Sunday, 12 June 2016

01 अप्पासाहेब सुरवसे


🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*नारी शक्ति तू आविष्कारी नाहीस वनवासी गं...?*

          प्रत्येक स्त्रीच्या जीवनात एक टर्निग पॉईंट असतो आणि तव्ो  म्हणजे विवाह! विवाह अर्थातच अपघाती लग्न ! कारण याच एका वळणानंतर ती लाडाची राहत नाही. घरातल्यासाठी ती एक कामाची मशिन बनून राहते. कारण लग्नाआगोदर बायलेकीचे- लेकमातीचे घरात कोडकौतुक असते. तिच्या आवडी निवडीचा,  भाव-भावनांचा घरातील माणसे आवड आपरुगीने विचार करत असतात. तिच्या बाल मनाच्या प्रत्येक छंद आवडीच्या सवयीचा अर्थातच बालहट्टाचा घरातील कोणी ना कोणी पुरवठा करत असतो. कारण उद्या हीच ‘नकुशी’ सासरी नांदायला गेली तर तीला तिच्या मनानुसार वागता येणार नाही. म्हणून तिला तसे विवाहपूर्व घरातील मोठया माणसाशी  कसे वागावे, बोलावे, तसेच, आपल्या खानदानीला बट्टा , काळीमा, कलंक लागु नये, म्हणून आपले शील किती महत्वाचे हे माहेरच्या घरातील बुजुर्ग महिला मंडळ अर्थातच आजी शिकवणीचे उपदेश करत असतात.
         लग्न म्हणजे तिचा अपघात ! का तर लग्न झाल्याशिवाय स्त्री सुरक्षित असू शकत नाही. हा भारतीय नव्हे तमाम संस्कृतीचा अलिखित नियम आहे. ती केव्हा सुरक्षित आणि बिनधास्त जीवन जगू शकते तर फक्त लग्न झाल्यावरच , नाहीतर लग्नापूर्वी तिला विविध संकटाच्या परीक्षा पार पाडाव्या लागतात. कोणी छेड काढली तरी ब्र शब्द काढता येत नाही. किंवा त्याचा प्रतिकारही करत नाही. का तर आपली अब्रु, इज्जत चव्हाट्यावर नको म्हणून........?

          नाण्याची दुसरी बाजु काय सांगते, स्री जन्मा तूझी अधूरी कहाणी , कारण लग्नापूर्वी अल्लड, स्वच्छंदी, आनंदी, मनमिळावू, अगदी हसत, खेळत, बागडत आपल्या लहरी जीवनाचा आनंद घेणारी ही कुमारी, मुलगी लग्नानंतर एक जबाबदार महिला कोणाची वहिनी,कोणाची सून,कोणाची हक्काची दासी,पत्नी म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पाडते.म्हणून तीला तिच्या लग्नापूर्वीच्या आणि लग्नानंतरच्या काही बाबी ह्या मापून मोजून तोलुन घ्याव्या लागतात.

          भारतीय संस्कृतिनुसार मुलीला तिच्या आई वडीलांनी पारखलेला नकटा, हेकना, टकला, वकटा, काळा किंवा देखना नवरा मुलगा  *वर* म्हणून  स्वीकारावा लागतो. त्याच्या स्वभावाचा अंत-ठाव घ्यावा लागतो पण तो एकंदरीतच तिचा त्या नवऱ्या म्हणणाराशी जुळवून-समायोजन करुन घ्यावे लागते. कारण नवरा हा लादत असतो आणि ही गप्पगुमाने स्वीकारत असते. आणि म्हणून तिला तिचे अस्तित्व शुन्य वाटत असते,   नव्हे मोठा गोल भासत असतो . कारण या अस्तित्वहीन गोलाभोवती शिकून-सवरुन ही तिला तिचे उभे आयुष्य खर्ची घालवायचे असते. म्हणून या ठिकाणी आज आवर्जून उल्लेख करावा वाटतो, पुर्वी अशिक्षित महिला आत्महत्या करायच्या आता उच्चशिक्षित कमावत्या महिला ज्या की स्वत: च्या पायावर उभ्या आहेत त्या एवढे मोठ्या उभ्या किंमती आयुष्याची राख-रांगोळी एका आत्महत्येने उध्वस्त का करतात कोणास ठावूक ?

