Thursday, 3 November 2016

14 निर्मला सोनी

जयश्री पाटील




जयश्री अनिल पाटील
न्यू एरीगेशन कॉलनी
मु पो ता वसमत
जि.हिंगोली
431512
प्रा.शिक्षिका
जन्मदिनांक :- 28/3/73
मो.नं...9421387623
ई.मेल..jayshrianilpatil@gmail.com
छंद..वाचन,लेखन, पर्यटन





Tuesday, 1 November 2016

अनुपमा जाधव

अनुपमा जाधव

संगीता भांडवले

नाव- संगीता भांडवले

पत्ता- तपोवन रोड वाशी
ता वाशी जि उस्मानाबाद

व्यवसाय-प्राथमिक शिक्षिका

पत्ता-जि प प्रा शाळा शेंडी
ता वाशी जि उस्मानाबाद

जन्मदिनांक-४ऑक्टो.१९७५

मोबाईल क्रमांक-९९२३४४३०६

Email- iamsangitabhandwale@gmail.com

छंद- वाचन,लेखन,

आबासाहेब निर्मळे


आबासाहेब निर्मळे.
95/1A ,नविन  वसाहत पेठ वडगाव .ता.हातकणंगले. जि.कोल्हापूर.
9028090266.

रोहिदास होले


थोडक्यात परिचय

नाव - रोहिदास बापू होले
पत्ता - मु. पो. गोपाळवाडी
        ता. दौंड  जि. पुणे
व्यवसाय - हॉटेल व्यवसाय  /
फर्निचर लाकडी डोअर कोटिंग डोअर कारपेंटर
पत्ता - दौंड .
         ता. दौंड  जि. पुणे
जन्मदिनांक - १ जुलै १९८२
मोबाईल क्रमांक - ९०२८३४१५३६ /९७३०५६१८७०
Email - shrinathhole2014@gamil.com
छंद - कविता लिहणे...पोहणे...मैत्री वाढविणे..
गरजूंना मदत करणे..


Sunday, 30 October 2016

शुभ संदेश

🌹शुभेच्छा संदेश......

-------------------------

प्रति,

मा.ना.सा.येवतीकर

"साहित्यदर्पण " विशेषांक

--------------------------

सस्नेह नमस्कार.


आपले व आपल्या 'साहित्य ग्रुपचे 'विशेष अभिनंदन...

प्रसार माध्यमाच्या क्षेत्रात व्हाॅट्स अॅप हे विशेष माध्यम आता जगभर प्रचलीत झाले आहे.या माध्यमाद्वारे वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांपर्यंत कसे पोहचता येईल व यशस्वी कसे होता येईल ही सातत्याने धडपड करताना दिसते आहे.हा आशय जरी असला तरी याला अपवाद हा साहित्य ग्रुप आहे.मा.आप्पासाहेब सुरवसे,मा.जननायक मारुती खुडे आणि मा. ना.सा. येवतीकर सर या त्रिमूर्तीनी या माध्यमाद्वारे एक आगळे वेगळे दालन निर्माण केले.यात मोजकी  आणि चांगली सदस्यमंडळी घेऊन उत्कृष्ट रित्या चालवताना अभिमानास्पद वाटले.

हा ग्रुप नावाप्रमाणेच पूर्णतः साहित्यसाधनेला अर्पण केला आहे.

या ग्रपमध्ये शिक्षक,प्राध्यापक,साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते,विविध प्रसार माध्यमातील मान्यवर मंडळी आणि इतर सारेच या ग्रुपमध्ये गुण्यागोविंदाने काम करताना दिसून येतात.यातून सहकार्याची,एकतेची भावना दिसून येते.

दररोज चालणा-या विविध उपक्रमाचे साप्ताहिक नियोजन करुन राबवले जाते.त्यात चित्रचारोळी,

नादचारोळी,मूक्त खुली कविता,गझल,सुधाकरी,अभंग,हायकू हे काव्यप्रकार घेतले जातात.

साहित्यदरबार घेऊन साहित्यावर ऑनलाईन चर्चा,परिसंवाद घेतले जातात.

ग्रुपमधील सदस्यांचे वाढदिवसही आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरे करतात.

सामाजिक बांधिलकी जोपासत गरीब व होतकरू मुलांना वह्या वाटप करणे ,अनाथ मुलांच्या अनाथाश्रमात जाऊन त्यांना अन्नदान,वस्त्रदान किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने भेटवस्तू देणे,आर्थिक मदत निधीच्यारुपाने देणे असे कितीतरी उपक्रम या ग्रुपतर्फे राबवतात.याचे सारे श्रेय मेहनती,दूरदृष्टी असलेल्या ग्रुपसदस्यांना जाते.

