Monday, 17 October 2016

निता अरसुळे

स्वच्छतेचे महत्त्व

           ‘ जिथे स्वच्छता असे, तिथे लक्ष्मी वसे ‘

      पूर्वापार काळापासून हिंदू संस्कृतीत स्वच्छतेला महत्त्व दिले आहे. घरातील स्त्रिया पहाटे उठून  घर- अंगण, परसदार झाडून घेत आणि सडा-रांगोळी काढत असे. एकूणच स्वच्छता केल्याने वातावरण आनंदी व प्रसन्न वाटत असे त्यामुळे कामात यश आणि लक्ष्मी म्हणजे समृद्धी संपदा प्राप्त होते ! परिसर स्वच्छता बरोबर वैयक्तिक स्वच्छता अतिमहत्त्वाची आहे , कारण परिसर स्वच्छ आहे आणि तुम्ही शारीरिक अस्वच्छ असले तर त्याचा त्रास इतरांना होतो. दुर्गंधी, संसर्गजन्य आजार होतात. तुम्ही रस्त्याने एखादी व्यक्ती वेड्यासारखी मळके कपडे, आजाराने ग्रस्त पहिली असेल आपणाला त्या व्यक्तिकडे पाहावेसे वाटत नाही तर खूप किळस येते. म्हणून स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करायला हवी, कारण स्वच्छता आणि आरोग्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आरोग्य हवे असेल तर स्वच्छता ठेवावी मग हि शारीरिक असो कि परिसरातील असो.

         वैयक्तिक स्वच्छतेची सुरुवात हि सवयी अंगीकारण्यापासून होते. दररोज अंघोळ करणे, नखे दर आठवड्याला कापणे, केस दर महिन्याला कापणे इ. शालेय जीवनात या सवयी रुजतात. प्रत्येक शाळेत कटाक्षाने या सवयी रुजविण्याकडे लक्ष पुरविले जाते. शालेय गणवेश स्वच्छ असणे, केस नीट तेल लावून विंचरलेले असावे, दात घासलेले असावे, नाक कान स्वच्छ असावे. परीपाठाच्या वेळेत स्वच्छतेविषयक तपासणी केली जाते. चेहरा आनंदी असवा याची चाचपाणी विद्यार्थ्यांनी करावी म्हणून प्रत्येक वर्गात आरसा, पावडर, हातरुमाल ठेवलेला असतो. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे घोषवाक्य, गाणी, गोष्टी शिकविल्या जातात. ताप, सर्दी, खोकला असे संसर्गजन्य आजार हाताच्या स्पर्शाने होतात. आपले हात स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे कारण जेवणाअगोदर हात न साबणे न धुतल्यास हातावरील जंतू पोटात जातात. तसेच शौचास जाऊन आल्यानंतर हात धुण्याची सवय असावी याचे महत्त्व जाणून १६ ऑक्टोबर ‘जागतिक हात धुवा दिन’ म्हणून राबविला जातो. या दिनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक दिग्दर्शनासह करवून घेतात.यासाठी शासनाने खास निधी उपलब्ध करून प्रत्येक शाळेत हान्दवाश स्टेशन तयार क्ले आहेत.  जसे हाताचे तळवा इन्फेक्शन होण्यास कारणीभूत आहे तसा पायाचे तळवे स्वच्छ ठेवण्यासाठी चप्पल वापरणे उपयुक्त ! नाहीतर पायाला नारू गळू हत्तीरोग असे आजार होतात. म्हणूनच कि काय गांधीजीनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वच्छतेला महत्त्व दिले आहे. त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळविण्यासाठी आश्रम स्वतः स्वच्छ करण्याची अट पाळावी लागत असे. जपानमध्ये शाळेत मुले स्वतः शाळा स्वच्छ करण्याचा उपक्रम राबवितात. आपल्या शाळामध्ये हि मुले स्वच्छ शाळा करण्यास उत्सुक असतात,

“एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ”