          संवेदनशीलतेने विचार केल्यास असेही आढळून येते की, प्रेम विवाह हे टिकत नाहीत. अगदी संशयीवृत्ती  बळावते . त्यातून ते तुटतात किंबहुना तुटता-तुटता राहतात ते सैराट फेम आर्ची-परश्या प्रमाणे  ! !!

          कारण प्रेमात मुलीचा विजय असतो, कारण प्रेमात मुलगी म्हणेल ती पूर्व दिशा असते. प्रेमात तो तिचा दिवाना असतो. म्हणून सहा फुटाचा तो दीड फुट्या होतो. म्हणून सर्व काही अलबेल असते. तिथे मुलगी ही नेपोलियन बोनापार्ट प्रमाणे त्याला आपल्या बोटांच्या इशाऱ्यावर डोळ्यांच्या घायाळ नजरेंच्या बाणाच्या तालावर झुलवत असते.हे मात्र नक्की खरे..!!!

          याऊलट लग्नात-लग्नानंतर  तोरा -मर्दुमकी गाजवतो तो नवरा . कारण तो एक हुकुमशहा असतो तो म्हणेल तसे बायकोने ऐकावे असा अलिखित कडक कायदा असतो. नाही म्हणजे नाही असा कडक शिस्तीचा तो उपभोक्ता असतो. आणि म्हणून तो हुकुमशाही प्रवृत्तीचा हिटलर बनून आपल्या हातातील हंटर- चाबूक - आसूडीचे फटके तो आदेशाप्रमाणे सोडत असतो. म्हणूनच की काय इथे एकमेकांना समजून घेण्यात गफलत होते आणि म्हणून कुटुंब न्यायालयाची धावाधाव आणि मग कित्येकांच्या जीवनाच्या वाटा पुन्हा भिन्न- भिन्न असतात.त्यात मग चूक ही कोणा एकाची नसते तर टाळी ही दोन्ही हाताने वाजत असते. चूका मधून शिकायला मिळण्या शिवाय संसार तो कसला म्हणून पुन्हा पक्ष्यांची उडणारी दोन पंख आणि रथाच्या चाकाची महत्वता त्यातून एक गळून किंवा निखळून पडल्याशिवाय येत नाही.म्हणून सारासार विचार करता स्त्री ही एक नव दुर्गा आहे .स्त्री शक्तिचा नवा आविष्कार आहे  .आणि म्हणून स्व ची जाणीव होवू द्यावी म्हणजे स्व:ताची किंमत ओळखावी .स्त्री ने स्वतः स स्वता:ला कमी लेखु नये तेंव्हा खऱ्या अर्थाने स्त्री शक्ति ही एक अनोखी ताकद किंवा नव्या येणाऱ्या पिढीच्या समोर आदर्श असेल म्हणून स्त्री ही केवळ उपभोगी वस्तु नसून ती एक नवनिर्माण आणि सृजनशीलतेची एकमेव घटक आहे हे विसरून चालता येणार नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

✍🏼🖊🖋🎯🖋🖊
*श्री.आप्पासाहेब सुरवसे,*
        *लाखणगांवकर*
_AMKALWOMIAW_
@47

आप्पासाहेब काशीनाथ सुरवसे
सादमाणुसकी बीड जिल्हा समन्वयक
तथा साहित्य दर्पण मुख्य संयोजक

लेखक कवि तथा प्रथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीघाट
ता जि बीड

