गजानन विश्वनाथ पाटील पवार
मु :- वरूड (समद)
पोस्ट :- पहेणी
ता :- सेनगाव
जि :- हिंगोली
पिन कोड :- 431513
मोबाईल :- 7066779265
जीमेल :- Pawargp81@gmail.com
ब्लॉग :-http/gppawar.blogspot.in
*शेतकरी जगला तरच, देश जगेल*
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
आजच्या घडीला शेतकरीवर्गावर जो अन्याय होत आहे तो इतर कुठल्याही वर्गावर होत नाही आणि तो दुसरा कोणी सहन सुद्धा करू शकणार नाही शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला प्रत्येक तरूण आज स्वतःला कमनशिबी पापी समजत आहे कारण जन्म घेतानाच कर्जाचा बोझा डोईवर घेऊन जन्माला आलेले मुलं म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.
विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ सोयाबीनचे उत्पादन वाढले तर त्याचा भाव आज मातीमोल झाला काय चाललंय काय हे ? आणि जो रात्रंदिवस घाम गाळून शेतात राबतोय त्याच्या पायाखाली विषारी विंचू आहे किंवा साप आला आहे याची पर्वा न करता छातीला लागणाऱ्या सोयाबीन पिकांची फवारणी करतो तेव्हा त्याला भीती वाटत नसेल का हो? समोर काहीही दिसत नसताना कधी रानडुक्कराचा कळप त्याचे अंग फाडून जातो तर कधी कोल्हे चावा घेऊन जाताना पंचवीस किलो वजनाचा फवारणीचा पंप पाठिशी दिवसभर बाळगतो का तर उत्पादन चांगले होईल यावेळी आपली दारिद्र्यामधून सुटका होईल हेच स्वप्न उराशी बाळगून अहोरात्र परिश्रमात मग्न असतो पण याच्यासाठी येणारे प्रत्येक वर्ष हे सारखे निघते फक्त आशेवर जगताना दिसतो त्यात आसमानी तर कधी सुलतानी संकटे उभीच नाफेडचा भाव ठरवताना तेव्हा कधी शेतकऱ्याला विचारले आहे का? भाव ठरवण्या आधी शेतीत एकदिवस तरी राबून बघा मग कळेल काय असतात प्रसूतिवेदना आज शेतकरी संपूर्ण नष्ट झाला आहे त्याची क्रूर थट्टा करू नका ac मध्ये बसून त्याच्या अन्नधान्याचा भाव ठरवून चालणार नाही,अरे साधा तंबाखूच्या टोट्यावर एमआरपी 5₹ आहे,कटिंग सलून मध्ये रेट बोर्ड आहे मग माझ्या शेतकऱ्याचा च का रस पिळून काढताय? कांद्याचे भाव वाढले आंदोलन करता मग आज कांदा एक रुपय किलो आहे आता कुठे गेले सर्व ? आजच्या घडीला शेतकरी शेवटच्या घटका मोजायला लागला पण त्याचेकडे बघायला कोणालाच वेळ नाही कारण तो सत्याचा पुजारी आहे म्हणून का?
