🎯साहित्य दरबार स्पर्धा🎯
शेतकरी जगलातर ;देश टिकेल.......
भाबड्या बळीराजाने ओशाळल्या नजरेनं किती सपानं बघावं,प्रश्न रोज मनी एकच आता जगावं कि मरावं.....
शेतकरी हा जगाचा पोशिंदा पण जो सर्वांना पोसतो तोच कायम संकटांच्या वाळवंटात होरपळताना दिसतो.आजची स्थिती पहिलीतर फारच भयानक आहे कितीतरी शेतकरी बांधवानी कधी ओला दुष्काळतर कधी कोरडा दुष्काळ अशा संकटाना मात देता देता हतबल होऊन गळफास घेतला त्याचे कुटुंब आजही त्याच संकटात तरफडत आहेत घरातील करता पुरुष म्हणजे कुटुंबप्रमुख ज्यावेळी असा अचानक जातो त्यावेळी त्याच्या कुटुंबावर काय बेतत असेल यांचा विचार करून अंगाचा थरकाप होतो.
भारताची लोकसंख्या आज जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि या अफाट जनसमुदायाला पोसतो तो आपला हा बळीराजा पण आता हा राजा कायम निसर्गाकडे फाटकी झोळी पसरून भीक मागतो आता तरी मेघ बरसेल माझे पीक चांगले येईल सावकाराचे बँकेचे कर्ज फिटेल याच अपेक्षेने....आज चार पैसे
कुठे गुंतवताना आपण शंभर वेळा विचार करतो शेतकरी मात्र कायम बे भरोशी निसर्गाशी सौदा करतो त्यालाही त्याची दया येत नाही अन ऐन वेळेला तो पाठ फिरवतो मग या शेतकऱ्यांनी आशातरी कोणाकडून करावी ऊन,वारा, पाऊस,यांच्याशी,झुंज देत पिकवलेलं पीक बाजारात बे- मोल विकताना त्याचं ह्रदय भरून येत नसेल का? आपणही बौद्धिक कष्ट करतोच कि पण आपण बे- भरोश्याचा सौदा करण्याचं धाडस नाही करू शकणार ते धाडस फक्त बळीराजा करू शकतो कारण आजही तो निस्वार्थी भावनेने जगतो आहे आहे म्हणूच जगाला पोसण्याचं सामर्थ्य हि त्यांच्यातच आहे .
शेती करताना आवश्यकता असते ती पाण्याची पाणी हा एक अनविकरणीय साधन स्रोत आहे पृथ्वीचा 97℅भाग हा पाण्याने व्यापलेला आहे त्यापैकी हे सर्व पाणी समुद्राच्या स्वरूपात आहे उरलेल्या 3% पाण्यापैकी 2•7%पाणी जमिनीत किंवा बर्फाच्या स्वरूपात आहे यातून उरलेले पाणी आपण पिण्यासाठी वापरतो मग या पाण्याचे संवर्धन करून शेती करणे म्हणजे एक मोठे आव्हान नाही का?कारण सर्वच शेतकरी बागायतदार नाहीत काही कोरडवाहू शेती करतात पण पाऊसा अभावी अगोदर पिकांवर परिणाम होतो तो कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर म्हणून पाण्याचे योग्य सवंर्धन करणे त्याच बरोबर शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावणे हि आपलीही जबादारी आहे जे पैसे दान म्हणून देवालयात देता त्याऐवजी जर तेच पैसे एखाद्या शेतकरी बांधवाला गर्जुवंताला दिलेतर आपल्या कमाईच्या पैशाचे खऱ्याअर्थाने सार्थक होईल असे मला वाटते ....चलातर मग बळीराजाला मदतीचा हात दिलातर संकटाशी समना करायला त्याला अधिक बळ मिळेल शासनाची काही मदत मिळेल हि अशा असते त्याला पण ती हि त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही फक्त मंत्री नेते मंडळी येतात नि पंचनाम्याच्या नवाखाली पाहणी करून जातात भाबडा बळीराजा आसुसलेल्या नजरेनं वाट पहात राहतो कि मला काहीतरी मदत नक्की मिळेल परंतु तसे काहीही होत नाही शासनाच्या योजना मूळ शेकऱ्यापर्यंत पोहोचतच नाहीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियाना आर्थिक मदत म्हणून कोट्यवधी निधी मंजूर झाला पण प्रत्येक्षात असे हजारो कटुंब असताना काही कुटुंबला च फक्त हा निधी मिळाला बाकीचे अजूनही प्रतिक्षेतच आहेत आपल्या देशाचे दोन मुख्य आधारस्तंभ म्हणजे 1)एक शेतकरी 2)सीमेवर लढणार जवान...... आज शासन खेळांच्या सामन्यावर करोडो रुपये खर्च करते परंतु जीवावर उधार होऊन मरण तळहातावर घेऊन अहोरात्र सीमेवर लढणाऱ्या जवानाला असायला हवे तेवढे वेतनही नसते तसेच त्यांचे अमूल्य बलिदान फक्त काही लाखात मोजले जाते तसेच बळीराजाचे कुटूंबपूर्णपणे कोलमडून पडलेले असताना फक्त पंधरा हजार रुपये त्यांना पूर्ण पणे सावरू शकते काय?हाच मोठा प्रश्न नेहमी पडतो एकीकडे बलिदान तर दुसरीकडे गळफास किती विलक्षण आहे हे सर्व हे चित्र बदलायला हवे फक्त म्हणून चालणार नाही त्या दिशेने वाटचाल हवी आहे कारण या क्षणिक जीवनाचा मोह प्रत्येकाला तितकाच आहे कोणीही कधीही त्याला सहज सहजी संपवत नाही काळ त्याच बरोबर संकट त्या व्यक्तीवर तशी वेळ आणतात म्हणून म्हणावेसे वाटते शेतकऱ्याला आधुनिकतेच्या प्रवाहात आनु वेळप्रसंगी मदतीचा हात देऊन संकटांचा सामना करू तो उदार भरण करील आपले आपण भरल्या पोटाने भारताला उन्नत करू......
*जय जवान,जय किसान या नाऱ्याचा जय घोष करू********
✍जोगदंड जयश्री
@jj62....
★★★★★★★★★★★★★★★★★★
🎯 साहित्य दरबार स्पर्धा🎯
स्वच्छेतेचे महत्व.....
आरोग्य हीच खरी संपती.....हे आपण अनेकदा ऐकतो बोलतो परंतु हि संपत्ती टिकवायची असेलतर एकच पर्याय असतो तो म्हणजे स्वच्छता... थोडक्यात आरोग्याची गुरुकिल्लीच म्हणायला हवे फार पूर्वीच्या काळात शिक्षित नसणारे परंतु स्वच्छेतेचे महत्व आपल्या कीर्तनातून व स्वतःच्या हाती झाडू घेऊन अनेक गावांना स्वच्छ करण्याचे काम संत गाडगे महाराजांनी केले त्या काळातही त्यांना स्वछतेचे महत्व पटले होते व त्यांनी गावातील अस्वच्छता दूर करण्यासाठी जण जागृती करण्यासाठी किर्तनाचे मध्यम निवडले .... तसेच घर आणि परिसर स्वच्छेते सोबतच आपण आपली वैयक्तिक शारिरीक स्वच्छता हि ठेवणे फार महत्वाचे असते कारण हवेत अनेक प्रकारचे रोगजंतू असतात जे आपण सहजा सहजी डोळ्यांनी पाहू शकत नाहीत त्यांना 'सूक्ष्मजीव'असे म्हणतात मग हे सूक्ष्मजीव अनेक रुपाने हवेत मिसळतात उदा: रोगी व्यक्तीच्या नाका तोंडातून, त्यांच्या विष्ठेतून, मृत सजीवांच्या शरीरातून,ईत्यादीं पासून म्हणून आपण स्वच्छता राखणे व त्याच बरोबर स्वच्छतेचे महत्व आपल्या मुलांनाही समजावून सांगणे हि काळाची गरज आहे कारण लहान मुले सर्वत्र खेळत बागडत असतात त्यावेळी त्यांच्या कपड्यांवर हतांला किटाणू चिटकतात व त्याच हातांनी जेवतात व हे किटाणू शरिरात प्रवेश करतात आणि अनेक प्रकारच्या रोगांना बळी पडतात त्यामुळे बाजारात उपलब्ध असणाऱ्या जंतुनाशक साबण,लिक्विड्स चा वापर करून आपण रोग जंतूंपासून स्वतःचा बचाव करू शकतो काही रोगजंतू एका वेळी अनेकांना बळी पाडू शकतात म्हणून सार्वजनिक ठिकाणी जाताना स्वच्छ रुमाल नाकातोंडावर बांधून बाहेर जावे,सार्वजनिक ठिकाणी आपणही थुंकू नये तसेच इतरांनाही या गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करावा