*महाराष्ट्र ग्रामीण महिला ई साक्षर*

       सोशल मिडीयाच्या महत्त्वपूर्ण दुवा म्हणजेच प्रत्येकाच्या हातातील हा स्मार्ट फोन. आजकाल शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही ज्या घरात मोबाईल नाही असे शक्यतोवर एक ही घर शोधूनही सापडणार नाही. माणसाच्या जीवन जगण्यासाठीच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण ह्या मुलभूत गोष्टीबरोबरच मोबाईलही आपले स्थान, अस्तित्व निर्माण करू पाहतो आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण हिमालयाच्या दऱ्या-खोऱ्या, डोंगरापासून ते कन्याकुमारीच्या समुद्रसपाटी- तटापर्यंत एवढेच काय तर चांद्यापासून ते बांद्यापर्यंत प्रत्येकाच्या हाती एक स्मार्ट फोन नव्याने आपली जागा घेतो आहे. शिवाय बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून आजकाल बदलाचा साक्षीदार होण्यासाठी स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी स्वतःच्या वर्तणूक वागणुकीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणत आहे. नव्हे तर  परिस्थितीशी जुळवून घेत तिच्याशी चार हात करत आहेच आहे. पूर्वी बटणाचा मोबाईल वापरण्याचे अवघड वाटणारे शिक्षितच काय अशिक्षित, वृद्ध वयस्कर मंडळीही नव्याने आलेल्या टचस्क्रीन अर्थातच स्मार्ट फोन अगदी नातवाकडून शिकत सहज साध्या सोप्या पद्धतीने सफाईदारपणे हाताळत आहेत.
       शहरी भागातील तरुण युवा वर्गात तर स्मार्ट फोन वापरण्याची एक प्रकारची सुप्त चढाओढ लागलेली दिसून येतेय. तरुणाईच्या जीवनात नव माध्यमांना साद घालण्याचे स्मार्ट फोन एक प्रभावी माध्यम म्हणून कि काय तर  एकंदरीत मोबाईल पुढारलेल्या जनसामान्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनू पाहतो आहे. दैनंदिन जीवन जगत असताना मोबाईल आणि त्यांच्यातील घडणाऱ्या साद आणि प्रतिसादावर आजकाल बहुतांशी तरुणाईच्या जीवनाची शृंखला अवलंबून असलेले वास्तववादी चित्र पहावयास मिळते. आणि म्हणूनच की काय शहरी नागरी सुविधा देणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका तसेच विविध राजकीय पक्ष, राष्टीय- आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्या शिवाय विविध स्तरातील काम करणाऱ्या बहुद्देशिय सामाजिक संस्था, विविध शासकीय ,निमशासकीय कार्यालये, रेल्वे स्थानक, विमानतळ, बसस्थानक इंटरनेटचे वाय-फाय क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. पर्यायाने इ. सुविधांचा लाभ जनसामान्यापर्यंत आपसूकच पोहोचतो. सोबतच या नि अशा विविध महत्त्वाकांक्षी, दूरदृष्टी,सॉफ्ट  माध्यमातून नि भारतचे विद्यमान पंतप्रधान यांच्या सत्यवत वाटणाऱ्या,अभिप्रेत असणाऱ्या  इच्छेप्रमाणे ई-गव्हर्नन्स राज अर्थातच डिजिटल इंडीयाचे वास्तववादी खरेखुरे दिवास्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरत आहे.

             विद्यमान महाराष्ट्र शासन येणाऱ्या आगामी काळात ग्रामीण भागातही “इंटरनेट साथी” या अनोख्या उपक्रमांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ आणि सामाजिक संस्थेच्या विधायक नि समाजाभिमुख महत्त्वाकांक्षी, दुरदृष्टी ,काळाची पावले ओळखत , भविष्याच्या अगदी अचूक ठाव घेणारे प्रकल्प कार्यान्वित करत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील लोकांच्या जनजीवनात नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडावी. माहितीची देवाणघेवाण करताना ग्रामीण आणि शहरी अशी सामाजिक, प्रादेशिक, विषमतावादी दरीची तफावत राहू नये. एकूणच काय तर ग्रामीण भागातील महिलांच्या हाती  केवळ पाळण्याची दोरी न राहता या धकाधकीच्या धावत्या स्पर्धेच्या नव्या युगाची नवक्रांतीची मास्टर की *चावी* ही असावी. म्हणून अशा प्रशिक्षणार्थी महिलांना टॅब व भ्रमणध्वनी मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांना “ ई साक्षर “ केले जाणार म्हणजेच महाराष्ट्र खराखुरा पुरोगामी वैचारिक उंचीचा आहे.याचा प्रत्यय नि ज्वलंत दाखला संबंध भारतवर्षालाच  काय तर उभ्या जगाला आदर्श पायंडा असणार आहे.