दुर्दैवाने सांगायला लागत आहे झेंडूची शेती केली तर पाच रुपये किलोने नाही तर हैदराबादला झेंडू दहा किलो वजनाचा कॅरिट फक्त पाच रूपयाने विकला गेला काही शेतकऱ्याने तर नदीच्या पात्रात फेकून दिले या पेक्षा अधिक काय नशीब म्हणावे शेतकऱ्याचे. एकदिवस शेती ही पडिक जमीन म्हणून ओळखली जाईल यात शंकाच नाही कारण शेतीला लागणारा खर्च हा त्याच्या उत्पादना पेक्षा अधिक वाढला आहे त्यामध्ये राबण्यासाठी मजूर मिळत नाही पेरणीच्या वेळी त्याने लावलेले गणित हे नेमके उलट होते म्हणून तो काढलेल्या कर्जाचे मुद्दल सोडा पण व्याज ही तो फेडण्याची कुवत त्याचेकडे उरलेली नाही त्याचेकडे आधुनिक तंत्रज्ञान घेण्यासाठी पैशाचा अभाव किंवा शासनाने केलेली अर्थिक मदत म्हणजे बर्फाच्या गोळ्या सारखी म्हणून सतत सावकाराचे दाराशीच संपर्कात रहावे लागते बँक कर्ज देण्यासाठी मनमानी पद्धतीने वापर चालतो रेल्वे सारख्या ठिकाणी Wi-fi सारख्या सुविधा उपलब्ध करता येतात चांगली गोष्ट आहे पण सर्व जगाला अन्नधान्य पुरविणारा शेतकरी त्याच्या आत्महत्या रोखण्याचा उपाय कोणी करताना दिसत नाही हे वाईट वाटते
आज दिवाळी सारख्या सणाला बघा प्रत्येक टि.व्ही चॅनल्सवर दाखवत आहेत डाळीचे भाव गगनाला भिडले यात परत भरडला जातो तो सामान्य जीवन जगणारा माणूस आणि याचा फायदा फक्त आणि फक्त व्यावसायिक व्यापारी वर्गाला होतो यात शंका नाही कारण सर्व डाळीचे साठे हे व्यापा-याकडे आहेत या उलट आज घडीला पेरणी साठी लागणारा 'हरभरा' बियाणे हे संपूर्णता व्यापारी दुकानात आहेत जो शेतकऱ्याचा माल व्यापा-यानी चार हजार रुपए क्विंटल ने घेतला तोच माल शेतकरी अकरा हजार रुपयाने पेरणीसाठी घेत आहेत म्हणून डाळीचे भाव वाढलेले दिसत आहेत.
'जावे त्यांचे वंशी तेव्हा कळे' हे ज्यानी अनुभवले आहे त्यालाच कळेल लाखो रुपय खर्च करून सुद्धा त्याचे पदरात धोंडा पडतो पाऊस जास्त झाला तरी दुष्काळात होरपळून निघतो तो शेतकरी कमी झाला तरी तोच यावर ठोस उपाय कोणीच काढत नाही म्हणून आत्महत्येसारखा गंभीर मार्ग तो निवडतो सर्वाना आपले रेट भाव मनानेच वाढवता येतात साधा मजूरवर्ग ही सांगतो 'आम्हाला अमूक येवढे पैसे दिले तर कामावर येऊ नाही तर नाही' पण शेतातील कष्टाने पिकवून हिरे मोत्या सारखे धान्य बाजारात नेऊन भाव व्यापारी ठरवणार हे कोणते दुर्दैव....
हे कुठं तरी बदलायला हवे आहे
तेव्हाच ही दरी मिटेल...
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
-गजानन विश्वनाथ पाटील पवार
मु :- वरुड (समद)
पो :- पहेनी
ता :- सेनगाव
जि :- हिंगोली
पिन कोड 431513
मो नंबर 7066779265/
Pawargp81@gmail.com
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*।।स्वच्छतेचे महत्त्व।।*
