babu disuza article
================================
* संपूर्ण नांव - बाबू फिलीप डिसोजा (कुमठेकर)
* पत्ता - हिमगौरी, बिल्डिंग २१ फ्लॅट
१३ सेक्टर २१ स्कीम
१० यमुनानगर, निगडी,
पुणे ४११०४४
* मोबाईल क्रमांक -
9890567468
* ईमेल - babudisouza@gmail.com
================================
उधाण
अभ्रछायेत आशा कवडसा दिसला
चेहरा सखीचा जणू पूर्णचंद्र भांसला
इथे बेभान होत तसा उधाणत गेलो
दिला सखीने अनुकूल प्रतिसाद जेंव्हा
विद्रोही उद्रेकी छेदल्या परंपरा तेंव्हा
चिन्ह, संकेतांनी त्या तसा उधाणत गेलो
किनाऱ्यावर नवी स्वप्ने अन् नव्या आशा
मनभावी, रुपेरी पेलीत क्षितिज रेषा
जीव तो खुळावला तसा उधाणत गेलो
अंतरी उचंबळल्या भावना काठोकाठ
आयुष्य ठेवी खूण कायमची जन्मगांठ
झाले मनाजोगते तसा उधाणत गेलो
लौकिक मर्यादांची पाळली बंधने थोडी
प्रीतीमध्ये मी झालो सागर ती नदी वेडी
आतुर भेटायाला तसा उधाणत गेलो
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
================================
त्यासाठी
कांही जखमा, कांही व्रण आयुष्यात सोबतीला
कांही नकाशे, कांही खुणा मागे मागोवा घ्यायला
सुखदुःखाचे ठावे भुलभुलैयात हरविले
कांही वळणे, कांही वाटा इथे अर्थ शोधायला
जाण्यासाठी पडती पुढे अनुभव उपयोगी
कांही नमुने, कांही सौदे व्यवहार कळायला
साधायास डाव खबर आपसूक पसरती
कांही अफवा, कांही नोंदी इतिहास ठरायला
येतात प्रसंग बाके अवमानना करणारे
कांही दुष्मन, कांही मित्र कायमचे स्मरायला
भय बदनामीचे उभे पुढे पुढे जाणाऱ्याला
कांही शिक्के, कांही डाग भाग पडे मिरवायला
चलन खोटे, मुखवटेधारी संभावित साव
अजब जमाना, लागते सत्याला सिद्ध व्हायला
_बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
================================
::विठ्ठल दर्शन ::
विठ्ठल विठ्ठल गजरी
दुमदुमली ही पंढरी
विसावे भिवरेच्या तीरी
जय पांडुरंगा श्रीहरी
-1-
पाने फुले अर्पू चरणी
केवडा, दवणा शरणी
माळली तुळशी मंजिरी
प्रकटे माधुरी वैखरी
-2-
गोपीचंदन टिळा भाळी
राऊळी अबीर उधळी
आबालवृद्ध नरनारी
वैष्णव मेळा, भक्ती भरी
-3-
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे ४११०४४
विठ्ठल विठ्ठल गजरी
दुमदुमली ही पंढरी
विसावे भिवरेच्या तीरी
जय पांडुरंगा श्रीहरी
-1-
पाने फुले अर्पू चरणी
केवडा, दवणा शरणी
माळली तुळशी मंजिरी
प्रकटे माधुरी वैखरी
-2-
गोपीचंदन टिळा भाळी
राऊळी अबीर उधळी
आबालवृद्ध नरनारी
वैष्णव मेळा, भक्ती भरी
-3-
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे ४११०४४
===========================

No comments:
Post a Comment