Sunday, 12 June 2016

खेडकर सुभद्रा

subhadra sanap article
=============================
* नाव :- खेडकर सुभद्रा त्रिंबकराव
* पत्ता :- गुरुस्मृती निवास 
बालेपीर आमराई 
नगर रोड बीड
* मो न  9403593764
=============================
*📕साहित्य दर्पण वैचारिक लेखमाला*📕
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 *🎯शेतकरी शिकला तर देश टिकेल*  🎯
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
 अवघ्या जगाचा पोशिंदा शेतकरी. या शेतकरी राजाची  यशोगाथा खरच शेतकरी सुखी आहे का? रात्रदिवस कष्ट करुन तो कसा जगतो? याचे चित्र किती विदारक आहे .कधी दुष्काळ कधी, ओला दुष्काळ  या दुष्टचक्रात शेतकरी  अडकला आहे .
      वास्तविक पाहता दुष्काळ पडला की सरकार अनुदान देते .पण अनुदान देण्यापेक्षा शेतकर्याच्या पिकाला योग्य भाव जर दिला ,तर खर्या अर्थाने शेतकरी सुखी होईल . शेतकरी कष्ट करुन पीक घेतो अन् ऐनवेळी भाव पडतो (उदाहरणार्थ कांदा हे पीक )  मग त्याच्याकडे तो कांदा साठवण्यासाठी काहीही पर्याय नसतो व त्याला मातीमोल भावाने कांदा विकावाच लागतो.  ज्यावेळी  त्याचा माल व्यापारी घेतो आणी नंतर कितीतरी पटीने जास्त भावाने तोच कांदा व्यापारी ग्राहकाला विकतो. मग यामध्ये फायदा कुणाचा? हा विचार व्हायलाच पाहिजे. 
*माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशींदा*
*त्याच्या भाळी लिहलेला ,रातदिस कामधंदा*
 रात्रदिवस कष्ट करुन जर शेतकरी सुधारत नसेल तर ,त्यासाठी काहीतरी केल पाहिजे.  आपण जर कापड दुकान ,किराना दुकान किंवा इतर ठिकाणी खरेदीसाठी जातो तेव्हा दुकानदार जी किंमत सांगेल त्या किमतीत आपण ती वस्तु खरेदी करतो मग भाजी खरेदी करतांना हिच मानसीकता ठेवतो का? 
     पुर्वी शेती पारंपारिक पध्दतीने केली जात असे म्हणजे जी गरज आहे ते शेतात पिकवले जायचे. अन्नधान्य ,कडधान्य ,भाजीपाला, यावरच भर असायचा भरपुर जनावर  पाळली जायची. दुधदुभत्याची रेलचेल असायची  .शेंद्रिय खतावर पिकवलेलं अन्नधान्य असायचं. व यामुळे मानवी जीवन निरोगी असायचं पण आज हे चित्र राहिले नाही  लोकसंखेच्या बेसुमार वाढीमुळेच बेरोजगारी वाढली वभरपूर पैसा मिळवण्याच्या उद्देशाने नगदी पीके घेण्याची व पारंपारिक पिकाला फाटा देण्याची जनु प्रथाच पडली.  यामुळेच शेतकरी जरासा अडचणीत आलाय असे मला तरी वाटतेय.  
      फक्त शेतीवर अवलंबुन न राहता  खरतर शेतकर्यांनी शेतीला पुरक असे जोडधंदे  केले पाहिजेत शेती मध्ये पीक घेतांना थोडा विचार करुन पीक घ्यावे .  जेणेकरुन नुकसान होनार नाही . 

        खेडकर सुभद्रा बीड
मो नं ९४०३५९३७६४   क्र( २०)
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
लेख 🙏

        गुरु शिष्य नात
  
बदली लांब असल्यामुळे दररोजचा प्रवास   स्वत़च्या गाडीपेक्षा मला बसचा प्रवास बरा वाटतो कारण  बसमध्ये एकदा खिडकी मिळाली की शाळेत जाई पर्यंत एक झोप होते कारण बस मध्ये निवांतपणा वाटतो।
आणी गाडी दररोज शाळेत घेऊन जाने शिक्षकाला शोभत नाही असे माझे मत
     असच एक दिवस प्रवासात असतांना एक फोन आला मँड़म आपण खेडकर मँडम का  मी म्हटल हो आपण कोन तिकडुन अस काही जिंकल्याच्या अर्विभावात आवाज अरे बापरे मँडम तुम्ही अहो मी अस्मिता तुमची विद्यार्थिनी  मला लक्षात येईना बर्याच वेळेनंतर आठवल  मग तिन मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली मी तिला सांगीतले की मी सात वाजेपर्यंत घरी येईल