 म्हणूनच हा ग्रुप इतर ग्रुपपेक्षा खरच वेगळा आहे.

"साहित्य दर्पण"हा विशेष अंक काढत आहात.यात आपण आतापर्यंत राबवलेल्या विविध उपक्रमाची नोंद घेत वाचकासमोर सादर करणार आहात हा विशेष आनंद वाटत आहे.असेच उपक्रम सातत्याने चालू रहावेत.नवनवीन संकल्पना निर्माण होऊन कार्यान्वित व्हावेत.असेच यशाचे गौरीशंकर जिद्दीने सर करावेत.आपल्या ह्या 

उपक्रमास भरभरून हार्दिक शुभेच्छा.


 - व्यंकटेश काटकर

   (कवी तथा साहित्यिक)

नांदेड.भ्रमण.9421839590.

💠💠💠💠💠💠💠💠

येवतीकर सर,

 प्रथमत: आपले अभिनंदन.  तसेच माझ्या अनेक शुभेच्छा आपल्या साहीत्य दर्पणला नेहमीच आहेत. साहीत्याची व साहीत्यीकाची ओळख तुम्ही या दर्पणातून करताय. शिवाय साहीत्यात नवीन साहीत्यीकांना एक व्यासपिठ मिळवून देण्याच मोलाचं काम यातून होत असतं. तेव्हा आपल्या साहीत्य दर्पणला माझ्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा.

    धन्यवाद.

    - अनुराधा हवेलीकर✍🏻

       कवयित्री, नांदेड

★★★★★★★★★★★★★★

🌹 साहित्य दर्पण..2016🌹

सर्व वाड्:मय प्रकाराच्या नातलगांना सोबत घेऊन सुंदरसा ग्रंथ प्रकाशीत होतो आहे. ही माझ्यादृष्टीने आनंदाची व सहविचाराची मांदियाळी आहे. आपल्या या वैचारिक , साहित्यीक कर्तव्याला माझ्या मुबारकी शुभेच्छा ....

 🌹🌹🌹

  ----   शफी  बोल्डेकर, साहित्यिक

           कळमनुरी.