      ई साक्षर योजनाच्या माध्यमातून टॅब व भ्रमणध्वनी कसा हाताळावा , त्यावर हवामान बदल , तापमान, सामाजिक ,राजकीय, आर्थिक, कृषी, उद्योग, कला , क्रीडा , साहित्य ,महिला या सह अन्य काही महत्त्वपूर्ण योजनाची माहिती कशी शोधायची. बचत  गटाची माहिती कशी शोधायची, बचत गटाच्या माध्यमातुन तळा- गाळातील महिलांना लघुु उद्योग सुरु करायचा असल्यास बाजार पेठेतील त्याच धर्तीवर कोण कोणते उद्योग सुरु आहेत, त्याची उलाढाल आपल्या व्यवसायाशी निगडित अपेक्षित बदल, महिलांच्या नाजुक  आणि महत्वपूर्ण पण गंभीर आरोग्य विषयक प्रश्न आदि  विविध मुद्यावर प्रशिक्षणात माहिती दिली जाईल. यासाठी महिलांना शिकवण्याकरीता  महिला साथी समन्वयिकेची निवड होणार  आहे, ही निवड कुशल गुणवत्तेवर अवलंबून आहे. कारण टॅब आणि मोबईल वापरण्याचे किमान जुजबी ज्ञान आवश्यक आहे. या साथी समन्वयेकेला प्रतिमहीना 12000 रुपये मानधन देण्यात यईल. हा उपक्रम महाराष्ट्राच्या 28 जिल्ह्यात अगदी नियोजन पूरक  आणि शिस्तबद्ध कार्यक्रम कालबद्ध आखण्याात आला आहे, सोबतच 28 जिल्ह्यातील 183 तालुके व त्या तालुक्यातील 35368 गावां-गावामधुन  हा उपक्रम एकाच वेळी सुरु होणार असून 1006 एवढ्या साथी समन्वयिकांना, महिलांना टॅब, भ्रमनध्वनि  इ. साहित्य टाटा सामाजिक संस्थेच्या सहकार्यातुन वितरित करण्यात येत आहे. याद्वारे महारष्ट्र राज्यातील सुमारे 416317 महिला इ. साक्षर तर नक्कीच होतील असा प्राथमिक अंदाज आहे. विविध जिल्हास्तर समन्वयक म्हणून सहाय्यक सनियंत्रण अधिकारी यांची निवड असणार आहे.
महाराष्ट्र ग्रामीण महिला ई साक्षर प्रणालीद्वारे व्यवसाय वृद्धितर होईलच पण धावत्या जगाच्या हालचालींकडे बदलत्या घडामोडींकडे कटाक्षाने लक्ष राहिल्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा अद्यायवत राहतील . त्याचबरोबर कामा संबधित माहिती एका चुटकी सरंशी, एका  कळसरशी मिळणार असल्याने ग्रामीण माहिलांची कुठेही अडवणुक - फसवणूक होणार नाही हे मान्य नक्की खरे  त्यातून आपसुक कामाचा वेग वाढेल आणि आत्मविश्वास आपोआप उंचावण्यास मदत नक्कीच होणार आहे
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
*श्री .आप्पासाहेब सुरवसे*
       लाखनगावकर
भ्रमणध्वनी ९४०३७२५९७३

*औरंगाबाद येथे काल झालेल्या फटक्यांच्या भीषण अग्नि तांडव याच्या वर झणझणित भाष्य करणारा _श्री आप्पासाहेब सुरवसे_ लाखनगावकर यांचा वाचनीय 📰📰📰 लेख..!!!*

