Monday, 17 October 2016

शैलजा ओव्हळ, बीड

              *स्वच्छतेचे महत्व*

            *Cleanliness* *Is* *Next* *To* *Godliness*
             मानवी जीवनात स्वच्छतेला अनन्य साधारण महत्व आहे. A Sound Mind In A Sound Body. मानवी शरीर हे एक देवालय आहे. मन/आत्मा हा त्यातील देव आहे. शरीर निरोगी असेल तरच मन निरोगी राहील,आणि जर शरीर निरोगी ठेवायचे असेल तर स्वच्छतेचा अवलंब केला पाहिजे.
              स्वच्छतेमध्ये दोन गोष्टींचा विचार करायला पाहिजे. 
                1) वैयक्तिक स्वच्छता 
                2) सार्वजनिक स्वच्छता 
*वैयक्तिक* *स्वच्छता*
              वैयक्तिक स्वच्छतेमध्ये शारीरिक स्वच्छता, खाण्या-पिण्याच्या सवयी, घर व परिसर स्वच्छता यांचा अंर्तभाव होतो.दररोज अंघोळ करणे,सकाळी व संध्याकाळी दात घासणे, नियमित नखे कापणे,जेवणापूर्वी व शौचावरून आल्यावर हात धुणे,कचरा रस्त्यावर इतरत्र न फेकणे,उघड्यावर शौचास न जाणे,खोकताना शिंकताना तोंडावर रूमाल धरणे इत्यादि गोष्टीतून आपण वैयक्तिक स्वच्छता साधू शकतो.
     "वैयक्तिक स्वच्छतेची महती। 
       रोगापासून मिळे मुक्ती।" 
            शारीरिक स्वच्छते बरोबरच मनही स्वच्छ असले पाहिजे."नाही निर्मळ मन,काय करील साबण" मनाच्या स्वच्छतेसाठी  चांगल्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. चांगले विचार, चांगल्या माणसांच्या सहवासात राहिले पाहिजे. सतत कार्यमग्न असावे. 
         *सार्वजनिक* *स्वच्छता*
                     "आरोग्य संपन्न किंवा निरोगी पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करण्याची वृत्ती किंवा प्रक्रिया सार्वजनिक स्वच्छता." 
        सार्वजनिक स्वच्छतेमध्ये, 
      1) पाणी व्यवस्थापन ( पिण्याचे पाणी)
      2) सांडपाणी व्यवस्थापन 
      3) कच-याची योग्य विल्हेवाट
      4) शौचालयाचा वापर व स्वच्छता 
      5) शाळा व गाव परिसर स्वच्छता 
             इत्यादि गोष्टींचा समावेश होतो.
        *पिण्याचे* *पाणी* स्वच्छ असावे. पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईन ते पाण्याचे शुद्धीकरण याची योग्य काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे साथीचे रोग पसरणार नाहित.
           *सांडपाण्याचे* *व्यवस्थापन* योग्य रीतीने केले पाहिजे.त्यासाठी शोष खड्ड्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे दुर्गंध पसरणार नाही  व परिसर स्वच्छ राहिल.
            *कच-याचे* *व्यवस्थापन* खेले पाहिजे. ओला व सुका कचरा वेगळा केला पाहिजे. गांडूळ खत, गोबर गॅस सारखे प्रकल्प राबविले पाहिजे. 
              *शौचालयाचा* वापर केला पाहिजे.
     "जो शौचालयाचा आग्रह धरी 
       तो कुटुंबाचे आरोग्य उद्धरी" 
                  उघड्यावर शौचास जाण्यामुळे दुर्गंध व रोगराई पसरते. प्रत्येकाने शौचालयाचा वापर केला पाहिजे व त्याची स्वच्छता राखली पाहिजे. 
              *शाळा* व *गावपरिसर* स्वच्छ ठेवला पाहिजे. त्यायोगे संपूर्ण गावाची स्वच्छता राखली जाईल.  
                *स्वच्छता* व *समृद्धी* या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वच्छतेतूनच आपण समृद्धी कडे वाटचाल करू शकतो. देशाचे हित साधायचे असेल सक्षम पिढी घडवायची असेल तर स्वच्छतेला पर्याय नाही.
             चला तर मग आपण स्वतः, आपले घर, आपला परिसर, व आपला भारत स्वच्छ राखूया.

               शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                          बीड
                        @ 73
                📱 9657435292
            shailajaovhal1980@gmai.com

          स्पर्धेसाठी
        

No comments:

Post a Comment