★★★★★★★★★★★★★★

Sunday, 23 October 2016

Narendra maske

शेतकरी जगला तर देश टिकेल....
     बळीराजा सुखी तर देश सुखी अर्थात शेतकरी जगला तर देश टिकेल.भारत हा कृषीप्रधान देश आहे,शेती हा मुख्य व्यवसाय व येथील शेतकरी हा भारताचा अविभाज्य घटक म्हणजेच पाठीचा कणा.
तृष्णा भागविण्या या धरणीची
वरुणराजा जेव्हा येई बरसुनी
तव घामाऐवजी मातीत रक्त सांडुनी
बळीराजा राबतो शेतात रात्रंदिनी
पिकवुन मग मातीत मोती
जोडतो भाकरीचे मानवाशी नाती
   भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु या देशातील जगाचा पोशिंदा निसर्गाच्या फेर्‍यात अडकुन आर्थिक विवंचनेत दिसतो.कधी दुष्काळ , कधी महापूर तर कधी गारपिटीचा तडाखा यामुळे तोंडाशी आलेला घास नकळत दुर जातांना भावी स्वप्न सत्यात उतरण्यापुर्वीच पाण्यात वाहतांना बघण्याशिवाय पर्याय नसतो.भारनियमन, पाण्याची कमतरता, शेतीमालाला मिळणारा अल्पभाव आदी समस्या तर पाचवीलाच पुजलेल्या, एकुणचअतीकष्टाला फळ मिळत नाही.प्रत्येकाला आपला मोबदला मिळायला हवापरंतु त्याच्या मेहनतीचा लाभ दुसराच उचलत असतो हा त्याच्यावर झालेला अन्यायच म्हटला पाहीजे.
शेतकरी रात्रंदिनी शेतात घाम गाळे
मालास परि त्याच्या भाव न मिळे
तरी सर्व त्यास छळे
मज हे न कळे
जगाचा पोशिंदा सुखी तर जग सुखी परंतु आज सर्वच वस्तु महाग होतांना शेतकर्‍यांचा मालाला मग तो कपाशी , कांदा असो व सारा माल पाहीजे तेव्हढा भाव मिळत नाही यासाठी शासनाने जास्तीत जास्त भावात हा माल खरेदी केला पाहीजे.
   बोगस बियाणे म्हणजे शेतकर्‍यांच्या जीवनाशी खेळला जाणारा जीवघेणा खेळच ,जे मिळणार्‍या पैशांनी भावी आयुष्याचे स्वप्न पाहतो तेच या बोगस बियाण्यांद्वारे नष्ट होते.बियाणे असो वा खते नेहमीच फसवणुक होतांना दिसते ज्यासाठी अक्षरशः रांगेत ताटकळत ऊभे रहावे लागते व हाती मिळते ते बोगस बियाणे व ढासळलेली गुणवत्ता असलेली खते त्यानंतर शेतीमाल बाजारपेठेत आल्यानंतर नशिबी येतो तो तुटपुंजा पेसा व निराशा, अशा दोन पाट्यात शेतकरी भरडला जातो.
   पूर्वी " बचेंगे तो लढेंगे " असे म्हटले जायचे परंतु आता "लढेंगे तो बचेंगे " असे म्हणण्याची वेळ आली आहे .असे असतांना जीवनात आलेल्या या संकटांचा यशस्वीपणे सामना करण्यातच यश दडले आहे व अनुभवाच्या दारातुन जातांना खचुन न जाता जीवनातील हा लढा आपल्याला "जगणे" शिकवितो हे बळीराजाने विसरता कामा नये .
   रक्ताचे पाणी करुन मानवाचे भाकरीशी नातं जोडणारा बळीराजा जे कधी आपले स्वप्न पाण्यात वाहतांना पाहतो तर कधी दुष्काळाच्या झळांमध्ये पाकांसोबत कोमेजुन जातात यासाठी बळीराजाने आधुनिक शेतीकडे वळायला हवे, विविध सेंद्रिय खतांचा वापर, पोषकद्रव्ये , किटकनाशके यांच्या वापराविषयी त्याचप्रमाणे शेतीतील मातीचा सामू , घटकद्रव्यांचे प्रमाण , स्तर याविषयी जागरुकता व ज्ञान जाणुन घेतली पाहीजे. पिकांचे नियोजन व बाजारपेठांविषयी माहीती करायला हवी. त्यासोबतच शासनाने वेळोवेळी त्यांच्या मदतीला धावुन नुकसान भरपाई वेळेत द्यायला हवी तसेच विनाव्याज कर्जाची सोय ,बियाणे वखतांची उपलब्धता ती सुद्धा गुणवत्तापूर्वक असावी.संकटातुन "ऊभे " राहण्यासाठी शासनाने सर्वतोपरी मदत केली पाहीजे.
    अन्नधान्य शेतीपासुन आपल्या पर्यंत पोहचायला लागणारा कालावधी , लागणारे श्रम , लागणारा पैसा यांचे महत्त्व बळीराजाच्या डोळ्यात बघा.पोशिंद्याला वेठीस धरण्याचा धंदा जोपर्यंत बंद होत नाही तो पर्यंत "कृषीप्रधान "देशात शेतकरी आत्महत्येला आळा बसणार नाही व देशाच्या प्रगतीला खीळ बसत राहणार व पोशिंद्याला वेठीस धरणे म्हणजे धान्याला , अन्नाला आपल्यापासुन दूर करण्यासारखे आहे  हे सर्वांना कळायला हवे शेवटी "शेतकरी जगला तर देश टिकेल ".
नरेंद्र शामराव म्हस्के ,
शिरपूर ( धुळे )
मो. न. ९५५२९८००८९
    @ ६५

