Sunday, 12 June 2016

मीना सानप





परिचय

नाव - सौ.मीना सानप 
पत्ता - ग्रामसेवक काँलनी, नगर रोड ,बीड

व्यवसाय ---मुख्याध्यापिका, प्रा . शा. मुर्शदपुर ता.जि. बीड

जन्मदिनांक-----28--5--1960
मोबाईल क्रमांक-----942371586
         
Email - Minasanap1970@Gmail.com
छंद -  वाचन 


फोटो -
धन्यवाद
~~~~~~~~~~~~~~~~~~
📕साहित्य दर्पण आयोजित 📕
       साहित्य दरबार
***************************
वैचारिक लेखमाला स्पर्धा
***************************
विषय----शेतकरी जगला तर देश टिकेल
***************************
शेतकरी म्हणजे रात्रंदिवस, ऊन्हा-तान्हात घाम गाळणारी व्यक्ती होय.
भारत हा कृषीप्रधान देश आहे.या देशातील 70%लोक खेड्यात राहून , तुटपुंज्या जमिनीवर आपली गुजराण करतात ,आणि आपल्या कष्टातुन पिकवलेले मोती इतरांना देऊन त्यांची भूक भागवतात.शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. कणा जर कमकुवत असेल तर देशाचा रथ प्रगतीकडे कशी वाटचाल करणार ?
म्हणुण शेतकऱ्यांना देशाच्या जडणघडणीत अग्रक्रम दिला पाहिजे.हे मर्म म.गांधीनी आणी म.फुले यांनी जाणले होते.त्यांच्या मते शेतकऱ्यांना दुर्लक्षित ठेवुन देशाची प्रगती कदापिही शक्य नाही.
आणि म्हणुण म.फुले यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीचे विदारक सत्य आपल्या लेखणीतुन मांडले .शेतकऱ्यांची दैनावस्था केवळ शिक्षण आणि ज्ञान यानीच दुर होऊ शकेल हे ठणकावुन सांगितले होते .
आज देशाला स्वातंत्र्य  मिळुन 70 वर्षे झाली तरी आपला शेतकरी अजुन सुधारला नाही.याला कारण शासन आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही .कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, निसर्गाच्या लहरीपणावर त्याचे जीवन सर्वस्वी अवलंबून आहे.म्हणुण शासनाने शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहीजे.
त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे ,संस्थाना मान्यता देऊन गल्लोगल्लीला इंग्रजी शाळा आणि या शाळेत कोणाची मुले तर श्रीमंतांची गरीबाची म्हणजे शेतकऱ्यांची मुले खेड्यातील जिल्हा परिषद शाळेत. कि जेथे भौतिक सुविधांचा अभाव , इमारत नाही , मैदान नाही , तुटपुंजा निधी येतो त्याच्यावर शा.व्य.स. अध्यक्षाचा डोळा , संस्थेच्या शाळेत घालायला भरमसाठ फी कुठली आलीय शेतक-याकडे, मग कशी होणार शेतकऱ्यांची मुले हुशार म्हणुण प्रत्येक गावात जि.प.शाळेत सर्व सुविधा द्या .पैसे देऊन वातावरण कलुषित करु नका.तुमची यंत्रणा राबवुन सुविधा द्या.
शेतीला भरपुर पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने ठिकठिकाणी  तलाव , बंधारे, विहिरी बांधुन द्यावेत बोटावर मोजण्याइतके काम करुन चालणार नाही गाव तेथे सुविधा आणि त्याही दर्जेदार हव्यात.तसेच शेतकऱ्यांना शेतीविषयक गोष्टीचे ज्ञान होण्यासाठी प्रत्येक गावात शेतकऱ्यांसाठी चर्चा सत्रे मेळावे घेणे  गरजेचे आहे, नुसते कागदोपत्री नको.
शेतकऱ्यांना  शेतसाराही कमी केला पाहिजे. शेतकऱ्यानी आधुनिक पध्दतीने शेती करावी म्हणुण खते आणि बियाणे चांगल्या प्रतीची पुरवली पाहिजेत, काही वेळेला शेतकरी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन बियाणे खरेदी करतात आणि ते उगवतच नाही , तोपर्यंत दुबार पेरणीचीही वेळ निघुन गेलेली असते. अशा वेळी शासनाने प्रमाणित केलेली बियाणे वापण्यालाच परवानगी दिली पाहिजे.म्हणजेच शेतीत सुधारणा आणि मुलाना शिक्षण या बाबी  वर भर म .फुलेनी आपल्या शेतकऱ्यांचा आसुड या पुस्तकात दिला आहे.
