Sunday, 23 October 2016

Surykant tanmudale

🌱शेतकरी जगला तर देश टिकेल🌱

आपला भारत देश कृषीप्रदान  म्हणजेच शेतीप्रधान म्हणण्यास काहीच हरकत नाही. शेतकरी एक असा माणूस आहे की, जो स्व कष्टाने व स्व बळावरच शेतात राबतो आणि त्या त्या हंगामात कष्ट करून सोन्यासारखे पीक पिकवतो व नेऊन व्यापाराला विकतोअसा महान मानव म्हणजे माझा शेतकरी. शेती ही पुरातन काळापासून चालत अालेली एक प्रथा आहे. शेतकरी असा आहे की त्याने अहोरात्र शेतात जाऊन हाडाच कांड आणि रक्ताच पाणी करून आपल्या शेतात राबून मोत्यासारखे अन्न पिकवतो. खरच मला सांगताना आनंद होते की, शेतकरी असेल तर देश टिकेल अन्यथा मानव  जातीच जगणे मुश्किल होऊन जाईल. शेतीवरच या देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. शेतकरी जगला तर देश जगेल, शेती पिकेल तर शेतकरी टिकेल.
शेतकऱ्यावर बरेच मोठमोठी संकटे येतात. जसे की ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बेसुमार पाऊस व सर्वात मोठा दुष्काळ म्हणजे त्या मालाला मिळणारा कमी बाजारभाव.
अशा अनेक गोष्टीचा त्याग करून देखील तो माल शेवटी व्यापाराला देतो, अन त्यालाच द्यावे लागते, मिळालेलं दाम घेऊन घरी येतो.
या सर्व गोष्टींचा विचार करून माझ्या शेतकऱ्याला विविध प्रकारचे अनुदान उपलब्ध करून द्यावे व पिकांना योग्य भाव द्यावे हेच तर माझ्या कृषी प्रधान शेतकऱ्याची इच्छा आहे.
ह्या सर्व गोष्टी सुरळीत झाल्यास नक्कीच शेतकरी जगेल आणि देश ही ...!

- सुर्यकांत साईनाथ तनमुदले
मु. येवती ता.धर्माबाद जिल्हा नांदेड
9158040598
tanmudlesuryakant@gmail.com

No comments:

Post a Comment