Ghanyshyam Borhade

विषय - शेतकरी जगला तरच देश जगेल

*स्पर्धेसाठी लेख*

*माझ्या भारत देशाची*
*काय सांगू कहाणी*
*कृषीप्रधान देशात*
*कृषीपुत्राच्या जबानी*

भारत देश कृषीप्रधान देश म्हणून फार पुर्वी पासून ओळखल्या जातो आणि आजही तो कृषीप्रधानच आहे , काळ लोटला संपूर्ण जगाने प्रगती केली तशी भारतानेही खुप प्रगती केली परंतु यामध्ये मागे राहिला तो आमच्या देशातील 70 टक्के मध्ये व्यवसायात मोडणारा शेतकरी ,कष्टकरी , मजूर खेड्यापाड्यात राहणारा समाज ..देशातील बळीची परिस्थिती आणि शोकांतीका स्वातंत्र्यानंतरही आहे तशीच आहे .
कदाचित थोडे फार बदल झाले सुद्धा परंतु ते वाखान्याजोगे निश्चितच नाहीत . भारत देश 2020 पर्यंत महासत्ता बनण्याच्या तयारीने पावले उचलतो आहे अन् दूसरीकडे शेतकर्याची दुर्दशा पाहता पाहवत नाही . सकाळीच वर्तमानपत्रात बातमी वाचायला मिळाली "सोयाबीन उत्पादक शेतकर्याची
दिवाळी अंधारात "
कारण ऐन दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन आवक मार्केट मध्ये वाढली त्यामुळे भाव घसरले म्हणून हजारो क्विंटल सोयाबीन मार्केटच्या
आवारात पडून मातीमोल विकल्या जाते आहे .
पंधरा दिवसापुर्वी हंगामात पावसाने थैमान घातले होते त्यावेळी अक्षरशः काही शेतातुन गुडघाभर पाण्यातून माल उपसत कसरत करत कसाबसा माल घरापर्यंत आणला अन् आता मालास भाव कमी , अश्या परिस्थिती मध्ये घाण्याच्या बैलासारखी अवस्था त्याची झालीय.

*नुसता रा�बत रहा*
*रात्रंदिवस शेतावर*
*दया नाही येत कुणा*
*तुझ्या लेकरावर*

रात्रंदिवस शेतावर राबायचं , तीन चार महीने सतत कष्ट करायचे, घरातलं होतं नव्हतं ते शेतात टाकायचं अन् सुगीची वाट पहायची मनात फक्त स्वप्न रंगवत रहायची , निसर्गाचं लहरीपण सांभाळून मग मालास भाव मिळण्याची अपेक्षा करायची त्यासाठी वाट पहायची आणि शेवटी गरजा पुर्ण होत नाही , लोकांची देणी करायची म्हणून कवडीमोल किंमतीत शेतमाल विकायचा हि आणि अशी लाचार पणाची जिंदगी बिचार्याच्या पाचवीला पुंजलेली .
कष्ट करतो हा , शेतात राबतो हाच आणि टाळूवरची मलई खाणारे मतलबी तिसरेच. त्यामुळेच कि काय घरातल्या जवाबदार्या , पोरांचं शिक्षण , लग्न कार्य , सुख -दूख सारख्या गोष्टी पेलू न शकल्याने निराषे  पोटी मृत्यूस उरी कवटाळतो
आहे . हि सद्य आणि खरी परिस्थिती आहे . एकीकडे शासन कोट्यावधी रुपये खर्च वाय फाय फुकट मिळण्यासाठी करतोय आणि दूसरीकडे कृषीप्रधान देशात या शेतकर्याच्या मालास योग्य ती किंमत मिळत नाही याचं दुख होतं .
तेंव्हा मृत्यु पश्चात मदत केल्यापेक्षा जीवंत असेपर्यंत ताठ मानेनं जगूण
कुटुंबाची सेवा करण्याचं भाग्य आणि सन्मान त्याला मिळू द्या. त्यासाठी फक्त भाव योग्य द्या हि त्याची मागणी सुद्धा रास्त आहे .
आणि त्या बदल्यात मरेपर्यंत देशसेवा तो निश्चितच करेल यामध्ये तिळमात्र शंका नाही .
म्हणून म्हणावसं वाटतं शेतकरी जगला तरच देश जगेल अन्यथा उपाशी निजेल तेव्हा ...

*नको नुसते पोकळ आश्वासन*
*ठोस पावले उचलली पाहिजे*
*कृषीप्रधान देशात माझ्या*
*शेतकरी जगला पाहिजे*

प्रा. घनश्याम बोह्राडे
बुलडाना
समुह क्रमांक 19
मो 8308432625

Amol Algude

साहित्य दरबार वैचारिक लेखमाला

*शेतकरी जगला तर देश टिकेल*

शेतकरी म्हणजे काय जो शेतात राबतो तो शेतकरी की जो उन्हात राबतो, तटपुंज्या उतारीसाठी वर्ष घासतो, रानात जीव पेरतो तो शेतकरी स्वताचे लेकर उपाशी ठेवून जग पोसतो तो शेतकरी व्याख्या करण अवघड झालय किंवा आपल्या व्यवसथेन तस अवघड केलय.

स्वताचे लेकर उपाशी ठेवून जग पोसायला या व्यवसथेन मजबूर केलय त्यांना. शेति हा खुप प्राचीन काळापासूनचा व्यवसाय आहे तस हा जगातील सर्वात जुना व्यवसाय आहे पण त्यात योग्य सुधारना झाली नाही स्वातंत्र मिळून 70 वर्ष होत आहेत पण शेतकरी आजही जकडुन आहे.
सततचा कोरडा दुष्काळ, तर कधि ओला दुष्काळ तर कधि बेमौसमी पाऊस यामुळे शेतकरयाला त्याच्या संसारचा गाडा नीट ओढ़ता येत नाही. त्यालाही वाटत असेल की त्याच मूल चांगल्या शाळेत शिक्षण घ्याव. चांगल घर असाव. पण हे स्वप्न त्याच्या शेवटच्या श्वसाप्रयंत पूर्ण होताना दिसत नाही.