बरोबर साडेसात वाजता तीचा परत फोन आला घराचा पत्ता दिला होता पण नेमक घर सापडत नव्हत मी गेटजवळ तिला घेण्यासाठी गेले
  खुप  दिवसानंतर एक शिष्य गुरुला भेटायला येणार होता एकदाची ती आली गेटमध्येच गळ्यात पडली जशी सासरहुन आलेली लेक भेटावीतिच्या चेहर्यावरी़ल ती भेटीची उत्सुकता स्पष्ट दिसत होती
   किती बोलु आणी काय काय सांगु अस तिला झाल होत  कारण वीस वर्षान ती मला भेटत होतीएक अल्लड लाघवी मला ती शाळेच्या ड्रेसवरची अस्मिता आठवली किती बदल जानवत होता ती सॉप्टवेअर इंजिनियर होती नवराही सॉप्टवेअर इंजिनियर खुप मजेत होती पण गुरुबद्दलची तळमळ  पाहुन मी भारावुन गेले निशब्द झाले
ती सांगत होती मँडम किती दिवसापासुन मी तुम्हाला भेटायचा प्रयत्न करतेय पण तुमचा फोन नंबर मिळत नव्हता तुम्ही कुठे राहता हेही माहीत नव्हत खुप प्रयत्नान तुमचा फोन नंबर मिळाला बर्याच गप्पा झाल्यातिन माझ्यासाठी आणलेल गिप्ट दिल आणी पुन्हा भेटण्याच आश्वासन देऊन ती गेली
   माझ्या मनात विचार आलाकिती हे प्रेम आजकाल कोन कोनाची आठवन ठेवतो़य  आज आपण पाहतो कॉलेजला गेलेली काही मुले किती उध्दट असतात ती कॉलेज शिक्षकाला कशी बोलतात घरी आईवडीलांशी कशी वागतात  
    पण जर मुलांना बालवयात चांगले संस्कार मिळाले तर ती मुले आयुष्यात कधीच मागे राहत नाहीत जस आई हा मुलाचा पहिला गुरु असतो त्याहीपेक्षा शिक्षक महत्वाचा  एखादा इंजिनीयर चुकला तर एखादे धरण चुकेल डॉक्टर चुकला तर एखाद्या व्यक्तिला आपला जीव गमवावा लागेल पण एक शिक्षक चुकला तर आख्खी एक पिढी बरबाद होईल हे शिक्षकाने लक्षात घेतले पाहीजे
  जो शिक्षक आपल्या कर्तव्यात कसुर करत नाही प्रामाणिकपणे आपले कार्य करतो त्याचे फळ त्याला लगेच मिळते आज डॉक्टर इंजिनीयर कलेक्टर हे शिक्षकाची मुले जास्त प्रमाणात आहेत हे त्याचच फलित आहे हे शिक्षकाने लक्षात घेतल पाहीजे  
=============================
शब्दांकन :- खेडकर सुभद्रा त्रिंबकराव बीड   
मो नं ९४०३५९३७६४
=============================


स्वच्छतेचे महत्व

गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आले आणी स्वच्छतेबद्दल जास्त जागरुकता झाली असे म्हटले तरी वावगे ठरु नये. वास्तविक स्वच्छता हा प्रश्न मानवी जीवनाशी फार निगडीत आहे. 
स्वच्छता नेमकी कुठे असावी ?आणी ती कुणी करावी ?हा एक गहण प्रश्न आहे .स्वच्छतेची सुरवात अगोदर स्वत:पासुन व आपल्या घरापासुन करायला पाहिजे .आपले घर व घराचा परिसर हा स्वच्छ असावा आपल्या घरातील कचरा विल्हेवाट करण्याचे नियोजन असावे घरोघर शौंचालय असावे व त्याचा वापर करावा .स्वच्छ व सुंदर घर म्हणजे खुप मोठा बंगला असा समज चुकीचा आहे. आपल घर कितीही छोटे किंवा मोठे असो ते किती टापटिप व स्वच्छ आहे याला जास्त महत्व आहे .घरातील सांडपाण्याची सोय असावी .त्यामुळे डास होनार नाहीत डासामुळे अनेक विकाराला सामोरे जावे लागते हे लक्षात घेवून उपाययोजना कराव्यात. *स्वच्छता व टापटिप हे आरोग्याचे मुळ आहे*.
        आपले घर व परिसर जसा स्वच्छ असावा तसेच आपले गाव व गावातील सार्वजनीक ठिकाणं याची स्वच्छता ठेवण्याची जिम्मेदारी मी एक नागरिक म्हणुन माझीच आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गाव असो किंवा राळेगण सिध्दी हे गाव असो त्या गावाचा विकास हा स्वच्छतेपासुनच झालेला आहे .आपले गाव समृध्द व आदर्श असावे असे वाटत असेल तर ,झपाटुन कामाला लागा स्वच्छता खुप महत्वाची आहे  अस्वच्छतेमुळे अनेक रोग होतात .
     राष्ट्रसंत गाडगेबाबा ज्या गावात किर्तनाला जात तिथे स्वत खराटा घे वून रस्ते झाडत  व स्वतच्या कृतीतुन लोकांना संदेश देत असत म्हनुन आपनही न लाजता या अभियानाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे . 
     शालेय स्तरावर मुलांना स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले पाहिजे . स्वच्छता म्हणजे फक्त घर व परिसर हेच नाही इतरही कारनामुळे अस्वच्छता वाढते जसे पाणी अस्वच्छ पाणी पिल्यामुळे कॉलरा काविळ यासारखे आजार होतात.
        महत्वाचे म्हणजे गावागावातून हागणदारी मुक्ती झालीच पाहिजे तरच *स्वच्छ भारताचे* स्वप्न पूर्ण होनार आहे .
             
      खेडकर सुभद्रा त्रिंबकराव 
      बीड
       ९४०३५९३७६४




No comments:

Post a Comment