म्हणत शाळेचा परिसर लख्ख करतात ! भारत शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत स्वच्छ शाळा पुरस्कार योजना २०१६ वर्षापासून सुरु केली आहे. या योजनेतून ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ करण्याचा सर्वांचा जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

      शारीरिक स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता म्हणजे शुद्धता हवी. तुकाराम महाराज म्हणतात

“नाही निर्मळ जीवन | काय करील साबण ||

तैसे चित्त शुद्ध नाही  | तेथे बोध करील काई ||

मन शुद्ध नसेल तर साबण काहीच करू शकत नाही, मन योग्य ध्येयाच्या दिशेने असेल तर सर्व सिद्धी यश प्राप्त होते. वाचन, चंद असल्यास वाईट विचार येत नाहीत, यशस्वी जीवनाचा अनुभव येतो. संत गाडगे बाबांनी  हातात झाडू घेवून स्वच्छता दिवसभर करत मग संध्याकाळी कीर्तनातून मन पवित्र शुद्ध करत म्हणजे बाह्य व आंतरिक स्वच्छता प्रत्येकास गरजेची आहे.

      वैयक्तिक स्वच्छता ते शाळा स्वच्छता नंतर गाव, शहर स्वच्छता होण्यासाठी शासनाने निर्मल ग्राम पुरस्कार २०१२ पासून त्याअगोदर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २००० सालापासून राबवीत आहे. यात आतापर्यंत अनेक गाव शहरांनी सहभाग घेत स्वच्छतेचा आदर्श ठेवला आहे. आन्ना हजारे यांचे राळेगणसिद्धी आणि हिवराबाजार स्वच्छ ग्रामचे उदाहरण आहे. या योजनेत प्रत्येक गावातील घर, रस्ता, पाण्याची व्यवस्था, शौचालय वापर, सांडपाण्याची व्यवस्था, कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे असावी लागते. एकोणीसाव्या शतकात प्लेगची साथ पसरली तेव्हा उंदराचा सुळसुळाट झाला होता कारण घरातील अस्वच्छता ! घरातील स्वच्छता दर आठवड्याला करावी तर जाळे जळमटे, भांडे कपड्याची स्वच्छता करावी. गेल्या १-२ दशकात उवा पिसवे ढेकुण झुरळ चे प्रमाण जास्त होते. त्यामुळे घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असत. याकरिता पेस्टीसाईड कॅन्ट्रोल शहरात दर ३-६ महिन्याला करवून घेतात. मेडीकल स्टोरमध्ये झुरळ माश्या मारण्याची औषध मिळतात. यामुळे घरात स्वच्छता राहील. आरोग्य विभागामार्फत स्वच्छ अन्न , स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा प्रत्येक व्यक्तीला मिळावी हा प्रयत्न असतो. याकरिता कर्मचारी व अधिकारी वर्ग लोकांना मार्गदर्शन करतात. पाण्याची शुद्धता तपासून सांगतात कि कोणत्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी व स्वच्छतेसाठी करावा. झाकलेले अन्न खावून संसर्गजन्य आजार टाळावे.  कचऱ्याचे व्यवस्थापन स्थानिक शासन संस्था जसे महानगरपालिका घंटागाडी द्वारे करते. सांडपाणी जाण्यासाठी झाकलेली गटारे असावीत. उघड्यावर सांडपाणी असल्यास मच्छर होऊन डेंग्यू,मलेरिया आजार पसरतात. आरोग्य विभाग प्रादुर्भाव होऊ नये म्हणून असह ठिकाणी फवारणी करतात. तसेच स्वच्छ हवा महत्त्वाची कारण गाड्याच्या वापराने हवा प्रदूषित होऊन श्वसनाचे विकार होतात. झाडे हवा शुद्ध करतात म्हणून पर्यावरणप्रेमी संस्था, शासकीय विभागामार्फत वृक्षारोपण केले जाते. दिल्ली शहरात हवेची शुध्दता वाढविण्यासाठी गेल्या वर्षी सम ऑड नंबर गाड्यांचे वाहतुक करण्याचा प्रयोगशील प्रयत्न केला आहे.