शेतकरी रात्रंदिवस काबाडकष्ट करुन अर्धपोटी राहतो कारण त्याच्या पुढे अनेक समस्या असतात मुलींचे लग्नही एक समस्या त्याला भेडसावत असते. हुंडापध्दती कायद्याने बंदी असली तरी मान पान , सोनेनाणे, रुसणे, या वृत्ती अजुन बंद झालेल्या नाहीत त्यामुळे तो कर्जबाजारी होतो
आणि नापिकीमुळे कर्ज फेडणे होत नाही म्हणुण आत्महत्या करतो.
शासनाला असे सांगावेसे वाटते कि एक लाख  नि दोन लाख दिल्याने कुटुंब उघड्यावर पडलेले सावरत नाही .त्यांच्या कुटुंबाची अवस्था पाहिली आहे का ? ती कल्पनाच करवत नाही ,म्हणुण शासनाने प्रत्येक गावात फुकटचे कार्यकर्ते पोसण्यापेक्षा सामुहिक विवाह मंडळ बांधुन ठेवा आणि मुलगा मुलगी समान आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न शासनाने लावुन द्यावीत
पुढाऱ्यांकडून नको पुढच्या वेळेच्या मतदानाची तयारी करण्यासाठी तसले ढोंग नको. शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत आरक्षण द्यायला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे असल्यास खरीप, आणि रब्बी दोन्ही पिके तो घेऊ शकेल.कितीही मोठा कृषी अधिकारी असेल तरी त्यांना कसलेल्या शेतकऱ्यांसारखी कौशल्याने पेरणी करता येणार नाही. दिवसभर उन्हात डोक्यावर मुंडासे बांधुन न थकता बैलाला गाणे गाऊन माझा शेतकरीच काम करु शकतो. त्याने शेती पिकवली नाही तर आपण काय खाणार , यंत्रसामग्री ने सर्व कामे करता येतील पण त्यालाही काही मर्यादा आहेत .म्हणुण ख-या अर्थाने तो  जगाचा पोशिंदा आहे.त्याला मरुन देवुन कसे चालेल तो जगला तर देश टिकेल हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
 " मेरे देशकी धरती
सोना उग ले हिरा मोती"
हे फक्त शेतकऱ्यांमुळेच शक्य आहे.
****************************
मीना सानप बीड @ 7
9423715865
स्पर्धेसाठी
****************************
email id -Minasanap1970@ Gmail.com
★★★★★★★★★■★★★★★★★★★★
पुस्तक प्रकाशन साठी ----लेख
-------------------------------------------
स्री शिक्षण--------काल आणि आज
****************************

स्री शिक्षण ही काळाची गरज आहे.
कारण एक स्री शिकली तर अवघे कुटुंब सुशिक्षित होते. पर्यायाने समाज सुशिक्षित बनतो. आणि देशाची प्रगती होते.स्री शिक्षणामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते.
स्रियांच्या काल आणि आजच्या शिक्षणाची स्थिती पाहता सद्याची स्थिती ही प्रगतीकडे वाटचाल करीत असलेली दिसते. परंतु काल म्हणजे फार पुर्वीच्या काळी आपल्या देशात स्रिया पुरुषांच्या बरोबरीने शिकत होत्या , वेदांचे अध्ययन करीत होत्या, याचे दाखले आपण पुराणात ऐकले आहेत. सभेत मोठमोठ्या पंडीतांना हरवणा-या गार्गी, मैत्रयी यांची नावे आपल्याला ऐकून माहित आहेतच, पण नंतरच्या काळात आपल्या देशावर परकियांनी आक्रमणे केली , तेव्हा त्यांच्यापासुन स्रियांचे रक्षण करणे ही गोष्ट स्रियांच्या शिक्षणापेक्षा जास्त महत्वाची होती. त्यासाठी त्यांच्यावर हिंडण्या-फिरण्याची, शिकण्या सवरण्याची, घराबाहेर पडण्याची अशी अनेक बंधने घातली गेली.तिला शिक्षणाच्या संधी नाकारल्या गेल्या,त्यामुळे "चुल आणि मुल" हेच तिचे कार्यक्षेत्र बनले. आणि परकियांची आक्रमणे संपली. काही परकिय इथेच मिसळून गेले तर काही परत गेले.तरी स्रियांवर लादलेली बंधने वर्षानूवर्षे तशीच राहिली.
