स्वच्छतेचे महत्व
********************
स्वच्छता ही माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे .बाळ जन्माला आले की शीशू केली की लगेच रडते म्हणजे आईला समजते की याचे दुपटे झबले बदलायला हवे.शिशू असतानाच ही स्वच्छतेची जाणिव प्रत्येकाला होते.स्वच्छता आरोग्याशी निगडीत आहे.
जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे हा ही स्वच्छतेचाच भाग.
सकाळी उठल्यापासून स्वच्छतेचे धडे मोठ्यांकडून मुलांना आपोआप मिळत जातात नि शिस्तीने मुले त्याचे पालन करतात
सकाळी उठल्याउठाल्या दात घासणे तोंड धुणे. शौचमुखमार्जन झाल्यावर हात पाय स्वच्छ धुणे काहीही खाण्याच्या आधी नि जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे नि खाल्यांनंतर जेवणानंतर तसेच रात्री झोपताना दात घासून झोपृणे असे बाळकडू आईकडून आजीकडून मुलांना मिळते.नि त्याचे पालनही मुले करतात.
सकाळी घर झाडणे अंगण झाडणे ते रात्रीपर्यंत आईचे हात सतत स्वच्छता करत असतात.त्यामुळे घर स्वच्छ रहाते
घराबरोबरच मनाची स्वच्छता ही महात्वाची.जागरुक आई ते काम करत आसते छोटे छोटे श्लोक मनाचे श्लोक वदवून पाठ करुन घेत असते, त्याला गोष्टीरुपे स्वच्छतेचे माहत्व पटवून देत असते.
कचरा करु नये ,खेळणी जाग्यावर ठेवावी स्वच्छ कपडे घालावे.असे आई घरातील मोठी माणसे सांगत शिकवत असतात.अनुकरणातूनच मुले शिकतात अंगिकारतात.
सार्वजनिक ठिकाणी कचरा करु नये .सहलीला वा फिरायला जाताना कचरा करतात लोक लँस्टिकच्या पिशव्या रस्त्यावर पिकनिक स्पाँटवर तसेच टाकून देतात हे चुकीचे आहे हे मुलांना सांगणे नविन पिढीला स्वच्छतेबाबत जागृत करणे महत्वाचे आहे
स्वच्छतेचा धडा गांधींनी घालून दिला ते स्वतः हातात झाडू घेऊन झाडत कस्तुरबांचीही त्यांना साथ असे .
संत गाडगेबाबा खेड्यात जन्मले पण स्वच्छतेच्या बाबतीत ते अग्रेसर होते.अंगण आवर रस्ते झाडून सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच कीर्तन भजनाद्वारे डेबूजी म्हाणजेच संत गाडगेबाबा लोकांमध्ये जागृती करत त्यांची मनेही साफ करत.लोकमानसातील अंधश्रध्देची जळमटे काढून टाकत.म्हणूनच महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नावे संत गाडगेबाबा अभियान काढून
त्याद्वारे स्वच्छ गावाला(ग्राम) पुरस्कार दिला जातो.
स्वच्छतेमुळे रोगराई होत नाही परिसर स्वच्छ रहातो
आरोग्य चांगले रहाते
अस्वच्छतेमुळे डास माशा कीडे उंदिर यांचा प्रादुर्भाव होऊन रोगराई होते माणसे साथीच्या रोगाला बळी पडतात अजूनही साथीच्या तापाचे थैमान काही शहरात गावात सुरु आहेच याला कारण स्वच्छतेचा अभाव हेच आहे.
मोठ्या शहरात सर्व सोयी आसतात पण लोकसःख्येच्या दृष्टीने त्या कमी भासतात
आर्थिक विषमता हे ही अस्वच्छता फैलावण्यास कारण आहे लोकांतील अज्ञान अंधश्रध्दा यामुळेही अस्वच्छता फैलावते.याबाबत जागृती होणे गरजेचे आहे
गडकिल्यावर लोक सहल काढतात पण तिथे रिकाम्या बाटल्या प्लँस्टिकच्या पिशव्या टाकून येतात आसे होऊ नये काही संस्थांनी याबाबत जागृतीचे काम हाती घेतलले आहे पण ते वैयक्तिकरित्याही पाळले गेले पाहिजे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचे काम प्रत्येकाचे आहे.
गणपती गौरी नवरात्र, यात्रा दिवाळी या काळात जल प्रदूषण वायूप्रदूषण हवेचे प्रदूषण होते त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. मूर्तीदान केले पाहिजे वा घरच्याघरी मूर्ती विसर्जित करुन ते पाणी झाडाला घातले पाहिजे
निर्माल्यकुंडात निर्माल्य विसर्जन झाले पाहिजे. या गोष्टींकडे सजग होऊन पाहिले पाहिजे कचरा कचरापेटीतच टाकला गेला पाहिजे हेच वळण पुढच्या पिढीलाही लावले पाहिजे तरच आरोग्य अबाधित राहिल.
स्वच्छतेची मोहिम राबवून आपले घर आवार परिसर अंगण स्वच्छ ठेवले पाहिजे.
तरच मेरा भारत महान हे चित्र दिसून येईल आरोग्य रक्षण होईल
प्राची देशपांडे
समूह क्र. १५
निगडी प्राधिकरण
Monday, 17 October 2016
प्राची देशपांडे, पुणे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment