Monday, 17 October 2016

निता आंधळे, अहमदनगर

🌹स्पर्धेसाठी🌹
🌟स्वच्छतेचे महत्व🌟
"उगवला नारायण
प्रभा आलीया दारात
स्वच्छ करा दार आंगण
लक्ष्मी येईल घरात."
या जात्यावरच्या ओवीने एकच गोष्ट लक्षात येते की पुर्वी पासूनच स्वच्छतेबाबतचा संदेश कळतनकळत दिला जायचा.लहान असताना पाहीलय की सकाळी सकाळी प्रत्येक बाईच्या हाती झाडू असायचा.आणि अंगण स्वच्छ करून सडारांगोळी घातलेली असायची.खुप प्रसन्न वाटायच.हळुहळु परिस्थिती बदलत गेली, घाणीचे साम्राज्य वाढू लागले, रोगराई वाढल्या, प्रदुषण वाढले.आणि स्वच्छतेबाबतची जागरूकता वाढवण्याची गरज भासू लागली.तसे गाडगेबाबासारखे स्वच्छतेचे दूत आपल्यापरीने लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत गावेच्या गावे स्वच्छ करीत होते.आपले दार स्वच्छ करून दुस-याच्या दारात कचरा टाकणे म्हणजे स्वच्छता का? हा प्रश्न पडतो.यासाठी इतर स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता करणेही गरजेचे आहे. काय चांगले काय वाईट याचे संस्कार होणे गरजेचे आहे.
      माझ्या शाळेत प्रसाधनगृहात मुले मुली बाहेरच घाण करायचे.त्यांना सांगितले तुम्ही घरात नैसर्गिक विधी घराच्या दारात, घरात करता का? नाही ना.मग शाळा आपले सर्वाच घर आहे. त्याची स्वच्छता ठेवली पाहीजे. कचरा कचराकुंडीतच टाकायचा.मुलांवर या गोष्टीचा खुप चांगला परिणाम दिसून आला.स्वच्छतेबाबत सुधारणा झाली.
      भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजींनी स्वच्छता अभियानासाठी जनतेला हाक दिली.आणि सर्व देश हातात झाडू घेऊन सज्ज झाला.स्वच्छतेचे महत्त्व सा-यांना पटले.प्रत्येकजन स्वच्छता अभियानात आपला खारीचा वाटा ऊचलू लागला.हळुहळु भारत देश स्वच्छ होऊ लागलाय.पण इतर स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता झाली तर खुन, दरोडे, बलात्कार, मारामारी , दहशतवाद, आतंकवाद, जातीयवाद, धर्माधता यासारखे महारोग कायमचे हद्दपार होतील असे वाटते.तरच स्वच्छता अभियान पुर्ण होऊन देश सुजलाम् सुफलाम् होईल...जयहिंद!
🌹सौ.नीता आंधळे🌹
अहमदनगर
9921997026
     🌟22🌟

No comments:

Post a Comment