==============================
*सम्पूर्ण नाव : वृषाली शरद वानखडे
*पत्ता : संस्कार पॅलेस ,
फ्लॅट न: 3 ,
शेगांव-रहटगांव रोड ,
अमरावती...444604
मोबाइल क्र: 9921424125
ई मेल id : vrishaliw14@gmail.com
==============================
अनमोल जीवन
जीवन किती सुंदर आहे हे रोजचा दिवस अनुभवाने पारखत असावा, सुख-दुःख च्या समीकरणावीना जीवन हे अधुरेच असते....
प्रत्येक मन इथे स्पर्धेच्या जाळ्यात अडकलेले, सोबतीच्या साथीदारपेक्षा दोन पाऊले पुढे चालण्याची घाई, मी काहीतरी वेगळे करुन दाखवीन किंवा इतर कुणाच्या मनी हटकी घालमेल. हे आजच्या नविन पीढ़ी बद्दल (ऐन तारुण्य) मी सांगतेय. रोजचे नविन धक्कादायक ऐकायला, बघायला मिळत आहे, नेट, मोबाईलची जीवघेणी आवड निर्माण झाली आहे. कित्येक पालक विचारांच्या कालवा-कालव मधे ग्रासलेली आहेत, नेमके कुठे काय चुकत आहे ? आपलेच मुले-मुली आपल्याला न घाबरता अश्लील सिनेमा बघायला नकळत जात आहे, आपलेच पाल्य घराबाहेर काय करत आहे हे आपण वेळ काढून शोधायलाच हवे. तेव्हा वेळीच सावधान होणे हिताचे......
एकदा वेळ निघून गेल्यावर फक्त आक्रोश शिल्लक राहतो नी सोबतीला वेदना. वेळेचे कारण बोलणारे सर्वच, त्यातील काही उद्योगपती, सरकारी नोकरी असलेले तर काही शेतमजुर, कितीही उच्च पदस्थ असले तरी ते पालकच ना? संस्कार सर्व सारखेच फरक तो जाणीवेचा, एकाच घरात राहणाऱ्या दोन मुलांपैकी एक जाणीव रुजलेला तर दूसऱ्याच्या शब्दकोषात जाणीव हा शब्दच नाही.
"अभ्यास एके अभ्यास" करणाऱ्या पाल्याची कहाणीच न्यारी, त्यांचे इतर कुणाकडे लक्ष्य केंद्रित व्हायचे कारणच उद्भवत नाही, पण नेमके तेच का चुकतात ? हा शोध लागलाच नाही, अती अभ्यासामुळे विचारशक्ति एवढी नीरस व्हावी की आत्महत्तेचे खुळ डोक्यात रुजावे, अमुल्य जीवन एकदाच मिळते, आपल्या आई-वडिलांचा त्रागा, प्रेम त्यांना काहीच कळत नसावे, जीवन चक्र हे असेच राहणार पण हार न पत्करून मार्ग शोधण्यातच खरी धन्यता. अगदी क्षुल्लक बाबींवरुन जर तुम्ही जीवन संपवत असाल तर तुम्ही आमचे कोण ? आम्ही पालक आमचा कस पणाला लावून फक्त तुमच्या प्रेमापोटी मेहनत करत असतो, आमच्या एका-एका श्वासात तुमचाच ध्यास असतो तुमच्यावर संस्कार पण आमच्या योग्यतेनेच आम्ही चढवले मग आम्ही कुठे चुकत आहे ? तुम्ही साध्या टक्केवारीच्या कचाटयात आपले अमुल्य जीवन मातीत मिसळत आहात . आम्ही तुमचे पालक म्हणून आमच्या काळजाचा विचार एकदा करा, एक दिवस नक्कीच तुमच्या परिश्रमाच्या यशाचा उगवेल त्याची आपण सोबतीने आतुरतेने वाट बघावी. आम्ही पालक आमच्या मुलांचे जेवढे अपयश विचारपूर्वक पचवतो तेवढेच तुमच्या यशाचे भागीदार पण असतो. आम्ही फक्त तुम्हाला यश --अपयश मार्गावरील खाचा मोकळ्या करायला अखंड साथ देऊ. कारण आम्ही काळजातून तुमच्यावर प्रेम उधळत आहोत, तुमच्यासाठीच कष्टाचा सारा आटापीटा.. हिच जाणीव ठेवा.
पंधरा दिवसात एकावर--एक घटना झाल्या नी मन पुन्हा सुन्न झाले. आई - वडिलांचा , घरातील इतर व्यक्तींचा , समाजाचा विचार न करता ही पोरं बिनधास्त पळून जात आहेत, हे पण आपलेच पाल्य, संस्कार आपण सारखेच केलेले फरक तो आहे तो फक्त जाणीवेचा, त्यांच्या ढिसाळ विचारांचा, त्यात आपण पालक बरेचदा खोटे बोलून मोकळे होतो कारण समाज? काही पालक तर इमेज च्या नावाने मनातील वेदना जागीच थोपटवतात. काही पाल्य ज्यांचे अभ्यासाव्यतिरिक्त भलत्याच वाइट मार्गावर डोके चालते त्यांना कुणाविषयी आदर-भीती का नसावी? हा एक गहण प्रश्न आम्हा पालकांना भेडसावतो. याला जबाबदार कोण ? फॅशन च्या नावे काही मुली गुडघ्यापर्यंत स्कर्ट घालायला लागल्या (कॉलेज मधल्या) तर तिच्यावर बोचऱ्या नजरा पडणारच ना ? इथे दोष कुणाचा ? म्हणून आपण पालकांनी याकडे प्रखरतेने लक्ष्य द्यायलाच हवेत, कारण दिशा काळोखी व्ह्ययला वेळ सांगून येत नाही.
आजकाल कॉलेजचे गेट-टुगेदर, फ्रेशर्स पार्टी यामधे पाल्य विशेषतः आपल्याच मुली नको ते स्कर्ट (मिनी) घालायला लागल्यात, मी माझ्याच मैत्रीणला बोलले कारण तिची मुलगी शॉर्ट स्कर्ट घालुन गेलेली पण तीचे उत्तर असे की "ऐकत नाही गं ती नेहमी उलट उत्तर देत राहते" हे ऐकून मी स्तब्ध झाले, मला माझ्या मैत्रीणची दया आली , एका प्राध्यापक मैत्रीणची ही व्यथा.
आई--वडिलांची एक निरागस आशा असते की आपल्या लेकरांनी आपल्या संस्कारातून उच्च शिक्षण घेऊन स्व -बळावर उभे राहावे, जीवन घडवणे हे आपल्याच हातात . मार्ग भरकटला की आयुष्याची माती व्हायला वेळ लागत नाही, मनी जिद्द ठेवा, अनमोल जीवन व्यर्थ न जाऊ द्यायचे....
लेकरांनो, आई--वडिलांचा, गुरुजनांचा मान ठेऊन यशाच्या मार्गावरील नक्कीच तुमची वाटचाल एक दिवस आम्हा पालकांची मान अभिमानाने उंचावेल. ज्या भारतीय कन्या-पुत्रांनी आपल्या देशाची मान उंचावली त्यांचा ध्यास मनी संचारु दया, बघा उद्याची उगवणारी पहाट तुमच्यासाठी यशाचा लखलखता प्रकाश घेऊन अवतरणारच.... तुमच्या सुखाशिवाय आम्हाला दुसरे काहीच नको....
जीवन अनमोल असून खुपच सुरेख आहे
तुमचे पालनकर्ते तर अखंड झिजनारे चंदन आहे
वृषाली वानखडे
अमरावती
9921424125

No comments:
Post a Comment