स्री आणि पुरुष हे एकमेकापेक्षा वेगळी आहेत, त्यांच्यात शारीरिक फरक आहे याचा अर्थ ते एकमेकापेक्षा कमी जास्त आहेत असा नव्हे, परंतु स्रियांच्या बाबतीत मात्र पुर्वीपासुनच पायातली वहाण पायात बरी असे हीन दर्जाचे विचार  समाजात फोफावलेले दिसुन येतात.
म्हणजेच स्री-पुरुष भेदभावाची सुरुवात आपल्या घरापासुनच झाली. सार्वजनिक जीवनातही स्री ला पदोपदी अशाच प्रकारच्या दुय्यम वागणूकीला सामोरे जावे लागाले. बायकांना काय कळते, त्यांची अक्कल चुलीपुरती , अशाच भावनेतुन महत्वाचा निर्णय घेण्याची संधीच दिली जात नसे. संधीच दिली गेली नाही तर तिची क्षमता सिध्द तरी कशी होणार, या सा-यांच्या मुळाशी स्री ही पुरुषापेक्षा कनिष्ठ दर्जाची आहे हाच चुकीचा समज घट्ट रुतलेला दिसुन येतो.

आपल्या देशात इंग्रज  आले, त्यांच्या  बरोबर नवे विचार घेऊन आले. शिक्षणाचे महत्व लोकांना कळु लागले त्या काळात त्यांना राज्यकारभारात मदत करायला माणसे हवीत म्हणुण का होईना पण इंग्रजांनी ही शिक्षणाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले.त्याचा परिणाम स्री शिक्षणावर ही होऊ लागला.स्रियांनी शिकले पाहिजे या साठी समाजसुधारकांनीही प्रयत्न केले.यातुनच स्रियांसाठी वेगळ्या शाळा सुरु झाल्या. त्यासाठी स्वकियांनीही आणि इंग्रजांनीही प्रयत्न केले.

सन 1848 ते 1947 या पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांनी स्री शिक्षणाला चालना देण्यासाठी विविध समित्यांची स्थापना केली. सन1854 च्या वुड च्या खलीत्यात असे ठामपणे सांगण्यात आले की, स्री शिक्षण लोकांवर अधिक शैक्षणिक व नैतिक परिणाम करते. त्यामुळे स्री शिक्षणाकडे दुर्लक्ष करता कामा नये.
सन1859 स्टँन्लेच्या नियमानुसार प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी सर्वत्र स्थानिक शाळा सुरु करण्यात आल्या.आणि मुलींच्या शिक्षणाला सुरुवात झाली.मुलींच्या शिक्षणासाठी इंग्रज सरकार बरोबरच महाराष्टातील समाजसुधारक ही प्रयत्न करीत होते. 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणारे महात्मा ज्योतीबा फुले आपणाला माहितच आहेत. सावित्रीबाई फुले या तर भारतातल्या पहिल्या शिक्षिका होत्या.
त्या काळी समाजाच्या विरोधाला न जुमानता समाजानी केलेल्या अपरिमित छळाला तोंड देत अनेक अडचणीवर मात करीत त्यांनी मुलींना शिक्षण दिले.त्यावेळी त्यांच्या  वर्गात फक्त 6 विद्यार्थिनी होत्या.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांना शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षण घेता यावे यासाठी 1916 मध्ये महिला विद्यापिठाची स्थापना केली. ग्रामीण भागातील सर्व मुलींना शिक्षण मिळावे म्हणुण कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे बाबा, शाहु महाराज यांनी खेडोपाडी शाळा सुरु केल्या.तसेच डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर समाजाला ठणकावुन सांगितले की, ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही फक्त पुरुषासाठीच नाहीत तर त्या स्रियांनाही आवश्यक आहेत."खाण तशी माती" ही म्हण ध्यानात ठेवुन आपली पुढील पिढी जर सुधारायची असेल तर मुलींना शिक्षण दिल्याशिवाय गत्यंतर नाही. मुलांच्या  शिक्षणाबरोबरच मुलींच्या शिक्षणासाठी धडपड केली तर समाजाची प्रगती झपाट्याने होईल. 