*दिवाळी आणि फटाके एक समीकरण*

     "दिवाळीचा सण मोठा आनंदाला नाही तोटा"
दिपावली म्हटली की, सर्वच स्तरातील गरीब - श्रीमंत अबालवृद्ध , लहान थोर मंडळीच्या मनात त्या दिव्यांच्या लखलखाटी प्रकाश प्रमाणे एक वेगळी उत्सुकता असते. आणि म्हणून सर्व सणांमधे दिपावलीची महती , महिमा आगाध आहे. हाच दिपोत्सव आजमित्तीला जात-पात, धर्म-पंथ, वर्ग-भेद विसरून सर्व समाज घटकात अगदी आनंदी हर्षो उत्सवात साजरा केला जातोय. हे या अखंड भारत वर्षात नव्हे तर सबंध जगाच्या पाठीवरचा अनोखा धर्मनिरपेक्ष सण म्हटल्यास निश्चितच वावगे ठरणार नाही.
               दिवाळी म्हटले की अर्थातच मान-पान आलेच. फराळ, कपडे लत्ते , नवा वास, नवा सुगंध बाजारपेठ फूललेल्या.  सगळीकडे खरेदीची लगबग, धूम नि नव- नव्या कार्याचे उदघाटन ,भूमिपूजन, वास्तु प्रवेश एवढेच काय एखादी सासुरवाशीन  आपल्या माहेरच्या वाटेकडे एक टक डोळे लावून आजच्याही धकधकीच्या धावत्या वेगवान युगातही खास करून आपल्या भाऊरायाची म्हणजेच *मुराळी* म्हणून येणाऱ्याची चातका प्रमाणे अतुरतेने वाट पहात असते.  ते केवळ पारंपारिक रीति रिवाज म्हणून.....! त्यातच  सासुरवाशनिचा मुराळी आला म्हणजे तिचा उत्साह ओसंडुन वाहतो. आनंदाला पारावार उरत नाही. तिच्या आनंदी स्वर्गासम विश्वात ती मशगूल रममान असते. तिच्या आनंदाला पारावार उरत नाही नि तिला आकाश अगदी अगदी ठेंगणे भासायला लागते , कारण या नववधुस, लेकमातीस- बायलेकीस माहेरला जाण्याची ओढ -उत्सुकता मनात कायम जपत असते. त्या मधे महिलावर्गाचीही लगबग सुरु झालेली असते. वेगवेगळ्या पाककृती एकमेकींना आदान- प्रदान तर करत असतात. वृतपत्रांतील पाक कृती प्रत्यक्षात करण्याची अनुभूती तीही काही औरच असते.
           
         दिवाळी आणि फटाके यांचे एक आगळे वेगळे समीकरण असते. फटाक्याचा आवाज, फराळाचा खमंग स्वाद. उंटण्याचा सुगंध, नव कपडयांची नवलाई नि आनंदाचे उधाण यांचा संगम म्हणजेच आनंददायी दिन दिन दिवाळी...!
      