भारत हा शेती प्रधान देश आहे अस म्हणतात व ते योग्य ही आहे.शेती व्यवसाय भारतातील 58 ते 65 टक्के लोकांना रोजगार प्रदान करतो. पण हा व्यवसाय करणाऱ्यांची कूटुंबिक परस्थिति कधि सुधरलीच नाही. त्याला तर स्वताच्या मालाचा भाव सुद्धा ठरवायचा हक्क नाही. काहींच्या सौंदर्यप्रसाधनावर जितका खर्च आहे तितकी तर यांची मिळकतही नसते. अस सांगायच कारण ईतकच की खुर्चीच्या पायांची ऊंची समान आसल्याशिवाय खुर्ची स्थिर नसते.

शेतकऱ्याच अख्ख कुटुंब राबुन 5-6 हजार रुपये क्विंटल तुर व हरभरा विकला जातो त्याचिच डाळ पंख्याखाली बसणारे 200 रुपये किलो विकतात आमच इतक चांगल अर्थशास्त्र असेल तर शेतकरयांना न्याय कोण देनार.शेतकरयांच सार अर्थकारण बिघडून गेल आहे.  एक समिति नेमन गरजेच आहे.

'इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो' अस प्रत्येक दिवाळी ला म्हणतो पण राज्य कधी आल नाही त्यांना कायमच गुलाम केलाय या खुर्चीशाहीन. काल परवाच बातमी वाचली शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाचि पाहनी ड्रोन मार्फ़त झाली खुर्चिवर बसुन डाटा मिळवला बर झाल उगीच त्यांना उन्हाचा त्रास कशाला.

महाराष्ट्रात महीना शेकडो शेतकरी आत्महत्या करत आहे ( की व्यवस्था त्यांची हत्या करतेय) शक्येतो हे शेतकरी अल्प भुधारक, दारिद्रय, नापिकि, ओला- कोरडा दुष्काळ, कर्जबाजारीपणा व यातुन येणार नैराश्य ईत्यादिने बेजार होऊन आत्महत्या करत आहेत. या आत्महत्येमुळे हाजारो कुटुंब बर्बाद झाले आहेत.
शेतकरयांचा आत्महत्या रोखन्यासाठी सरकारी इच्छा शक्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी अनेक उपाय योजना करण आवश्यक आहे
.
त्यामुळेच नैसर्गिक संकटात शेतकरयांना तात्काळ मदत मिळण गरजेच आहे. त्यांच्या मुलांसाठी सुलभ बिगरव्याजी शैक्षणिक कर मिळाल पाहिजे. मुलींच्या लग्नासाठी कमी व्याजदारात कर्ज उपलब्ध करून दिल पाहिजे. जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. शेतकरयाने मालाचा भाव स्वता ठरवावा व त्याला योग्य बाजरपेठ उपलब्ध केलि पाहिजे, खाजगी कंपन्याचे हजारो करोड़ रुपये कर्जे माफ़ करणारी सरकार संकट समयी का मदत करु नये. सावकारकी नष्ट केली पाहिजे.
अन्न है मूलभूत गरजांपैकी एक आहे त्यामुळे तरी किमन ही गरज भागवणाऱ्या शेतकरयाला सवलती मिळाल्या पाहिजे.
जास्त कष्ट करुन कमी मोबदला मिळणारा व्यवसाय म्हणजे शेति अस झाल आहे त्यामुळे शेतिच आधुनिकरण करण गरजेच आहे या बाबद आपण इजराइल चि मदत घेवू शेकतो.सिंचन क्षेत्र वाडवल पाहिजे पाण्या अभावी अनेक शेतकरी रब्बी पिक घेत नाहीत. बोगस बियाने व खत विक्रिला आळा घातला पाहिजे.
तो जगाचा पोशिंदा आहे  तो जगला आपण जगु .

              अमोल अलगुडे
                     निलंगा
                     स क्र 51
                     aalgude777@gmail.com

पुष्पा सदाकाळ

स्पर्धेसाठी.

शेतकरी जगला तर देश टिकेल.