या सर्व समाजसुधारकांनी समाज जागृती केल्यामुळे स्वातंत्र्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी जोमाने प्रयत्न करण्यात आले. राधाकृष्णन् आयोग , राष्ट्रीय शिक्षण समिती, कोठारी आयोग यांच्या शिफारशी नुसार स्रियांना शिक्षणासाठी अनेक संधी, सोयी, व सवलती उपलब्ध करुन देण्यात आल्या. मुलींसाठी व स्रियांसाठी सवडीच्या वेळी शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्याची व पत्रव्दारा शिक्षणाची सोय करण्यात आली.राज्यात स्वतंत्र स्री शिक्षण विभागाची स्थापना करण्यात आली.
1986 चे राष्ट्रीय शै.धोरण हा शिक्षणाच्या इतिहासातील एक अत्यंत  महत्वाचा टप्पा समजला जातो. या धोरणात शिक्षणाच्या माध्यमातून  स्रियांना सक्षम करण्यावर अधिक भर देण्यात आला. स्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी एक प्रमुख साधन म्हणुण शिक्षण काम करेल अशी स्पष्ट ग्वाही या धोरणात दिली आहे. या धोरणाची अमंलबजावणी प्रभावी रीतीने करता यावी म्हणुण 1992 साली एक कृती कार्यक्रम  आखण्यात आला.यामध्ये शिक्षणापासुन वंचित असलेल्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष कार्यक्रम  हाती घेण्यात आले, त्याचा परिणाम म्हणुण  महाराष्ट्रात सर्व स्थरातील व सर्व भागातील मुलींसाठी शिक्षणाच्या संधी व सोई उपलब्ध झाल्या.
स्वतंत्र महिला धोरण जाहीर करणारे  महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे.यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण समिती तयार करण्यात आली.अध्यक्ष पद महिलाकडे द्यावे व 70% महिला या सदस्य असाव्यात असे ठरविले. स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणे अन्य संस्था मध्ये महिलासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वंयसहाय्यता बचत गटाची स्थापना, प्रत्येक शासकीय योजना आखताना  महिला हिताचा विचार केला गेला, मुलांच्या दाखल्यावर वडीलाबरोबर आईचे नाव, सातबारा उता-यावर महिलांचे नाव इ. गोष्टी स्रियांच्या शिक्षणामुळे झाल्या .नाहीतर चुल आणि मुल हेच स्रीचे कार्यक्षेत्र राहिले असते.
स्रियांच्या सबलीकरणासाठी शासन जे प्रयत्न करीत आहे त्यात शिक्षण संस्थाचाही वाटा मोठा आहे. 
शिक्षणामधुन स्रियांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य पातळीवर शिक्षण विभागाकडून विविध संस्थामार्फत बरेच प्रयत्न करण्यात आले. गाभाभूत घटकामध्ये स्री-पुरुष समानता हे मुल्य समाविष्ट केले. सर्व पाठ्यपुस्तकातील (धडे, कविता, प्रश्न, चित्रे ) मुलगा मुलगी समान दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी पोषक राहील याची काळजी घेतल्या गेली. सर्व शिक्षण मोहिमे अंतर्गत मुलींच्या  शिक्षणासाठी खास आर्थिक तरतुदी  करण्यात आल्या.शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या तालुक्यात कस्तुरबा गांधी बालिका आश्रम उभारण्यात आले.मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक शाळेत माता पालक संघ तयार करण्यात आले.
1990ला महिला शिक्षण कक्ष स्थापन करण्यात आला.तळागाळातील मुलींनी शिक्षण घ्यावे म्हणुण सावित्री बाई फुले शिष्यवृत्ती, उपस्थिती भत्ता या सारख्या सुविधा शासनाने मुलींच्या शिक्षणासाठु प्रोत्साहन म्हणुण सुरु केल्या.
या सर्व प्रयत्नामुळे आजच्या काळात स्त्री शिक्षिका , डाँक्टर,इंजिनियर,वकील, मँनेजर ,दुकानदार , कारखानदार, सरपंच, आमदार, खासदार, सगळ्या पदावर आज स्त्री  हिमतीने पुरुषा इतकेच चांगले काम करताना दिसतात.
