत करा व स्वातंत्र्याची फळं सर्वांनी मिळून खा.
शेवटी मी एकच म्हणेन,
"दादा,तू आहेस म्हणून मी आहे
तू आहेस म्हणून आम्ही आहोत
तू आहेस म्हणून देश आहे.
तू जगलाच पाहिजे...
तुला लाख लाख वंदन"
----------++++समाप्त++++---------
सौ.मनिषा वाणी.
सुरत.२३.१०.२०१६.
०९४२६८१०१०९.
maw7097@gmail.com.
.... @2 @2 @2 ....
★★★★★★★★★★★★★★★★★★
।।स्पर्धेसाठी।।
।।स्वच्छतेचे महत्व।।
"ए आई,हे काय करतेस? गाडीतून कुणी कचरा बाहेर टाकतं का?जमा कर एका पिशवीत,आपण नंतर उतरू तेव्हा कचऱ्याच्या डब्यात टाकू...."
माझी दहा वर्षांची लेक मला दम देत बोलू लागली.
सुरूवातीला मला ही गोष्ट खुपच खटकली,परंतू नंतर विचार केला,काय वाईट होतं हो तिचं बोलणं?
अगदी माझी आई असल्या सारखी हक्काने मला माझी लेक सांगत होती.त्याच वेळेला मला खात्री पटली,भारताचं भविष्य खुपच उज्वल आहे.आज प्रत्येक शाळेत स्वच्छते बाबत,पाणी वाचवण्याबद्दल व प्रदूषणा पासून बचाव करण्या बद्दल खुपच सुचना दिल्या जातात.अगदी तीन ते चार वर्षांची मुलं सुद्धा खुपच जागरूक झाली आहेत.स्वच्छता काय आहे व ती कशी ठेवायची ही आजच्या बालकांना पालकांनी सांगायची गरजच नाही.उलट त्या बाबतीत तेच आपले गुरू आहेत.
ही मानसिकता बदलण्या मागचं काय कारण असावं?हाच विचार,हीच जागरूकता आमच्या वयाच्या व त्या आधीच्या पिढीत का नव्हती?आजची पिढी किती आत्मविश्वासू बनत चाललीय.गाडीत बसल्या बसल्या माझं मन एक वेगळाच विचार करू लागले.
आपण नेहमी आपल्या मुलांना बोलतो,आमच्या वेळेला असं नव्हतं,आम्ही हेच करायचो,तेच बोलायचो पण खरच का आपण ह्या मुलांपेक्षाही सुधारलेलो आहोत का?त्यांची ह्या वयातली मानसिकता व आपली त्याच वयातली मानसिकता ह्यात जमीन आसमानचा फरक आहे.आपण लहान असतांना दिवसभर बाहेरच हुंदडायचो.घरी फक्त जेवण व झोप ह्यासाठीच यायचो.बाहेरचं जग हेच आपलं विश्व होतं.मातीत खेळणे,बागेत हुंदडणे,तऱ्हतऱ्हेचे मैदानी खेळ आपण खेळत होतो.किती निरागस होतो तेव्हा आपण.त्या वेळी आपण कुठेही थुंकायचो,शु-शी करायला खेळ सोडून घरी कोण जाईल म्हणून आजूबाजूलाच आडोसा शोधायचो,बागेतल्या फुलांना नाजूकपणे हाताळायचं असतं हे सुद्धा आपणास ठाऊक नव्हतं.तसं पाहिलं तर आपण निसर्गाच्या सोबतच जास्त वेळ राहात होतो.परंतू त्या वेळी आपल्या मनास हा प्रश्न कधीच पडला नाही,ह्या निसर्गाची आम्ही काळजी घेतली पाहिजे.कचरा रस्त्यात फेकणं गैर आहे हे सुद्धा त्या बालमनास कळत नव्हतं.शाळेत आम्हाला ह्या बाबतीत वारंवार सुचना देखील दिल्या जात होत्या परंतू आमचं मन ते अंमलात आणत नव्हतं.असं समजा ते करायची आमची मानसिकताच नव्हती.
बोरं,चिंचा,कैरी व शेंगा खावून झाल्यावर त्या टरफलांचा व बियांचा उपयोग फक्त आणी फक्त मित्र मैत्रिणींना मारण्या साठीच असतो एवढच आपणास माहित होतं.आजकालची मुलं तर प्रत्येक फळांच्या बिया जपून ठेवतात व पावसाऴ्यात मोकळ्या जागी पेरतात.
हा बदल खरच किती अनपेक्षित आहे.मुलां कडून आपणास ह्या गोष्टींचे ज्ञान मिळते तेव्हा वाटून जातं,त्याच वेळी आमच्या व आधीच्या पिढ्यांनी स्वच्छते बाबत अशीच काळजी घेतली असती तर आज कदाचित आपल्या देशात घाणीचे साम्राज्य कमी दिसले असते,प्रदूषणाचा जन्मच झाला नसता व निसर्गाचा ऱ्हासही झाला नसता.
खरच हा निसर्ग आपणांस अनादी काला पासून इतकं काही देत आहे परंतू आपण निसर्गाची परतफेड करण्यात अपयशी ठरलो.आज ह्या नैसर्गिक आपत्ती जशा की,पूर,भुकंप व दुष्काळ हे जे होत आहेत त्यास आपलीच मानसिकता कारणीभूत आहे.खरच स्वच्छतेची सुरूवात जर करायची असेल तर सर्व प्रथम आपणास आपल्या डोक्यातला जुनाट कचरा काढून फेकावा लागेल.पुर्वीच्या चुकांची शिक्षा भोगायची तयारी असेल तर कमीत कमी प्रत्येक व्यक्तीने एका वर्षात शंभर तरी रोपं लावली पाहिजेत व कचरा हा कचरा पेटीतच टाकण्याची शपथ घेतली पाहिजे.जर रस्त्यावरती कुणी थुंकत असेल तर लगेच त्या व्यक्तीला एक नागरीकाचे काय कर्तव्य आहे ह्याची जाणीव करून द्यायला पाहिजे.
"आई,ए आई....अगं हे काय,तू गाडीत बसली आहेस विसरलीस का? आई,तू हातात झाडू असल्या सारखी काय गाडी पुसते आहेस?पप्पा आईची तब्येत बरी नाही वाटतं"माझी लेक चिंताग्रस्त सूरात बोलली.
मी पटकन पुढे होवून माझ्या लेकिचे चरणस्पर्श केले व तिला धन्यवाद देत बोलले,"आज पासून मी स्वच्छता मोहिम स्विकारली व सुरूवात माझ्या डोक्या पासूनच केली".
माझ्यातला बदल पाहून लेक खुपच सुखावली व पतीराजांना आश्चर्य वाटले कारण रेडियो वर लता मंगेशकरांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर गायलेलं गाणं चालू होतं,
"ए मेरे वतन के लोंगो,जरा आंख में भरलो पानी
जो शहिद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी...."
खरच आज त्यांची पत्नी, लाडक्या कन्ये समोर नतमस्तक झाली होती व दोन्ही पिढ्या मिळून नवीन व स्वच्छ भारताचं स्वप्नं साकारणार होती.चला तर मग आज सर्व मिळून एक शपथ घेवू,स्वच्छ भारत साकारण्याची प्रतिज्ञा घेवू.
।।।जयहिंद,जय भारत।।।
सौ.मनिषा वाणी.@2
सुरत.१६.१०.२०१६.
०९४२६८१०१०९.
mail id-maw7097@gmail.com
No comments:
Post a Comment