           शेतकरी जगला तर देश टिकेल येवढे तरी आता खरोखर च कळू लागले आहे. शासनापासून तर जनसामान्यांपर्यंत सा-यांचेच डोळे उघडू लागले आहेत.पण आता कृती आवश्यक आहे. नुसती बघ्याची भूमिका नको. शासनाने काही ठोस पावले जरी उचलली असली तरी तिचा फायदा तळागाळातील शेतकर्यांपर्यंत पोहोचत नाही. भ्रष्टाचाराचं थैमान  घालणा-यांना हाव सुटत नाही.
      आपला भारत कृषी प्रधान देश आहे. एक प्रगतीशिल राष्ट्र म्हणून ही आज ओळख आहे. सर्व च माध्यमातून प्रगती झपाट्याने होत आहे. शेतीचे ही अवगत तंत्रज्ञान विकसित झाले आहे. भरघोस पिके देणारी बियाणे,खते, व अत्याधुनिक साधने आज बाजारात सहज उपलब्ध आहेत. पण या सगळ्या साठी पैसे हवे च ना.हे जर शेतकरी खरेदी करू शकला  नाही तर तो कसा पुढे येणार. गरीब शेतकरी गरीब च राहीलाय. कारण  आजही तो सावकाराच्या देणदारीच्या ,तसेच घरातील वाढता खर्च व उपवर मुलगी या समस्यांमधे पुरता अडकलाय.नैराश्याचं सावट कायमच त्याच्या परीवारात ठाण मांडून असत.खर तर अशा लहान  शेतक-याला सावरायला हव.संकट समयी 2ते 3 लाख देऊन तो मजबूत होणार नाही. त्याला मजबूत करण्यासाठी पहिले पाऊल त्याचे कर्ज माफ.तसेच खते ,बी बियाणे, शेतपंप ,लाईट बिल यात सवलत मिळवून दिली पाहिजे. त्याला शेतकरी राजा आपण म्हणतो मग खरोखर च तो राजासारखा रूबाबात ताठ मानेने जगला पाहिजे.

     नैराश्यापोटी आज आत्महत्येला प्रवृत्त होतात.कुटुंब उघड्यावर येतात.खुप मन हेलवणारी भयावह परीस्थिती असते.पुढे काही मार्ग दिसत नसतो .कधी अवकाळी पाऊस, कर्जाचा बोजा,नापिक ,तर दुबार पेरणी करून ही  निसर्गाची साथ नाही. तर आलेच पिक तर रास्त भाव नाही. आज शेतकरी पुर्ण खचलाय.म्हणून च शेतक-याच्या मुलांना राखीव जागा  नोकरी च्या ठिकाणी आवर्जुन ठेवाव्यात.
      खेड्यात तर सरपंच ,तलाठी, पाटील व सावकार हे लोक या शेतक-यांची उधारी चे उपकार करून खुप पिळवणूक करतात.
स्वस्तात त्याचा माल हडप करतात. हे चित्र आता नक्की च बदलणार आहे.

      आता आपण सावध झालो आहोत. सिमेंटच्या अलिशान घरात राहून व ऐश आराम सोडून माझ्या बळीराज्याच्या घरात नाही तर दारात उभे रहा आणि पहा   माणुसकी. गरीबीची लक्तरं पाघरली असली तरी चहा पाण्याचे स्वागत मनापासून होईल..आपल्याला जराही उन वारा सोसत नाही. त्याची तर बायकामुले रोजच काळ्या आईची सेवा करतात. कष्टांच्या घामाची पोती भरतात.
    जगाचा पोशिंदा च खचला तर राष्ट्र डळमळेल.देशाचे रक्षण करणारे शूरवीर तर इकडे शेतकरी  ही आपली अमूल्य रत्ने आहेत. यांच्या जीवावर आपण सुखात जगतो आहोत. यांना साथ देऊ.
       आता दिवाळी तोंडावर आली आहे. शहरात श्रीमंतीचा डामडौल व थैमान चालते.सजावट,चैनीच्या वस्तू व कपडा असा वायफळ खर्च केला जातो. पण शेतकर्यांची एखादी भाजी घेताना घासाघीस करतो व निवडून घेतो.पाच रू.द्यायला जास्त वाटतात.पण हाॅटेल ,सिनेमा, पिक् निक इथे मागे पुढे पहात नाही. पण आता बदला.शेतक-याला सावरा.त्याला मजबूत करा.त्याच्या मालाला उठाव येऊ द्या. अहो पाच महिने कांदा पिकवून अमाप खर्च व कष्ट करून फक्त 2 रू. किलो भाव.कसा जगेल शेतकरी. 5रू. किलो टोमॅटो. का नाही कर्जबाजारी होणार. स्वतःला सुशिक्षित म्हणणा-यांनी पुढे या.नुसती प्रसिद्धी व डामडौल सोडून  आपण एक जुटीने शेतक-यासाठी मदतीचा हात पुढे करू.काही  ठोस निर्णय घेऊन आंदोलने करू.एकमेकांच्या साथीने शासनाकडून सुविधा मिळवून देवू.कृतीतून साथ देवून त्याचे हात बळकट करू.मग माझा बळीराजा खरोखरीच सर्जा राजांसोबत  आनंदाने जगेल.व कुटुंबाच्या सुखाला मुकावे लागणार नाही. नाही आत्महत्येला धजावणार..
      म्हणून च मी म्हणेन लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये.