घरातले काम करुन बाहेरचे ही काम सांभाळतात . गेल्या आठ ते दहा वर्षात 10 वी , 12वी ला पास होणाऱ्या मुलींची संख्या मुलापेक्षा जास्त आहे शिवाय गुणवत्ता यादीत पहिल्या 50 मध्ये येणाऱ्या मुलीच जास्त आहेत.
यावरुन असे स्पष्ट होते कि, स्रियांना समान संधी, समान दर्जा, समान हक्क मिळवून द्यायचे असेल तर सर्वात महत्त्वाची भूमिका शिक्षण बजावते. म्हणुण आपल्या भागातील एकुण एक मुली शाळेत येण्याच्या, त्या शाळेत टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने  प्रयत्न करु या !!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भारतातील बेरोजगारी---एक यक्ष प्रश्न

भारत हा 70 % खेड्यानी बनलेला देश आहे.या खेड्यांचा विकास झाल्या शिवाय देशाची प्रगती अशक्य आहे .कारण आज 50%युवक हा खेड्यात बेरोजगारीच्या विळख्यात सापडला आहे. देशाचा विकास हा त्या देशातील तरुणाईंच्या कतृत्वावर अवलंबुन असतो.त्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था बळकट कशी होणार ? आज देशात अनेक तरुण बेरोजगार असल्यामुळे भारतापुढे अनेक समस्यापैकी बेकारीची समस्या आ वासुन उभी आहे.
बेकारी वाढण्याची अनेक कारणे आहेत.शिक्षणव्यवस्था हे एक प्रमुख कारण आहे .जपान प्रमाणे आपल्या देशातही व्यावसायिक शिक्षण हे प्राथमिक स्तरापासुनच असणे आवश्यक आहे.जेणेकरुन विद्यार्थी प्राथमिक शिक्षण पुर्ण केले की स्वतः व्यवसाय करीन खेड्यातील तरुण शहराच्या झगमगाटाला पाहून शहराकडे आकृष्ट होतात आणि खारी समस्या तेथुनच सुरु होते.कारण बेरोजगारीलाअनेक कारणे आहेत.तंत्र शुध्द शिक्षणाचा अभाव,लोकस.ख्येचा भस्मासुर,आणि तरुणांना बिघडवणारी राजकीय पक्ष. ही कारण प्रकर्षाने जाणवतात.शिकुन तरुण मुलं नुसत्या पदव्या गोळा करीत आहेत आणि बेकार होत आहेत.तर काही तरुण अर्ध्या वर आपले शिक्षण सोडून बेकार होत आहेत.तांत्रिक शिक्षण न घेतल्यामुळे कुशल कारीगिर मिळत नाहीत आणि मग वेळ वाचवण्यासाठी बरीचशी कामे यंत्रामार्फत करुन घेतली जातात.म्हणजेच बेकारीत भर पडते.उज्वल भवितव्याच्या पुर्ततेसाठी प्रयत्न, जिद्द, चिकाटी हे गुण आजच्या तरुणामध्ये  दिसत नाहीत.त्यामुळे तरुण उदासिन बनतात.दैवाला बोल लावत हा तरुण आळसाला कुरवाळत बसतो.आळशी मनुष्य हा दगडासारखा असतो.रिकामे हात आणि रिकामे डोके या बेकार तरुणांना स्वस्थ बसु देत नाहीत.मग त्यातुन गुन्हेगारीचा जन्म होतो , गुन्हेगारीतुन व्यसनधिनता वाढीस लागते. या सर्व गोष्टी राजकारण्यांच्या लक्षात येत नाहीत का ? पण स्वतः ची तुंबडी भरण्याच्या हव्यासापुढे त्यांना काही सोयरसुतक नाही "गाव जलो हनुमान बाहर".
आज आपण पहातो शहरे आणि खेडी यात प्रचंड दरी आहे, खेडूत हे निरक्षर आहेत

त्याचे तोटे ते पिढ्यान् पिढ्या भोगत आहेत अडाणी पणा मुळे ना नोकरी ना धंदा ना विकासाची ओढ, धनवान बुद्धिमान थोडे अडाणी दरिद्री नारायणच भरपुर . रिकामपण वेळेचआणि बुद्धीच ! फावला वेळ पारावर फुकट दवडला जातो, दारिद्रय रेषा डोक्यावर
राहुन मान अडकते सावकारी पाशात, जीव घेतात ते पाश.
