Thursday, 29 September 2016

प्रास्ताविक

*साहित्य दर्पण - 2016*

सदारील पुस्तक आपल्या हातात देताना मनस्वी आनंद होतो आहे. सोशल मीडियातील whatsapp सारख्या ग्रुप मधून काही चांगले काम करता येते हे दाखवून द्यायचे काम *साहित्य दर्पण* या whatsapp ग्रुपने केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती दिवसाच्या निमित्ताने उस्मानाबाद येथील प्राथमिक शिक्षक अप्पासाहेब सुरवसे नांदेड मधील नासा येवतीकर या दोघांनी मिळून साहित्य दर्पण नावाचे एक ग्रुप तयार केले. ज्याच्या उद्देश्य फ़क्त आणि फ़क्त साहित्याची सेवा करायची.
यासाठी राज्यभरातील लेखक , कवी आणि कादंबरीकार अशा साहित्यिक लोकांची जुळवाजुळव करणे फार कठीण गोष्ट असते. पण महिना भरात ग्रुप वरील साहित्यिक मित्रांची संख्या 50 ते 60 च्या घरात पोहोचली. ग्रुप मध्ये खोगीरभरती करून संख्या वाढवायाची नव्हती. सर्व च्या सर्व लोक पारखुन घेण्यात आली होती त्यामुळे प्रत्येक जन ग्रुप च्या नियमचे पालन करीत होते नैव्हे करणे गरजेचे होते. ग्रुप ची नियमावली तयार करण्यात आली आणि त्या दिशेने मग वाटचाल ही चालू झाली.
कॉपी पेस्ट च्या ऐवजी स्वतः च्या साहित्य निर्मिती ला येथे जास्त वाव देण्यात येतो. त्यासाठी ग्रुप संयोजक कडून वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात येते.
दर रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत साहित्य दरबार नावाची स्पर्धा घेतली जाते ज्यात ठरवलेल्या एका विषयावर सुमारे 700 ते 1000 शब्दापर्यन्त वैचारिक लिहिण्याची स्पर्धा घेतली जाते. त्या स्पर्धेचा निकाल दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता जाहीर करण्यात येतो. जे लेख सुंदर आणि उत्कृष्ट लिहिन्यात येतात त्या लेखास महाराष्ट्रातील विविध वृत्तापत्रतुन प्रकाशित करण्यासाठी संयोजका मार्फत पाठविले जातात. कोणी कोणाची कॉपी न करता आपले स्वतंत्र मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात आणि यातून नविन साहित्य निर्माण केल्या जाते.
याच पद्धतीने

मंगळ वारी - चित्र शलाका
गुरुवार - नाद चारोलीचा
शनिवार - मुक्त कविता लेखन

अश्या स्पर्धा घेतल्या जातात त्यामुळे येथे दर वेळी नविन साहित्याची निर्मिती होते
त्यानंतर या ग्रुप मधील काही निवडक मित्र एकत्र येऊन साहित्य दर्पण नावाचा पुस्तक काढण्याचा विचार व्यक्त केला. ज्यात कविता चारोली वैचारिक लेख गझल कथा या साहित्य प्रकारचा समावेश करण्याचे ठरविन्यत अले. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता 25 डिसेंबर 2016 रोजी साहित्य दर्पण हे विविध रंगी आणि विविध अंगी पुस्तक आपल्या समोर प्रस्तुत करीत आहोत.
मला माहित आहे यातील कवी कवयित्री लेखक लेखिका नवख्या आहेत मात्र त्यांचे साहित्य दर्जेदार आहे यात शंका नाही. आपण एकदा हे पूर्ण पुस्तक ओळ न ओळ वाचून काढावी मला खात्री आहे आपणास हे पुस्तक नक्की आवडेल. तेंव्हा त्यांचा मोबाईल क्रमांकावर फोन करून त्यांना शुभेच्छा द्यायला विसरु नका.

धन्यवाद

एडमिन कोअर कमिटी ,
साहित्य दर्पण समूह

No comments:

Post a Comment