     पुष्पा सदाकाळ भोसरी
         @ 50. 9011659747.

आश्लेषा मोदी

📘साहित्य दर्पण वैचारिक लेखमाला📘

🖋शेतकरी जगला तर देश टिकेल🖋

आपण ज्या देशात रहतो तेथे ७५% लोक शेतीवर अवलंबून आहेत.आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणले जाते.देश कृषीप्रधान आहे पण शेती करणारा खरा देशाचा राजा गंजून चाललाय कर्जाने , शेती करताना येणार्या अडचणी मुळे.
      शेतकर्याला शेती करताना अनंत अडचणीना तोंड द्यावे लागते काही नैसर्गीक तर काही आर्थिक.कधी दुष्काळ कधी अतीवृष्टी यात शेतीचे भरपूर नुकसान होते.जेवढा खर्च झाला तेवढेही उत्पन्न निघत नाही व हताश बळीराजा सावकर्याच्या पाशात सापडतो व अडकत अडकत जातो.व्याज भरता येईल इतकेही उत्पन्न निघत नाही कधी पीक पाणी चांगले झाले तर त्याला भाव मिळत नाही व शेतकर्याला कमी भावात विकावे लागते.
       सरकारने प्रत्येक मालाला एक निश्चित हमीभाव मिळवून दिला पाहिजे.बी-बियाणे,खत रास्त दरात मिळेल अशी व्यवस्था करावी.शेतकरी हा आपल्या देशाचा आर्थिक कणा आहे व तो खचला जाणार नाही याची काळजी घेतली पाहीजे.
     आजची ज्वलंत समस्या शेतकर्याची आत्महत्या याकडे भावनिक न होता व्यवहारीक दृष्टीने बघुन असे घडू नये म्हणून ठोस पावले उचलणे खुप गरजेचे आहे.कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देणे,निवडक बी-बियाणे,खते सर्वाना
योग्य दरात मिळेल याकडे लक्ष देणे व मालाला हमीभाव या काही महत्वाच्या गोष्टी आहेत .त्याकडे लक्ष दिले तर शेतकर्याला नक्कीच दिलासा मिळेल .
    नैसर्गीक आपत्ती आली तर शेतकरी वर्गाला मदत करणे हे आपले आद्य कर्तव्य असले पाहीजे.दलालाकडून माल घेण्यापेक्षा या शेतकरी दादा कडून घासाघीस न करता खरेदी केली पाहीजे.
     शेतकरी जो स्वतः शेतात कष्ट करतो,घम गाळतो व आपल्यासाठी अन्न धान्याचे उत्पादन करतो म्हणजे तोच आपला पोशिंदा आहे.असा हा शेतकरी आनंदात व कर्ज मुक्त जगला तरच देश टिकेल.

पोशिंदयाची ठेवुनी जाण
करुया त्यास कर्जमुक्त..
जगेल तो आनंदाने हे
लक्षात घेण्याचा आहे वक्त..