खेड्यांत अनेक सुविधांचा अभाव असतो हे खरे पण आपणाला चित्र बदलायचे आहे ना ?मग शिकलेली माणसे खेड्यात गेली तर साक्षरता, आरोग्य  तंत्रज्ञान या गोष्टीचे ज्ञान आपल्या बांधवाना दिले तर काही प्रमाणात सावकारीचे पाश ढिले होतील आधुनिक शेतीने हरितक्रांती होईल आणि काही अंशी बेरोजगारीला आळा बसेल.
मुलांजवळ पात्रता  आहे पण मुलाखतीला गेल्यावर अनुभवाला प्राधान्य , पण मी म्हणते नोकरी दिली गेली नाही तर अनुभव कोठून मिळणार. आणि भ्रष्टाचार, वशिले बाजी या आनेक कारणांमुळे बेकारीत वाढ होत आहे.कोशल्य असुनही न्याय मिळत नाही म्हणजेच समाजवादाने व्यक्तिगत कौशल्य मारले जाते तर भांडवलशाही पिळवून टाकते राष्ट्रांच्या प्रगती साठी या दोन्ही गोष्टीचा योग्य वापर व्हायला पाहिजे. तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन  मिळाले पाहिजे.उद्योग धंदे वाढले परंतु मनुष्यबळाचा वापर न केल्यामुळे आणखी बेकारी वाढली .
बेकारी वाढण्याचे आणखी  एक कारण म्हणजे जातीयता. जात हि माणसाची पात्रता ठरवु लागली , परीणामी लायकी , बुद्धिमत्ता , कार्यक्षमता नसलेले उच्च पदस्थ झाले.मग राष्ट्रांला दिशा योग्य कशी मिळणार ?
          प्रांतियता हे ही एक कारण बेरोजगारीचे आहे.बेरोजगार असल्यामुळे आजचा तरुण अनेक चुकीचे निर्णय घेत आहेत्यांच्यात  जीवनाचा खटारा दुःखाच्या  चाकोरीतुन रें-रें करीत चालला आहे. या तरुणांना पैशाचा मोह दाखवून त्यांच्या कडुन देशविघातक कृती करवुन घेतल्या जात आहेत त्यामुळे आजचा तरुण व्यसनाच्या विळख्यात अडकला आहे. जीव तळतळतो तो आई बापाचा  ! आपला मुलगा वाईट वळणाला गेला हे दुःख  उराशी घेऊन ते मरणाला जवळ  करतात.बेरोजगारीमुळे आजचे तरुणआपल्या मुलांना शिक्षण ही देऊ शकणार नाहीत मग उद्याचा भारत कसा असेल, कर्जात जन्म,सरळ व्याजात वाढ,आणि चक्रवाढ व्याजात मृत्यू !! असा देश बघायचा नसेल तर शासनानी   नोकर भरती करावी ,संस्थाना मान्यता देऊन चरायला कुरणे देऊ नयेत,व्यावसायिक शिक्षण द्यावं,पात्रतेवर नोकरी असावी ,मनुष्य बळाचा वापर करणाऱ्या कारखान्यांना परवानगी द्यावी, आणि तरुणानी कोणत्याही कामाची लाज  न बाळगता काम उत्साहाने करावे. नोकरीवर अवलंबुन न राहता तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वतःचा स्वतंत्र  व्यवसाय उभारावा , शासनाने बँके मार्फत कमी व्याज दरात आर्थिक पाठबळ द्यावे .तरच आपला भारत देश बेरोजगारीच्या विळख्यातुन सही सलामत बाहेर पडेल
सौ.मीना सानप
 बीड @ 7
9423715865
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
📕साहित्य दरबार व्दारा📗

वैचारिक लेखमाला
*************************
विषय------- स्वच्छतेचे महत्व
*************************
दिनांक -----16---10----2016
**************************
आज आपल्याला  चिंतनासाठी दिलेला विषय खुप महत्वाचा आहे. कारण स्वच्छता म्हणजे आरोग्य रक्षण व रोगाला प्रतिबंध करणारा महत्वाचा घटक होय. आरोग्य वाढा करणारी किंवा रोगाला प्रतिबंध करणारी परिस्थिती म्हणजेच स्वच्छता. आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने
स्वच्छता ही जीवन जगण्याची एक गरज झाली पाहिजे. तो ऐक सःस्कार झाला पाहिजे. मातीने चांगला आकार  घेऊन, त्यातुन काही नवे साकारण्यासाठी मातीत ओलावा असतानाच आकार द्यायला हवा.अगदी तसेच आहे संस्काराचे .
