Sunday, 12 June 2016

अनिल लांडगे

परिचय:-

नाव: अनिल बी. लांडगे

पत्ता: उंडणगाव ता.सिल्लोड,
         जि.औरंगाबाद.

शिक्षण: बी.ए.बी.एड्.(मराठी)

व्यवसाय: माध्यमिक शिक्षक

शाळा: सा.फुले कन्या प्रशाला
          उडणगाव,ता. सिल्लोड,
          जि. औरंगाबाद.

जन्म दिनांक: 14 सप्टेंबर 1971

मो.नं.- 968 967 5050

ई-मेल: anillandge71@gmail.com


आवड: चारोळी,वात्रटिका,कविता लेखन 
           व वाचन


 


(काव्यप्रकार :- अष्टाक्षरी)

1)
‘पाऊस’

अरे पावसा पावसा,
जरा असारे बरस।।
रान होऊ देना चिंब,
किती देशील तरास।।१।।

रान झाल सैरभर,
कसं तुझ्यारे वाचून।।
किती करु विनवनी,
बाप गेला रे खचून।।२।।

कष्ट ओतीले मातीत,
नाही पाहवत रानी।।
पाहता बापाच्या मुखी,
नको ते विचार मनी।।३।।

येतांना आला पाऊस,
रान गेलं शहारुन।।
पाही हिरव सपान,
बाप गेला मोहरुन।।४।।

जातांना तू असा कसा,
गेला तांडव नाचून।।
पाहिला बाप रडता,
थेंब पापणी अडून।।५।।

✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
----------------------------

(काव्यप्रकार :- अष्टाक्षरी)

2)
‘मिटवा नामोनिशाण’

येऊनिया अतिरेकी,
आमच्याच पहा घरी।
घाव घातलासा त्यांनी,
नेमका आमच्या उरी।।१।।

नाही तयांसी सोडले,
यमसदनी धाडले।
चार जनासाठी मात्र,
अठरा रणी पडले।।२।।

उडवणार किती हे,
वाचाळ असे फवारो।
कितीदा बरे देणार,
वांझ शाब्दिक इशारे।।३।।

पटत नाही ही गोष्ट,
मन हे कळवतयं।
उभ्या भारत वर्षाचे,
रक्त सळसळतयं।।४।।

मुठी आवळूनी आता,
भावना एकच मनी।
मिटवूनिया टाकाच,
एकदा नामोनिशाणी।।५।।

✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
----------------------------

(काव्यप्रकार-सुधाकरी)

3)
‘निरोप’

रनी चाललासे
तु वीर जावान
असे अभिमान
          प्रत्येकाशी।।१।।

घेऊनी निरोप
चाले ध्येया वाटे
कंठ पहा दाटे
          मायबापा।।२।।

ओवाळी पतीशी
मन गहिवरे
हाती थरथरे
          पंचारती।।३।।

दृष्टादृष्ट होता
घालमेल मनी
अश्रू हे नयनी
          पत्नीच्या ते।।४।।

सोडूनी स्वजना
जाता सीमेवरी
रक्षण ते करी
          हिंददेशा।।५।।

लढता लढता
घाव तुझ्या ऊरी
वेदना अंतरी
          ती पत्नीच्या।।६।।

✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
----------------------------

(काव्यप्रकार-सुधाकरी)

4)
‘शिक्षक’

शिक्षक असतो
जैसा की कुंभार
गाऱ्यासआकार
          देत असे।।१।।

शिक्षक असतो
शामची माऊली
प्रेमाची साऊली
          शिष्यावरी।।२।।

शिक्षक असतो
वात्सल्याचा सिंधु
सन्मानाचा बिंदू
          समाजात।।३।।

शिक्षक असतो
व्यवहार ज्ञानी
अमृताचे वाणी
          गुरुमुखी।।४।।

शिक्षक भासे तो
ईश्वरस्वरुप
पाहता हुरुप
          तनोमनी।।५।।

शिक्षक धरितो
सत्याची ती कास
मनी असे आस
          शिष्यहित।।६।।

शिक्षक करितो
मुलांशी संस्कार
ज्ञानाचा भास्कर 
वंदनीय।।७।।

✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
----------------------------

5)
 ‘पाणी वाचवा’

थेंब थेंब पाण्यासाठी,
माऊलीचा आटापिटा।।
भरेना कधी माठ-रांजण,
किती घालूनीयाही खेटा।।

थेंब थेंब पाण्यात कसं,
महत्त्व जीवनाचं दडलयं।।
केल्याने छळ निसर्गाचा,
दर्शन दुष्काळाचं घडलयं।।

घोटभर पाण्याच्या शोधातं,
मायमाऊली फिरे अनवाणी।।
ओळखूनी भविष्यातला धोका,
थेंब थेंब वाचवा रे पाणी।।

थेंब अन् थेंब पाण्याचा,
आता जमिनीत जिरवा।।
पाळाल हा मंत्र तरचं,
राहील जीवनात गारवा।।


✒अनिल लांडगे उंडणगाव,
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050



चारोळी...


1) ‘लेक वाचवा'

लेक वाचली तरच,
आई-ताईचे नाते आहे।।
स्त्रीत्वाचे हे सर्वच नाते,
लेकीशिवाय रिते आहे।।

2) ‘जातं’

जात्या बरोबर जात्यावरची,
ओवी ही राहिली नाही।।
संगीत घेता तयाचे काढून,
गाण्याला त्या अर्थ ना काही।।

3) ‘नाव'

पेरावे असे काही,
दमदार उगले पाहिजे।।
तुम्ही नसाल तेव्हा,
नाव तुमचे जगले पाहिजे।।

4) ‘संकट'

जीवनात फुलांपेक्षा,
काटेच असतात जास्त।।
संकटाशी करीत सामना,
जगत रहावे मस्त।।

5) ‘दानत’

असेल जशी दानत,
तसे तसे देत जावे।।
ईक्षु असे मधुर परी,
मुळासवे ना घ्यावे।।

6) ‘आरसा'

आरशात असे पाहतांना,
एकदम दचकलोनां राव।।
मला पाहून म्हणतो कसा,
आतातरी खरा चेहरा दाव।।

7) ‘प्रित’

प्रित तुझी लटकी मज,
जीवा वेड लावून गेली।।
आष्टमीच्या रात्र आभाळी,
पूर्ण चंद्रमा दावून गेली।।

8) ‘सहवास’

सहवास तुझा-माझा,
खरे सांगू आहे कसा।।
कसे जगावे तूजविना,
माझा श्वास तु जसा।।

9) ‘स्वप्न’

स्वप्नांच्या पंखात,
जिद्दीचे बळ असावे।।
नैराश्य अन् न्यूनगंडाचे,
अंतरी गरळ नसावे।।

10) ‘थंडी’

अलगद येऊ मजला,
ती साद घालत आहे।।
उगाच मनात शंका नको,
थंडी विषयी बोलत आहे।।


✒अनिल लांडगे उंडणगाव,
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050/9021261820



No comments:

Post a Comment