“आम्ही सांगू परोपरी ,शौचालय बांधा घरोघरी”

           सनीटेशनमध्ये शौचालय व्यवस्था विचारात घेतली जाते. आपण आजही भारतात पाहतो कि प्रत्येकाजवळ मोबाईल आहे पण घरी शौचालय नाही ! भारत शासनाच्या निर्मल ग्राम योजनेतून एका कुटुंबामागे एक शौचालय गृह बांधण्यास निधी उपलब्ध करून देत आहे. ग्रामीण शहरी भागात प्रातर्विधी करण्यासाठी उघड्यावर जातात. त्यामुळे आजारांना निमंत्रण दिले जाते ! आपल्या संस्कृतीला न शोभणारी पुरुष स्त्रिया यांना हि लज्जास्पद बाब आहे. अनेक कामाच्या ठिकाणी बाथरूम नसल्याने स्त्रीया नैसर्गिक विधीच्या विरुद्ध जातात व किडनीच्या आजारांना बळी पडतात, कारण शरीर स्वच्छतेचे कार्य किडनीकडे असते. शरीरासाठी बाथरूमला जाणे आवश्क्या आहे . आता सार्वजनिक ठिकाणी स्त्री-पुरुष वेगळे शौचालय आहेत. परंतु पाण्याचा वापर करून शौचालय गृह स्वच्छ ठेवणे तितकेच गरजेचे आहे.

       स्वच्छ भारत मिशन मध्ये स्वच्छ शहरे (स्मार्ट सिटी) योजना आहे. निवड केलेल्या शहराना सुव्यस्थित रस्ते, रचना करण्यासाठी निधी दिला आहे. कारखानदारीला सुरुवात झाली तेव्हा गलिच्छ वस्त्या, झोपडपट्ट्याचे प्रमाण वाढले या अस्वच्छतेतून राहणीमान दर्जा खालावला. मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी धारावी झोपडपट्टी आहेत त्या ठिकाणी आता पुनरचना करताना इमारती होणार आहेत. शासनाने कितीहि योजना दिल्या तरी आपल्या सवयी महत्त्वाच्या आहेत. शहरात कुत्रे असे पाळीव प्राणी घरी पाळतात पण ते प्राणी रस्त्याने घाण करू नये याची काळजी घ्यावी. नद्यांचे प्रवाह स्वच्छ ठेवण्यासाठी सांडपाणी नदीत सोडू नये. केंद्र शासनाने ‘गंगा नदी शुद्धी प्रकल्प’ यशस्वी केला आहे.

‘स्वच्छ भारत का इरादा कार लिया हमने ,ये वाद कार लिया हमने’

      ‘अतुल्य भारत‘ हि आपली पर्यटनाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, परंतु नागरिकांच्या सवयी स्वच्छतेच्या नसल्याने रस्त्यावर कचरा फेकणे, थुंकणे,सार्वजनिक ठिकाणी नासधूस करणे हानिकारक आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या प्रेरणेने स्वच्छ भारत करताना एका कुणाची जबाबदारी नसून सर्वांच्या सवयी स्वच्छतेला पूरक असाव्यात. बऱ्याच ठिकाणी मोठ्या मंडळी  झाडू हातात घेऊन फोटो काढेपर्यंत मिशन असते नंतर काहीच स्वच्छता नसते असा विरोधाभास आपण पाहतो तरी काहीजण प्रत्यक्ष हरघडी योजनेचा पाठपुरावा करतात. सर्वांनी खारीचा वाटा उचलत आपल्या परिसर स्वच्छ ठेवल्यास आपला भारत जगात अतुल्य नक्कीच होईल !     
             
निता आरसुळे -तांबे  
जालना                                     
मो. नं ८६५२४५००३२                
email Id :-  neetaarsule@gmail.com

No comments:

Post a Comment