      अलीकडील काळात दिवाळी आणि मोठ्या आवाजाचे फटाके हे एक नव्या नात्यांचे अनोखे समीकरण नव्यांने बनत चालले आहे.  धुमधडाक्यात फटाके वाजवणे म्हणजे आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत, कसे गर्भश्रीमंत आहोत, किंवा श्रीमंतीचा आव दाखला फटाक्यांच्या आवाजावरुन किती तसेच  वाजण्याच्या दिर्घ वेळेवरून नि उंचीवरून आणि रंगीबेरंगी शेषणाईवरून शहरी भागात तर जणू जिवघेणी स्पर्धा , चढाओढ शर्यत लागलेली असते. शोभेच्या दारूचा  " दिपोत्सव"  म्हणायचे आणि आपल्या वैचारिक बुद्धीचे,  उंचीचा दिवाळखोरीचा नमुना प्रत्यक्षात दाखवायचाच भाग आहे की काय असा या निमित्याने ज्वलंत सवाल संवेदनशील मनाला पडल्याशिवाय राहत नाही.      
         कारण पाच - दहा  हजारांची फटाक्यांची माळ कोणतेही नियम अटी,  कायद्याच्या निर्बधांची पायमल्ली करत जातात. यातच बंदी असलेले मोठ्या आवाजाचे सुतळी फटाके नि अँटमबॉम्ब तर अगदी रोजरोजपणे अधीकृत, अनधिकृत फटाके विक्रेत्यांकडे सर्रास उपलब्ध असतात. यातच ग्रामीण भागापेक्षा शहरी, दाट लोकसंख्येच्या भागातील नगर- महानगरात तर अगदी पहाटेपासुन कणकर्कश कानठळया बसायला सुरूवात होते. कित्येक वेळेला "डेसीबल" या आवाजाच्या प्रमाणित एककाला हारताळ फासला जातो. जाणुनबुझून डेसीबल मर्यादा खास समाजमान्य प्रतिष्ठीत व्यक्ती मार्फत पायदळी तुडवल्या - ओलांढल्या जातात. शून्य डेसीबल म्हणजे अर्थातच शांतता. साधारणत:  आपले सर्व समावेशकपणाचे बोलणे हे ६० डेसीबल इतके प्रमाणशीर आणि मर्यादित असते. रहदारीच्या ठिकाणी वाजवण्यात येणारा वाहणाचा भोंगा हा ११० डेसीबल इतका असतो. आणि  दिपोत्सव साजरा करण्याचा फटाक्याचा आवाज किमानपक्षी १४० डेसीबल एवढा असतो. म्हणुन माणसाच्या कानावर किमान- कमाल ८५ डेसीबल पेक्षा जास्त तीव्रतेचा आवाज ऐकणांरांच्या सातत्याने कानावर पडल्यास त्याच्या ऐकण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम पडु शकतो.  विषेशत: लहान मुले आणि वयोवृद्धांना तर याचा खूपच आरोग्यावर विघातक वाईटच परिणाम होतो. शिवाय कानाच्या आजारासबंधी विविध बाबींना प्रकषाने समस्यांना तोंड द्यावे लागते.
     
     दिवाळीचा आनंद साजरा करणे म्हणजे फटाक्याची रोषणाई , आतषबाजी . त्यातच काही काही वेळा अती उत्साह हा जिवघेणा , प्रसंगी कायमचे अपंगत्व प्रदान करणारा कर्दनकाळ ठरत असतो . त्याचे पडसाद हे फटाक्यांच्या आवाजामुळे कायमचे बहीरेपण येऊ शकते ,शिवाय पर्यावरणाच्या मानवी मुल्यांचाही ह्रास होत असतो. पर्यावरणाचे आतीव नुकसान न भरून निघणारे असते . शहरी भागात तर मोठ्या प्रचंड प्रमाणात वायू ,ध्वनी इ .  प्रदूषण सारख्या समस्या या दिवाळीच्या काळात *आ* करुन  तोंड वासुन  भेडसावत उभ्या असतात .
          
          भारतीय संस्कृतीची जपणूक आपण
विविध धर्मातील  सण , उत्सव- समारंभ धर्मनिरपेक्ष रितीने साजरा करुन मानवतेच्या मनोमिलनाच्या माणूसकी नावाच्या �धर्माचा वारसा सांगोपांग एकोप्याने गुण्या - गोविंदाने  साजरे करुन समाजात एक आदर्श पायंडा घालुन जोपासत असतो . याच विविधधर्मी निरपेक्ष अंगी बाणा संचारत सणांच्या पाठीमागे संस्कृती मुल्यामधून वैज्ञानिक दृष्टिकोनातून बदलत्या काळानुरूप सण - उत्सव
उत्साह पुर्वक  साजरे करताना निसर्ग नियमाच्या बदलत्या काळानुरूप स्वतः मध्येही बदल करुन घेत रास्त नि  मार्मिक पद्धतीने नांदण करणे अत्यंत गरजेचे आहे .