कारण कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात हि स्वतः पासून करायला हवी स्वच्छतेच्या बाबतीत सतर्क राहणे म्हणजे औषधा विना आजार घालवणे म्हणता येईल जसे आजार झाल्यावर दवाखान्यात जाणे आवश्यक असते अगदी तसेच आजार होऊच नये म्हणून काळजी घेणे तितकेच गरजेचे असते म्हणून या सर्वांची सुरुवात प्रथम वैयक्तिक स्वच्छता तसेच घरातील स्वच्छता व परिसर स्वच्छता या पासून करायला हवी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा अभ्यासक्रमातील एक पाठ खूप काही शिकवण देतो ते म्हणतात कि देशासाठी तुमच्याकडे दोन मिनिट आहेत का?स्वछतेचे महत्व अगोदर स्वतः जाणून घेऊन आचरणात आणावे नंतर इतरांना उपदेश करावेत इतर देशात पाहिलेतर स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते महत्व टिकवण्यासाठी कडक शिस्त पाळली जाते ती या अशी कि आपण काही प्राणी घरात पाळतोे मग ते कोणत्याही करणासत्व असेल परंतु त्याची देख भाल करत असताना त्याची घाण मात्र आपण साफ करण्यास कानकुसर करतो तसे परदेशात चालत नाही शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्यास योग्य ती कार्यवाही करून विशिष्ट् दंड करण्यात येतो म्हणून शिस्तीचे पालनही होते त्याचबरोबर स्वच्छता हि राखली जाते पण आपल्याकडची परस्थिती आजही फार वाईट आहे आजही ग्रामीण भागात स्त्रिया उघड्यावर शौच्याला जातात त्यामुळे त्यांना अनेक गंभीर स्वरूपाचे आजार होतात जसे कि गर्भाश्याचा कॅन्सर..
बीड जिल्ह्यात 70%महिलांना हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे याचे कारण स्वछतेचे महत्व माहित नसणे शरिराची योग्य काळजी न घेणे आज आपण आधुनिक युगात वावरत आहोत अनेक उपचार सुविधा अशा आहेत ज्या ग्रामीण भागात पोहोचल्या नाहीत ग्रामीणआरोग्यकेंद्रे कायम बंद तरी असतात किंवा तिथे तज्ञ डॉ. वेळेला उपलब्ध नसतात अशा अवस्थेत ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना काही वेळाआपले अधिकार व नियम माहित असूनही उपयोग होत नाही आणि पर्यायी व्यवस्था म्हणून रुग्णांना आहे त्या स्थितीत जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते या सर्व गोष्टीतून एकच निष्कर्ष निघतो कि आपण स्वछतेचे महत्व जाणून घेतले पाहिजे इतरांनाही ते पटवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आपण दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकतो बाजरात जाताना कापडी पशिवी घेऊन जावे तसेच पॉलिथिनच्या पिशव्याचा वापर कटाक्षाने टाळायला हवा कारण या पिशव्याचं विघटन होत नाही त्या सर्वत्र पसरून परिसर अस्वच्छ करतात किटाणू त्यात बराच काळ जिवंत राहू शकतात तसेच याच पिशव्या प्रदूषणासही कारणीभूत ठरतात थोडक्यात आपणच आपले आरोग्य धोक्यात आणतो नंतर उपचारासाठी पळापळ करतो त्यापेक्षा स्वच्छतेचे महत्व जाणून घेणे आवश्यक आहे आपल्या भारताचे पंप्रधान मा. नरेंद्र मोदीही स्वच्छतेची मोहीम राबवत आहेत चलातर मग आपणही अपल्यापासूनच सुरुवात करू स्वच्छ भारताचे स्वप्न साकारू....
*स्वछता पाळा
रोग राई टाळा******
जोगदंड जयश्री
No comments:
Post a Comment