      55,अश्लेषा मोदी,
         सांगोला
     9405372401

मीनाक्षी

🌴शेतकरी जगेल तर देश टिकेल🌴

भारत हा कृषीप्रधान देश असूनही शेतकरी म्हणजे काय?कोण?हा प्रश्न आजच्या पिढिसमोर पडतो.कदाचित शेत म्हणजे काय ?हा प्रश्न पुढच्या पिढिसमोर पडेल.शेती म्हणजे काय?शेतकरी म्हणजे काय हेच जर माहीत नसेल तर शेतकऱ्यांचे महत्त्व कसे काय जाणणार?
     सर्व जनतेला  कळत असूनही वळत नाही.भारत हां कृषिप्रधान देश मानला जातो.भारतातील सुमारे 70%जनता उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसायावर आवलंबून आहे.भारतात काम करणारे दोन तृतीयांश लोक शेती अथवा शेती उद्योगांशी संबंधित आहेत .देशाच्या राष्ट्रिय उत्पन्नात शेती व्यावसायाचा वाटा सुमारे 18 ते 20 %आहे.सुमारे 30%जनता अप्रत्यक्षरित्या त्यांच्या अन्न ,वस्त्र ,निवारा या गरजांसाठी शेतीवर अवलंबून आहे.शेतीच्या एकूण उत्पन्नात भारताचा जगात दूसरा क्रमांक आहे.
        कितीही शेतीला नाकारल शेतकामाला कमी लेखल  तरी अजूनही शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.भारताच्या आर्थिक, सामाजिक विकासामधे या क्षेत्राची महत्वाची भूमिका आहे.त्यामुळे भारताच्या पंचवार्षिक योजनेमधेही कृषी क्षेत्राला महत्त्व दिले गेले आहे.
     सर्व जनतेला  कळत असूनही वळत नाही.भारत हां कृषिप्रधान देश मानला जातो.
       
भारताच्या  लोकसंख्येपैकी  70 टक्के  लोकसंख्या  शेतीवर  अवलंबून 
आहे .  पण  भारतातील  जनता  मात्र
त्याला  तुटपूंजी  लाचार&  भिकारी
समजते .
    स्वतःच्या  पोटच्या  लेकरापेक्षा
जास्त  जीव  लावून  शेतकरी  काम
करतो &शेतमाल  विकताना  मात्र  त्या  मालाची  किंमत  ग्राहक  किंवा  व्यापारी  ठरवत  असतात.
        म्हणजे  कबाड़कष्ट  करणारा
शेतकरी  त्याच्या  कष्टाला  काहीच  महत्व  नाही.
        जे  ग्राहक  किराणा  दुकान ,मोठ्या  मोठ्या  मॉलमद्ये
कपड्यावर  परफ्यूमवर  अनेक  गोष्टींवर खर्च  करतो & किमतीचा विचार  सुद्धा  करत  नाही.  तोच  ग्राहक  शेतक-याकडून  भाजीची  साधी  पेंडी विकत घेताना रूपयासाठी  भांडतो.हे  का  होते?  तर  माणसाचा  शेतक-याकडे  बघण्याचा  दृष्टिकोण  बदलला  पाहिजे.  
        शेतकऱ्यांचा  महत्त्वाचा  दोष  शेतकरी  संघटित  नाहीत.
      शेतकरी  जर  संघटित  झाले  तर  ज्या  गोष्टी  शक्य  नाहीत  त्या  देखील  शक्य  होतील.  कारण  अख्ख  जग   उत्पादित  केलेल्या  धान्यावर  जगत  असते.  जर शेतक-याने  संप  केला  तर  इतके  अमूलाग्र  बदल  होतील  ज्याची  आपण  कल्पनाही  करु  शकत  नाहीत. 
         डॉ. बाबासाहेब  आम्बेडकरही  शेतकऱ्यांचे  कैवारी  होते.
        शेती हे  केवल  उपजीवीकेचे  साधन  नसुन  राष्ट्रिय  उत्पादन हा भारताच्या उत्पन्नाचा स्त्रोत  आहे.  ग्रामीण  भागाच्या भारताच्या विकासाचा  स्त्रोत  आहे.
खर तर शेतीकडे एक उद्योग म्हणून व् शेतकरी एक उद्योजक या दृष्टीने पाहिले पाहिजे.शासनकडून पुरेसे आर्थिक पाठबळ न मिळाल्याने शेतकरी सावकरांचा आधार घेतात .वेळप्रसंगी आत्महत्येचा मार्ग निवडतात.त्यांच्या अन्तापर्यन्त सावकाराच्या पाशातून सुटका होत नाही.सावकार&व्यापारी हे आयत्या बिळातील नागोबा असत.हे सर्व थांबवण्यासाठी शेतकरी वर्गाने संघटित होवून स्वताचे महत्व पटवून द्यायला हवे कारण जोपर्यन्त बाळ रडत नाही तोपर्यन्त आईही आपल्या बाळाला दूध पाजत नाहीत.त्यामुळे वेळोवेळी आपल्याला येणाऱ्या समस्या सरकारपुढे मांडल्या पाहिजेत .माझ्या बळीराजाचे महत्व पटवून देण्यासाठी हे पेजही आपुरे पडेल.शेवटी एवढच म्हणेन,

"जर नाही मीळाली साथ,
तर तो आपल्या प्राणांना मुकेल।
मित्रांनो हे लक्षात ठेवा की,
शेतकरी जगेल तर देश टिकेल।"

मीनाक्षी