      एकंदरीत दिवाळी या अति दैदीप्यमान आनंदाच्या सणांचा खरा - खुरा आनंद हा विविध क्षेत्रातील अफलातून, अद्वितीय, असामान्य कामगिरी करणाऱ्या समाजोपयोगी , सेवाभावी वृत्तीच्या व्यक्ती नि संस्थाच्या कार्याचा लेखाजोखा मांडणाऱ्या आणि तळागाळातील सर्व सामान्यांच्या न्याय बाजू मांडणाऱ्या शिवाय आदर्शवत पायंडा पाडलेल्यांचे विविधांगी सर्वसमावेशक पद्धतीने न्याय बाजुंचा पुरस्कर्ता करणाऱ्या एकूण - एकूण कला, क्रीडा ,साहित्य, समाजकारण, अर्थकारण तसेच राजकारण, सत्ताकारण  शिवाय देशाच्या सुरक्षेच्या �दृष्टीने विविध क्षेत्रातील बाबींचा साकल्याने मागोंवा घेणारे दिवाळी अंकाचे अर्थात ओजस्वी -तेजस्वी पर्वांचे मनपुर्वक वाचन करावे म्हणूनच वाचता वाचता वाचन करावे नि त्यांचीच प्रेरणा घेऊन प्रत्यक्ष कर्तव्य - कामपुर्ती करण्याच्या दृष्टीने आपापल्या पद्धतीने आतोनात प्रयत्न करावेत.
तसेच लिहीता लिहीता लिहते बनावे. एकंदरीतच काय तर
काय निवडायचं ते खालील प्रमाणे आपण अनुभव सिध्द सांगुया . कारण आज खरी गरज फटाक्यांची नसून पुस्तकांची आहे हे यावरून तरुण युवा वर्गाला  सांगणे क्रमप्राप्त आहे. नव्हे तर आपले आद्य कर्तव्य आहे. फटाके की पुस्तके ? तर फटाके मोठा आवाज करतात. पुस्तके शांतपणे हळूवार भेटतात. फटाकेहवेचं प्रदूषण करतात. पुस्तके वैचारिक प्रदूषण दूर करतात. फटाके अक्षरशः पैसे जाळतात. पुस्तके मात्र पैसे उभे करतात. फटाके लहानग्यांना इजा करतात
पुस्तके बाळांना छान रमवतात. फटाके पक्षीप्राण्यांना घाबरवतात
पुस्तके सर्व माहिती पोहोचवतात. फटाके कान किर्रर करुन सोडतात. पुस्तके मानसिक समाधान देतात. फटाके माणसाचा अहंकार कुरवाळतात. पुस्तके माणसाला जमिनीवर ठेवतात. फटाके विध्वंसक मूल्य रुजवतात. पुस्तके रचनेचा आग्रह धरतात. फटाके क्षणभर प्रकाशातून अंधाराकडे नेतात. पुस्तके तिमिरातूनी तेजाकडे वळवतात.फटाके म्हणजे बालमजूरीला प्रोत्साहन. पुस्तके म्हणजे बालबुद्धीला आवाहन. फटाके ही तर खरीखुरी विकृती. पुस्तकेच उभी करती मानवी संस्कृती. भूषण नित्य वाजवी विवेकाची घंटा फटाक्यास फाटा देवूनी पुस्तकांचा वाटा आता काय निवडायचं . तुम्ही आम्ही सरासार विचार करुन ठरवुया विवेकाचा आवाज बुलंद करुया.. तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाच्या वैचारिक उंचीची बैठक उरी बाळगून कृतीतून " नको त्या कर्णकर्कश फटाक्याची वात, लावू जगी विवेकांच्या विचारांची ज्योत" हे ब्रिदवाक्य दिवाळी निमित्त संकल्प करुन प्राणपणाने जपूया नव्हे तर साकार करुया . सर्वांना  दिपावलीच्या ओजस्वी आणि तेजस्वी लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशाच्या तेजोमय सणाच्या साहित्य दर्पणमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!!

*श्री आप्पासाहेब सुरवसे*
      _लाखणगांवकर_
भ्रमणध्वनी ९४०३७२५९७३

No comments:

Post a Comment