"हात फिरे तेथे लक्ष्मी" आज या दगदगीच्या, धकाधकीच्या जीवनात वावरताना नकळतपणे आपल्याकडून स्वच्छता तर सोडाच पण घाण मात्र वाढत असते गाडीतून जाताना किंवा रस्त्यावरून जाताना पण आपले तोंड मुके नाही रहात कोठे गाडा दिसला तर सहजपणे डोळ्याना दिसतात ती पिकलेली केळी,शहाळे किंवा टाईमपास खुसखुशीत खरमुरे नाही तर भयमुग शेंगा,नव्हे मक्काचे कणीस आणि नकळतपणे आपल्या हातातून रस्त्यावर घाण साचण्याची सुरूवात होते त्याकडे आपले लक्ष कधीच जात नाही हळूहळू हा अस्वच्छतेचा राक्षस वाढत जावून पर्वताचे रूप धारण करायला सुरुवात होते तेव्हा आपणच केलेल्या घाणेरड्या वर्तणूकीमुळे सर्वांचे आरोग्य धोक्यात येण्यास प्रारंभ गणला जातो आणि तोच रोष ओढवून आपणच शासनाला दोष देत फिरत असतो पण याला आळा घालायचा असेल तर स्वतःपासून सुरूवात करायला हवी सर्व सिध्दीचे मुळ म्हणजे स्वय मनावर घेऊन केल्यास आपला गावच नाही तर आपला तालुका,जिल्हा, राज्य,सर्व देश समृद्ध होण्यास विलंब लागणार नाही पण आता फक्त स्वच्छता मोहीम ह्याकडे सर्व 'राजकारण' यादृष्टीनेच बघितले जात आहे 'संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान' सारखा सुंदर उपक्रम माननीय स्व. आर आर पाटील यांनी अमलात आणला होता पण त्यातही नंतर राजकारण सुरूवात झाली आणि बेगडी स्वरूप प्राप्त झाल्याने त्याचाही फारसा उपयोग झाला नाही ज्या गावांमध्ये अभियान राबविण्यात आले आणि तनमन धनानि ज्या खेड्यात एकोप्याने सर्व एकत्र येऊन छान कार्य केले त्याच बर्यापैकी गावांना जे बघण्यासाठी नेमलेल्या समिती होत्या त्यांनीच राजकारण सुरू केले याचा परिणाम म्हणून चांगल्या कार्याची पोचपावती मिळाली नाही म्हणुन परत तेच गावे परत घाण आणि दुर्गंधीच्या विळख्यात सापडले...
संत गाडगेबाबानी स्वहस्ते गावेच्या गावे स्वच्छ करण्याचा वसा घेतला होता रोज बंदीच्या पंगती बाबा उठवायचे पण त्या बुंदीचा एक कण सुद्धा बाबा आपल्या मुखात टाकत नव्हते सर्व जीवन समाजाच्या भल्यासाठी आणि स्वच्छतेसाठी वाहिले होते दिवसा गावे स्वच्छ करावीत आणि रात्री आपल्या कीर्तनातून या समाजाचे मने स्वच्छ करावीत हाच निशिदिनी धंदा चालत असे....आशा थोर महान राष्ट्रसंताला कोटी कोटी प्रणाम.....
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
युगपुरुष जन्मा आले
हाती झाडू खराटा जडला.....!
केली स्वच्छता गावोगावी
मनोमनी हृदयी बसला.....!!
धन्य दिले तुम्ही धडे विश्वाला
म्हणून सत्यार्थ तुमचा आवडतो......!
तुमच्या मार्गी चालनारा जीव,
जगामध्ये स्वंयप्रकाश घडवतो......!!
तनामनाची काढून घाण
सफाई केली जाती बंधाची......!
जगासी कर्तव्यबोध देते झाला
साथ संत कीर्तन लाखमोलाची.......!!
धन्य जगती महान थोर संत
गाडगेबाबा,तुकडोजी अविरत .....!
चालविला अवडंबर उभारथ
वाहीले जीवन परमार्थ सेवेत.....!!
अर्पित केले प्रेम जगती
ग्रामगीता ग्रंथ हृदयी धरा......!
निर्धार कल्पित तुम्ही करा
स्वच्छता महतीचा ध्यास धरा......!!
🌷 गजानन पाटील पवार 🌷
@81
==========================
♧ माय ♧
तुझ्या ओंजळीत सारे
विश्व व्यापूनिया राही |
तुझ्या उपकारा साठी
जगामध्ये तोड नाही ||
रीती नाही कधीच ही
ओंजळ सदा भरली |
प्रेमे ओसंडून वाहे
गंगेसम व्यापलेली ||
कुठे होतो नसे जाण
मज जन्म तू दिलास |
केला देह धारण मी
श्रृष्टी पडली दृष्टीस ||
तुझ्याविना जगण्यात
नाही अर्थ या जीवना |
तुझ्या पुण्याईची ठेव
माथा टेकीतो चरणा ||
मरताना सुद्धा यावे
नाव तुझे माझ्या ओठी |
चूकतील जन्म फेरे
तुझ्या मुळे कोटी कोटी ||
¤ :- गजानन पाटील पवार
No comments:
Post a Comment