स्वच्छता हा स्वभावधर्म , जीवनसंस्कार व्हायचा असेल तर बालपणापासुनच प्रयत्न व्हायला हवेत. कृतीशिल उपक्रमाबरोबर शालेय अभ्यासक्रमातुन हा विचार  रुजणे गरजेचे आहे.
वैयक्तिक स्वच्छते बरोबर परिसराची सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली गेली पाहिजे. शालेय शिक्षणाचा काळ हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असतो.या वयात मनावर झालेले संस्कार कायमास्वरुपी टिकुन राहतात. स्चछतेविषयी जागरुक असलेली व्यक्ती निकोप समाजाचा महत्वाचा घटक असते.स्वच्छ परिसर, सुदृढ शरीर, आणि निकोप मन हे कोणत्याही प्रगत समाजाचे प्राथमिक लक्षण आहे.आपले शरीर मन घाण राहू नये असे प्रत्येकाला वाटत असते तसेच माझा परिसर स्वच्छ  असायला पाहिजे ही जाणीव समाजातील प्रत्येक घटकात निर्माण  व्हायला पाहिजे.विद्यार्थी हा तर समाजाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक आहे.
               स्वच्छता हे परमेश्वराचे दुसरे रुप आहे हा सुविचार अनेक ठिकाणी  वाचायला मिळतो.ईश्वराची जशी आपण मनोभावे साधना करतो तशी स्वच्छतेची का असू नये ?
अस्वच्छता केलीच नाही तर स्वच्छतेची वेळच येणार नाही.
याउलट परिस्थिती  परदेशामध्ये आहे 
जपान,इंग्लंड ,जर्मनी ,न्यूझीलंड येथे स्वचछतेविषयीचे काटेकोरपणे नियोजन केलेले आहे वाटेल तेथे कचरा फेकल्यास जबरदस्त दंड आकारला जातो.या देशात कचरा कुठै टाकायचा याबद्दल मुलांना लहानपणापासून शिक्षण दिले जाते.आसपासची स्वच्छता पाहुन मुले आपोआपच शिकतात.स्वच्छताविषयक जनजागृती मुळे हे शक्य झाले आहे.
अशी परिस्थिती आपल्याकडे ही येऊ शकते पण गरज आहे मानसिकता बदलण्याची.
पुस्तकातील छापलेल्या साहित्याचा  मुलावर खोल परिणाम होत असतो म्हणुण पाठ्यपुस्तकात वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता या दोन्ही बाबीवर भर देण्यात आलेला आहे.म्हणुण शाळा स्तरावर स्वच्छता समिती नेमण्यात आलेली असते.
अगोदर चालायला हवे मग पायवाट तयार होते. म्हणुण म.गांधी, संत गाडगे बाबा, तुकडोजी महाराज यानी जनजागृती केली नव्हे नव्हे आधी केले मग सांगितले .
"हाती धरुनी झाडू तू मार्ग दाविलासी
स्पर्शे तुझ्या  महात्म्या, ये थोरवी श्रमांसी"
वाढत्या शहरीकरणामुळे तर कच-याची समस्या खुपच भीषण झाली आहे.
चांगल्या विचारांना बळ तेव्हाच मिळते, जेव्हा त्याला कृतिशीलतेचाआधार मिळतो.म.गांंधी
या महान व्यक्तीमत्वाचा जीवनादर्श आपण पाहिला तर श्रमातुन स्वच्छता  व स्वच्छतेसाठी श्रम असे धडे त्यांनी  दिले.आश्रमातील मुलांना गांधीजी स्वतः शिकवत, स्वतः मैदान सफाई  करीत.ते म्हणत असत , स्वतःच्या  कामाची कसली आली लाज.श्रम हीच खरी प्रतीष्ठा आहे.
खालील बाबी मध्ये स्वच्छता असावी
1)   वैयक्तिक स्वच्छता
2)   परिसर स्वच्छता 
3)   घराची स्वच्छता 
4)   खाण्यापिण्याची स्वच्छता 
5)   मलमुत्र विसर्जनाचे व्यवस्थापण
6)    सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता 
अशाप्रकारे स्वच्छता नसेल तर साथीचे आजार थैमान घालतील.

मीना सानप 
बीड
9423715865




No comments:

Post a Comment