खेलोगे कुदोगे तो होगे खराब
पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब
अशी म्हण मी नेहमीच एकत आले.कारण आपल्या मध्यमवर्गीय समाजात खेळास फारसे महत्व दिले जात नाही. पहिले स्थान शिक्षण नंतर खेळ हा आपला मध्यमवर्गियांचा पक्का केलेला समज.शाळेच्या क्रीडा स्पर्धेत पहिला नंबर आल्यास आपण कोणासही उठसुट सांगत बसत नाही परंतु कुठे मेडिकल,इजिंनिअरिंग लागला तर मात्र चर्चेला जणु पेव फुटत.कारण खेळ खेळून काय कोणाच पोट भरत हा आपल्या मध्यवर्गियांचा समज.शिकूनसवरून एक गडगंज पगाराची नौकरी मिळाली की आरामात आयुष्य कटत नि साऱया आयूष्याचीच चिंता मिटते. पण कधी कोणाच्या मनासही आपल्या पाल्याला व्यावसायिक क्किडापटू बबनवण्याचा विचार साधा स्पर्शुनही जात नाही.हि उदासिनता का ? याचा कधी विचार केलाय का आपण ?
खरे पहता जशी मुळ खोलवर रूजली की झाड हे कधी कमकुवत बनत नाही तसाच हा खेळाबाबतीतचा उदासिनपणा हा शालेय जिवनापासुनच दूर होऊ शकतो आपण खेळाची आवड मुलाना शालेय जीवनात रूजवायास हवी प्रथम आनंद म्हणुन त्यास खेळ खेळू द्याव व हळूहळू व स्पर्धेत त्यास उतराव आणि मग आवड निर्माण झाल्यास मुल बरोबल आरोग्याची फायदे व देशासाठी खेळून व्यावसायिक बाजूही जपली जाऊ शकते हे सर्वाच्या लक्षात येईलच आणि खेळाबाबतची उदासिनताही दूर होईल नि नक्कीच भविष्यात घराघरात खेळडू जन्माला येतील यात शंकाच नाही.
आपण शालेय जीवनात क्रिडा प्रकाराकडे नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे. शाळेत जर प्रत्येक वर्षी मुलांना वेगवेगळ्या क्रिडा स्पर्धेत भाग घेवून त्यास जर जिल्हा,विभाग,राज्य..नि पुढे अशा पातळीवर जाणिवपुर्वक लक्ष देवून प्रोत्साहन दिल तर नक्कीच भावी भारतात आँलिम्पिक मध्ये अनेक पदके जिंकली जातील यात शंकाच नाही.परंतु शासकिय दरबारातुन मात्र याकडे फारश्या आशादयक वृत्तीन पाहिल जात नाही आणि हव्या त्या सुविधाही पुरवल्या जात नाही.शाळेत मुलांनमध्ये खुप खेळाबाबत उर्मी असते परंतु त्यात यथायोग्य साथ मिळते का ? त्या योग्य प्रशिक्षण मिळत का ? पुरक साहित्य,कोच,क्रीडागंण मिळत का ? या न अशा अनेक प्रश्नात आपला शालेय जीवनातील क्रिडा प्रकार हा आडकला आहे.
खरे पाहता शाळेत मुल 7तास अभ्यास करून केविलवाणी होतात म्हणुन 8 वा तास खेळाचा ठेवला जातो जणेकरून मुल उत्साही व्हावी व आरोग्य सुदृढ रहाव व निरोगी बनाव.मुलांना शाळेतील खेळ हा मुलांच्या मनावर केलेला एक प्रकारचा संस्कारच म्हणावयास हवा.जेणेकरून मुल उत्साही,ताकतवान,नि खेळाडू वृत्तीची बनतील.अशाप्रकारे शालेय जीवनापासुनच जर खेळाच बाळकडू आपण मुलांस देत गेलो तर नक्कीच मुलांना स्व:ताच्या निरोगी शरिराबरोबर देशालाही त्यांच्या खेळाचा नक्कीच फायदा होईल.याचसाठी प्रत्येकानी चिकीटीन शालेय जीवनापासुनच आपल्या आवडीचा खेळप्रकार निवडून त्यात पुढे प्रगती करावयास हवी व देशाच नाव उंचावण्यात अग्रक्रमी व्हावे.
परंतु काही लोक मात्र खेळाकडे एक मनोरंजनाच साधन म्हणुन पाहत आहेत.परंतु आता मात्र सिंधू नि साक्षीच्या यशाकडे पाहून नव्या पिढीच्या नजरेत मात्रहे क्षेत्र विविध आपेक्षनी भरलेल दिसत आहे. आणि नोकरशाही मानसिकता आता बदलू पाहत असतांना दिसत आहे.क्रिडेलाही एक व्यावसायिक क्षेत्र म्हणुन निवडण्याची मानसिकता नक्कीच हि रिओ नि बदलवली आहे असे म्हणावे वाटते.नि शालेय जीवनात यापुढे नक्की उत्साहित उर्मीन पाहून जोमाने भावी खेळाडू तयार होतील ही आपेक्षा आपण नक्कीच बाळगू शकतो.
म्हणुनच प्रत्येकान शालेय जीवनापासुन खेळ खेळावीत व ती आवड जोपासावी व, सर्वानीच खेळाबाबत जागृत राहून भावी खेळाडू शाळेत तयार करावेत हीच देशाची शाळेकडून आपेक्षा राहिल! !!!!!
....................................
*कल्पना जगदाळे
@8 बीड
◆◆◆★★★◆◆◆■■■●●●
🔵साहित्य दर्पणव्दारा आयोजित🔵
🔴वैचारिक लेखमाला🔴
*💥स्वच्छतेचे महत्व💥*
###############
*Health is wealth*
*आरोग्य धनसंपदा*
*निरोगी शरिरात निरोगी मन वास करते*
हि व अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो आणि म्हणूनच हे आपले मौल्यवान जीवन जर आपणास आनंदाने जगायचे असेल तर आपले शरीर निरोगी असले पाहिजे.आणि निरोगी जीवनासाठी स्वच्छता हि जिवनात अत्यंत आवश्यक बाब ठरत आहे. अस्वच्छतेमुळे अनेक रोगांचा प्रसार होतो.
आपल्या जीवनात स्वच्छतेची सवय हि आपण एखाद्या व्यसनासारखी लावून घ्यायला हवी कारण अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर व
वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव
यामुळे साथीच्या रोगांना बळी पडावे लागते. तसेच स्वच्छतेचे पालन केले तर अनेक रोगांवर मात करता येवू शकते.त्यामुळे प्रथमत:
स्वच्छता म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे.
स्वच्छता म्हणजे आपण ढोबळ मानाने खालील मुद्दयावरून व्याख्या करू शकतो.वैयक्तिक स्वच्छता,परिसराची स्वच्छता,अन्नाची स्वच्छता,पिण्याच्या पाण्याची हाताळणी,सांडपाणी व्यवस्थापन
यास आपण स्वच्छता असे म्हणता येईल.
यामधील अत्यंत महत्वाचे म्हणजे वैयक्तिक स्वच्छता आहे. दररोज अंघोळ करणे, नियमित नखे कापणे, हात स्वच्छ धुणे,चप्पलचा वापर करणे,नियमित केस विंचरणे,स्वच्छ व धुतलेले कपडे घालणे.
वैयक्तिक स्वच्छतेचे पालन झाले तर 50 टक्के आजार कमी होतात. आजही अनेक लोक शौचालयातून आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धूत नाहीत. त्यामुळे रोगजंतूंच्या प्रसाराचे प्रमाण वाढते आहे. साबणाने हात स्वच्छ धुतल्यावर रोगजंतू मरतात, त्यामुळे रोग प्रसाराचे प्रमाणही घटते.
वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच परिसर स्वच्छताही महत्त्वाची असते. स्वच्छतेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन स्वच्छतेच्या कामात लोकांचा सहभाग वाढण्यासाठी 2 ऑक्टोबर 2000 पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.तसेच स्वच्छतेचे सातत्य टिकविणे आणि अभियानाच्या माध्यमातून वैयक्तिक स्वच्छतेचा प्रचार- प्रसार व्हावा यासाठी शाळा व शिक्षण हे माध्यम मुलांना नि गावकऱ्यांना महत्त्व पटवून देण्याचे आदर्श माध्यम बनेल असे मला वाटते.
म्हणुनच आता स्वच्छतेचा घेतलेला वसा हा न उतता न मातता पुढे चालू ठेवण्याची शपथ घेवूया नि जनजागृती करणे हे आपले आद्य कर्तव्य मानूया व स्वच्छतेचे महत्व जनसामान्यास पटवून देवूयात.
कल्पना जगदाळे-घिगे
★बीड
No comments:
Post a Comment